सुरूची बाग म्हणजे समुद्रकिनाराच आहे.. जिथे किनार्यावर सुरूची झाडे बहुसंख्येने उभी आहेत.. अजय पाटील या मायबोलीकरांच्या पेटींगमध्येदेखील इकडचे चित्र पाहीले होते.. तेव्हा या ठिकाणाला भेट द्यायची राहिलीच होती.. वसई (पश्चिम) ला इथे एसटी वा रिक्षाने जाता येते.. एसटीने (भाडे प्रत्येकी ७ रु.) गेल्यास वसई शहर स्टॉपला (पापडीच्या पुढचा स्टॉप)उतरायचे.. मग इसको पूछ -उसको पूछ करत पंधरा- वीस मिनीटांत चालत सहज पोहोचता येते.. इथे बहुदा स्वतःची गाडी घेउन जाता नाही येत.. कारण जवळपास एक किलोमीटर अंतराआधी गेट लावला आहे.. रिक्षाने (भाडे अंदाजे प्रत्येकी १६ रु.) आलात तर इथपर्यंतच सोडतो..
इथून मग समुद्रचा आवाजच खेचून घेतो.. सरळ जाणारी वाट नि आजुबाजूला खारफुटी.. असे अंतर पार करताना समोरच सुरूची झाडे डोकावू लागतात.. किनार्यापाशी पोहोचलो नि खादाडीसाठी चक्क एकच स्टॉल दिसला.. झोपडीच म्हणा.. एखाद दुसरा टांगा नि दोन तीन घोडे.. बाकी विस्तीर्ण पसरलेला किनारा.. असे दृश्य मुंबईतील समुद्रकिनार्यावर फार कमीच दिसते... इथे पोहोचलो नि किनार्यावरील ही सुरूची झाडं वार्यामूळे समुद्राच्या विरुद्ध दिशेने कललेली दिसली.. उजव्या बाजूपेक्षा डावीकडे जास्त प्रमाणात झाडे दिसत होती... मग तिथेच आधी फेरफटका मारण्यासाठी गेलो.. सुरूची बाग हे नाव खरच उठून दिसते..
प्रचि १
- - -- - - - -
प्रचि २
-- - - -- - -
संध्याकाळी चारची वेळ.. पण वातावरण पावसाळी त्यात उंचपुरी अशी ही सुरूची झाडे.. शिवाय सभोवताली पसरलेली हिरवाई.. इथे फिरायला कोणाला नाही आवडणार...
प्रचि ३
- - -- - - - -
प्रचि ४
(फोटो by 'ती' .. )
- - - -- - - -
इथून मग समुद्र बघतानाही छान वाटते..
प्रचि ५
(ती तिथं उभी.. )
- - - - - -- - -
मग पावले आपसुकच समुद्राकडे वळवली..
प्रचि ६
- - - -- - - -
प्रचि ७ : समुद्रकिनारा नि घोडागाडी हे मुंबईतल्या चौपाटीवरचे नेहमीचे दृश्य.. पण इथे एकच होती..
- -- - - - - -
प्रचि ८:
धावत जाऊन कधी एकदा त्या समुद्राच्या लाटांवर झोकून देतोय.. !! (लहानपणी आम्ही भावंडेसुद्धा अशी शर्यत लावायचो.. आता कधी मित्रांसोबत गेलो तर उलटे धावत जाण्याची शर्यत खेळतो..:P)
------------
प्रचि ९: एकीकडे आकाशात काळ्या ढगांचे आच्छादन तयार झाले..
-----------
प्रचि १०:
-----------
प्रचि ११:
----------
प्रचि १२:हितगुज समुद्राशी..
----------
बरेच फोटोसेशन पार पाडले.. नि पुन्हा कॅमेरा तिच्या हातात दिला.. कारण उडीबाबा कार्यक्रमाची वेळ झाली... मोक्याची जागा बघितली.. नि सरावलो..
प्रचि १३
---------
'ती' आता पहिल्यांदाच असे फोटो काढणार म्हणजे कितीतरी रिटेक घ्यावे लागतील अशी रिस्क होतीच.. पण तरीही चान्स घेतलाच.. नि नशिबाने पहिल्याच क्लिकमध्ये उडी टिपली गेली.. ! क्या बात क्या बात !
प्रचि १४
---------
प्रचि १५: वळ वाळूवरचे..
--------
प्रचि १६: सूर्यास्त दर्शनसोहळा आज बंद राहणार असे सुचवणारे हे दृश्य..
थोडक्यात सांगायचे तर मुंबईतील अजुन एक शांत नि रम्य परिसर.. नक्कीच भेट द्या..
यापुर्वी वसईच्या परिसरात खालील ठिकाणी भटकंती झालेली आहे..
१. वज्रगड - वसईची हिराडोंगरी
२. वसईचा किल्ला - वसई किल्ल्यातील एक रपेट
मस्तच्_जागा_आहे_ही. आणि_फोटोह
मस्तच्_जागा_आहे_ही.
आणि_फोटोही_छानच_!!
सहिये !
सहिये !
मस्तंय (फोटो by 'ती' ..
मस्तंय

