सुरूची बाग
Submitted by Yo.Rocks on 18 August, 2011 - 15:56
सुरूची बाग म्हणजे समुद्रकिनाराच आहे.. जिथे किनार्यावर सुरूची झाडे बहुसंख्येने उभी आहेत.. अजय पाटील या मायबोलीकरांच्या पेटींगमध्येदेखील इकडचे चित्र पाहीले होते.. तेव्हा या ठिकाणाला भेट द्यायची राहिलीच होती.. वसई (पश्चिम) ला इथे एसटी वा रिक्षाने जाता येते.. एसटीने (भाडे प्रत्येकी ७ रु.) गेल्यास वसई शहर स्टॉपला (पापडीच्या पुढचा स्टॉप)उतरायचे.. मग इसको पूछ -उसको पूछ करत पंधरा- वीस मिनीटांत चालत सहज पोहोचता येते.. इथे बहुदा स्वतःची गाडी घेउन जाता नाही येत.. कारण जवळपास एक किलोमीटर अंतराआधी गेट लावला आहे.. रिक्षाने (भाडे अंदाजे प्रत्येकी १६ रु.) आलात तर इथपर्यंतच सोडतो..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा