माझी ही कविता आज अचानक आठवली..आपल्या देशातली सध्याची एकंदर स्थिती लक्षात घेता किती स्त्रीया हे असं जीणं जगत असतील देव जाणे! काही जणांच्या मते ही अतिशय उद्धट कविता असू शकेल, पण मी प्रामाणिक प्रयत्न केलाय, स्त्रैय मनःस्थिती मांडण्याचा!
भानुप्रिया
---
मी एक मासा
ठाउक मला प्राक्तन माझे
तरी उगाच पोहतो
अंताकडे नेणा-या प्रवाहासंगे
निवांत वाहत राहतो
काय असते कोण जाणे
अखेरच्या त्या क्षणापार
झळाळत्या कायेवर
कसला मसाला लागणार
अंगोपांगावरुन माझ्या
कशी फिरणार सुरी
गुलाबी नाजूक हातांनी
कशी लागेल मीठ-मिरी
निमूट राहीन पडून
कढईत की पाण्यात
जीवनाची सफर माझ्या
तळ्यापासून तळण्यात
करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द
जुळले तेही होते असबध्द आणि अस्पष्ट..
केले कसेतरी कडवे दोन पुर्ण
तेव्हा झाले मला पर्व एक पुर्ण ...
करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द
शब्दाची जुळवा जुळव करताना आले नाकी नऊ
म्हटले चला आता फोटोसह छापायला देऊ
करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द
वर्तमानपत्रातून छापल्या गेली माझी कविता
तेव्हा प्रसिध्दीच्या वहायला लागल्या सरिता
करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द
जुळले तेही होते असबध्द आणि अस्पष्ट..