(फोटो by 'ती' .. )>>>>>कि फोटो "बायडी" ???
काय वेळ आली आहे पहा...नेहमी
काय वेळ आली आहे पहा...नेहमी डोंगर दरया पालथे घालणार्या माणसाला सुरुची बाग पहायला लागत आहे...:-)
यो म्हणना खरा झाला आता
यो म्हणना खरा झाला
आता सुरुची बाग, समुद्र किनारे हयली सफर वाढली 
मस्त रे... झकास...
मस्त रे... झकास...
योग्या अभिनंदन रे.
योग्या अभिनंदन रे.
यो. मस्तच. तू दाखवतोस ती
यो.
मस्तच. तू दाखवतोस ती प्रकाशचित्रं म्हणजे एक खरंखुरं ललित असतं.
प्रचि १० - उच्च!
नेहमीप्रमाणे मस्त!! आणि
नेहमीप्रमाणे मस्त!! आणि तिलाही सराव मिळाला तुला उड्या मारायला लावण्याचा
मस्त. डहाणु च्या समुद्र
मस्त.
डहाणु च्या समुद्र किनार्या वर ही सुरु ची झाडे आहेत.
मस्त प्रचि
मस्त प्रचि
छाचि आणि वर्णन..दोन्हीही
छाचि आणि वर्णन..दोन्हीही छान!
तुझे नाव आता ’उडीबाबा’ ठेवायला हवे!
>>तुझे नाव आता ’उडीबाबा’
>>तुझे नाव आता ’उडीबाबा’ ठेवायला हवे!>> देव काका ते तर आधीच ठेवलय.. आता काहीतरी वेगळे शोधायला पाहिजे.
योग्या जल्ला तिथे जाऊन पण फक्त उड्याच मारल्या.. कम्मालय
असो..फोटो छान.. ते वळ मस्त दिसतायत
धन्यवाद
धन्यवाद
आमच्यापण समुद्रकिनारी आहे हो
आमच्यापण समुद्रकिनारी आहे हो ही सुरुची बाग.
फोटो छानच.
फोटो छान . यो अभिनंदन
फोटो छान . यो अभिनंदन !!!!!!!!!
आणि तिलाही सराव मिळाला तुला
आणि तिलाही सराव मिळाला तुला उड्या मारायला लावण्याचा>>
योग्या जल्ला तिथे जाऊन पण फक्त उड्याच मारल्या.. कम्मालय>>>>>>>:फिदी:
आमच्यापण समुद्रकिनारी आहे हो
आमच्यापण समुद्रकिनारी आहे हो ही सुरुची बाग.>> jaau nakos re tithe
जल्ला कोणत्या फोटोंना सुंदर
जल्ला कोणत्या फोटोंना सुंदर म्हणाव हा प्रश्ण पडलाय :p
jaau nakos re tithe का? का?
jaau nakos re tithe का? का? का ?
आमची वसई सुंदर वसई!!
आमची वसई सुंदर वसई!!
अप्रतीम
अप्रतीम
छान आलेत फोटो. प्रचि. ८ आणि
छान आलेत फोटो.
प्रचि. ८ आणि १५ तर मस्तच.
भ्रमरना १०० मोदक.
काय वेळ आली आहे पहा...नेहमी
काय वेळ आली आहे पहा...नेहमी डोंगर दरया पालथे घालणार्या माणसाला सुरुची बाग पहायला लागत आहे...

>> गिरी
हो आता तो फक्त बागाच बघणार...
बाकी फोटुबद्दल काय बोलु... मस्तच.. उडीचा फोटू छान पकडलाय योरीने
छानै रे. आणि हो. अभिनंदन
छानै रे.
आणि हो. अभिनंदन
योरीने...
योरीने...
योरीने >>>> सह्हीए रोमा
योरीने >>>>:हहगलो: सह्हीए रोमा
थँक्स ऑल.. रोमा.. तुझ्या
थँक्स ऑल..
रोमा.. तुझ्या तर..
>>>>>'ती' आता पहिल्यांदाच असे
>>>>>'ती' आता पहिल्यांदाच असे फोटो काढणार म्हणजे कितीतरी रिटेक घ्यावे लागतील अशी रिस्क होतीच.. पण तरीही चान्स घेतलाच.. नि नशिबाने पहिल्याच क्लिकमध्ये उडी टिपली गेली.. ! क्या बात क्या बात >>>>
यो मेल्या स्थिर असणा-या डोंगर द-यांचे, झाडा पेडांचे फोटो काढण्यात तू मास्टर असलास तरी उडत्या योग्याला पहिल्याच प्रयत्नात कॅमे-यात बंदिस्त करणा-या 'वुड बी यो' ला अंडरएस्टीमेट करू नकोस आणि यापुढे तिच्या समोर फार उड्या मारु नकोस. नाहीतर............
बायदवे, सगळे फोटो अप्रतिम...... तुझे आणि 'ती' ने पहिल्याच प्रयत्नात इतका सुंदर फोटो काढल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!!!!!!!!!!!
संध्याकाळी चारची वेळ.. पण
संध्याकाळी चारची वेळ.. पण वातावरण पावसाळी त्यात उंचपुरी अशी ही सुरूची झाडे.. शिवाय सभोवताली पसरलेली हिरवाई.. इथे फिरायला कोणाला नाही आवडणार... >>> अजुन एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट विसरलास.... अगदी तुरळक वर्दळ..



योरी..
दगडा.. बघ तिला खरच अंडरएस्टीमेट करू नकोस नाहितर तुझी खैर नाही..
पण फोटो खुपच छान
Pages