Submitted by Santosh zond on 2 November, 2020 - 21:06
जराशी नटली जराशी थाटली
लोक विचारत कलाकार कुठली
दिसते सुंदर पायी घुंगर
मोरपंखी कपड्यात तर एकच नंबर
डोळे नेहमी लपलपणारे
केस तीचे मऊमऊ
आम्ही दोघी उनाड थोड्या
आणी थोड्या चॉकलेट खाऊ
न दिसता बाहुली माझी
मी थोडी रुसून बसते
खेळ खेळत लग्नाचा तीच्या
बाहुली बघा लाजुन हसते
लहान तोंडी मोठा घास
आई म्हणते गप्प बास
न बोलणारी बाहुली मात्र
आजही माझ सगळं ऐकते
लहानपणी आपल्याभोवती जरी खोटट जग तयार असायचं तेव्हा ते खुप आनंद मज्जा सुद्धा देऊन जायचं पण आता सगळ्या गोष्टी माहीत झाल्यावर जगण्यात शहाणपण,हुशारी,व्यवहारीक गोष्टी आल्यानंतर तो खोटा का असेना पण खरा जगायचा आनंद हिरावून घेतल्या गेला !!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा