जराशी नटली जराशी थाटली
लोक विचारत कलाकार कुठली
दिसते सुंदर पायी घुंगर
मोरपंखी कपड्यात तर एकच नंबर
डोळे नेहमी लपलपणारे
केस तीचे मऊमऊ
आम्ही दोघी उनाड थोड्या
आणी थोड्या चॉकलेट खाऊ
न दिसता बाहुली माझी
मी थोडी रुसून बसते
खेळ खेळत लग्नाचा तीच्या
बाहुली बघा लाजुन हसते
लहान तोंडी मोठा घास
आई म्हणते गप्प बास
न बोलणारी बाहुली मात्र
आजही माझ सगळं ऐकते
रस्त्यात खेळ चालतो
एका मळकट बाहुलीचा
अंगावर जीर्ण वस्त्रे
डोळ्यात दिसे निराशा
दोरीवरती नशिबाच्या
ती तोल साधते मुक्याने
हातातील स्वप्नांच्या काठिचाच
तिला खरा आधार आहे
धुळिने माखलेल्या चेहऱ्यावर
कल्पना, इंदिरेसम तेज भासते
सावित्रिच्या या लेकीला मात्र्
पोटासाठी हात पसरावे लागते
तिचे केविलवाणे रुप पाहुन
मन तेवढ्यापुरते हळवे होते
हातात काही रुपये ठेवुन
भावनाशुन्य् गर्दित सामिल होते.
हा माझ्या लेकीचा वॉटर कलर मध्ये चित्र रंगवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे कसा वाटतोय ते जरुर लिहा.
(घरात बरेच दिवस तिच्यासाठी पोस्टर कलर्स व ब्रश आणुन ठेवले होते पण तिला रंग व ब्रश कसे वापरायचे ते दाखवायला मला वेळच मिळत नव्हता. 'उद्या दाखवेन' या माझ्या रोजच्या उत्तराला कंटाळून तिने एकदा स्वतःच ते कलर घेतले व हे चित्र काढले.) अगं कस जमल तुला?? या माझ्या प्रश्नाला तिने पुंडलिक वझे यांच "रंग लेपन तंत्र व मंत्र" पुस्तक दाखवलं. याआधी सुट्टीतल्या उद्योगातले प्राणी बनवताना एकदाच तिने हे कलर वापरले होते पण तिथे जास्त कौशल्याची गरज नव्हती
लेकीच वय- आठ वर्ष
माध्यम- पोस्टर कलर्स व क्रेऑन्स.
बाहुली म्हणे टोपी हवी
घालायला पण सोप्पी हवी
त्यावर माऊचे कान हवे
छोटे गोरेप्पान हवे
आणखी हवंय बदामी फूल
त्यावर सुंदर मोत्यांची झूल
रंगीत डोक्यावर चांदण्या फुले
टोपीच्या गोंड्यावर चांदोमामा डुले
टोपीच्या भवती सोनेरी नक्षी
इवल्याशा पंखांचा पिटुकला पक्षी
टोपी घालून भूर गेली
ढगांमधून दूर गेली
तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते
बाहुलीच्या डोक्यावर माऊची टोपी
दिसायला सुंदर घालायला सोपी
पऱ्यांच्य़ा राज्यात एकच गडबड
टोपीसाठीच सगळी धडपड
पऱ्या म्हणाल्या बाहुलीला
"टोपी दे ना आम्हाला!