Submitted by pradyumnasantu on 16 November, 2011 - 14:07
मी एक मासा
ठाउक मला प्राक्तन माझे
तरी उगाच पोहतो
अंताकडे नेणा-या प्रवाहासंगे
निवांत वाहत राहतो
काय असते कोण जाणे
अखेरच्या त्या क्षणापार
झळाळत्या कायेवर
कसला मसाला लागणार
अंगोपांगावरुन माझ्या
कशी फिरणार सुरी
गुलाबी नाजूक हातांनी
कशी लागेल मीठ-मिरी
निमूट राहीन पडून
कढईत की पाण्यात
जीवनाची सफर माझ्या
तळ्यापासून तळण्यात
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त आहे.
मस्त आहे.
आवडली.
आवडली.
आवडली
आवडली
झक्कास! अगदी तळलेल्या पापलेट
झक्कास! अगदी तळलेल्या पापलेट सारखी.
"जीवनाची सफर
"जीवनाची सफर माझ्या
तळ्यापासून तळण्यात"
छान...... वेगळा विषय आणि सहज हाताळणी.
खुपच छान जमलीय...
खुपच छान जमलीय...:)
छान आहे.
छान आहे.
एकदम मॅरिनेटॅड. काय म्हणतात
एकदम मॅरिनेटॅड.
काय म्हणतात ते .... हं....... 'तोंपासु'...
एकदम छान
एकदम छान
ठाउक मला प्राक्तन माझे तरी
ठाउक मला प्राक्तन माझे
तरी उगाच पोहतो
अंताकडे नेणा-या प्रवाहासंगे
निवांत वाहत राहतो>>>> छान. कविता आवडली.
वरचे टायटल वाचून मी कॅमेरा
वरचे टायटल वाचून मी कॅमेरा आणि तळण्याचे साहित्य घेऊनच तयार होते.