असबध्द कविता

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 10 November, 2010 - 06:00

करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द
जुळले तेही होते असबध्द आणि अस्पष्ट..

केले कसेतरी कडवे दोन पुर्ण
तेव्हा झाले मला पर्व एक पुर्ण ...
करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द

शब्दाची जुळवा जुळव करताना आले नाकी नऊ
म्हटले चला आता फोटोसह छापायला देऊ
करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द

वर्तमानपत्रातून छापल्या गेली माझी कविता
तेव्हा प्रसिध्दीच्या वहायला लागल्या सरिता
करीत होतो कविता जुळ्त नव्हते शब्द
जुळले तेही होते असबध्द आणि अस्पष्ट..

शब्दखुणा: 

शब्दाची जुळवा जुळव करताना आले नाकी नऊ

>>>

फार्फार पुर्वी " नाकी नउच का येत असावेत यावर चिकित्सा केली होती ...विचारांती ...नथ नऊ आकाराची असते म्हणुन हा वाक्प्रचार पडला असावा हे तात्पर्य निघाले ...

आता तुम्हाला मराठी ९ कि english 9 ....जशी हवी तशी नथ घाला Proud

कवितेच्या शिर्षकात आणि इतरत्र तेवढं असबद्ध मध्ये स वर अनुस्वार द्या. बाकी चालू द्या तुमच.

>>> अहो इथेच तर फसलात .

शिर्शकातच व्याकरणाशी संबंध्द तोडुन टाकलाय .... फार्फार असंब्ध्द... मस्त सार्थ कविता !!!

केले कसेतरी कडवे दोन पुर्ण
तेव्हा झाले मला पर्व एक पुर्ण ...>>>

कवितेची दोन कडवी लिहीणे हेसुध्दा तुम्हाला एका पर्वासारखे वाटते यातून तुमचं कवितेवरील प्रेम दिसून येते. तुम्ही मनापासून लिहीण्याचा प्रयत्न करत आहात याचा माझ्यासारख्या रसिकाला आनंदच आहे. सदिच्छा!!!

अप्रतिम.......

मी प्रतिसादांबद्दल बोलतोय... Biggrin

मुक्तेश्वर... लगे रहो. Happy

हणमंत शिंदे यांच्यासारखे गुणग्राहक (म्हणजे गुण ओळखणारे, सोयीने गिर्‍हाईक असा अर्थ लाऊ नये) आहेत म्हणून मुक्तेश्वर यांच्यासारख्या उदयोन्मुख कवींचे भवितव्य उज्ज्वल आहे.

कवितेची दोन कडवी लिहीणे हेसुध्दा तुम्हाला एका पर्वासारखे वाटते यातून तुमचं कवितेवरील प्रेम दिसून येते. तुम्ही मनापासून लिहीण्याचा प्रयत्न करत आहात याचा माझ्यासारख्या रसिकाला आनंदच आहे. सदिच्छा!!>>>>

सहमत आहे हणमंतरावांशी!

हणमंत शिंदे यांच्यासारखे गुणग्राहक (म्हणजे गुण ओळखणारे, सोयीने गिर्‍हाईक असा अर्थ लाऊ नये) आहेत म्हणून मुक्तेश्वर यांच्यासारख्या उदयोन्मुख कवींचे भवितव्य उज्ज्वल आहे. >>>

मंदार जोशी साहेब,

मुक्तेश्वर हे एक प्रस्थापीत कवी आहेत. असे असताना आपण उदयोन्मूख म्हणून त्यांचा अपमान करत आहात. बाकी आपण माझ्या साहित्यावर बोलताना माझ्याविषयी बोललात तर ते मान्य असेल परंतू इतर ठिकाणी कोणता रसिक कसा आहे याविषयी मत देण्यापेक्षा सदर काव्य कसे आहे यावर बोलणे जास्त योग्य ठरेल. तो त्या कवीचा सन्मान आहे. बाकी सुज्ञास..... !!!

- हणमंत शिंदे

सदर काव्य कसे आहे यावर बोलणे जास्त योग्य ठरेल >>> बरोबर. परंतो काव्य कोष्ठे आहे? की आहे त्यास काव्यच समजोनी बोलायचे आहे?

प्रस्थापित वगैरे नंतर बघु ....
आधी कविता आणि म्हणजे कवी म्हणजे काय ? यावर चर्चा करु !!!

नवीन धागा काढत आहे !