सोनकी

मभागौदि २०२५, निसर्गायन - शशांक पुरंदरे

Submitted by पुरंदरे शशांक on 26 February, 2025 - 00:18

निळे जांभळे

निळे जांभळे रेखिलेसे रुजामे
फुलांनी किती भव्य पायातळी
झर्‍यातून काही खळाळे खुळावे
कसे बिंबते दर्पणाचे मनी

फुले साजिरी सोनकीही भरारे
लकाके तरी कंच पाचूवरी
कुठे शीळ वृक्षावरी ही सुखावे
मना घेउनी जातसे अंबरी

निळे मोकळे थेट आभाळ जागे
जरा मेघ कोठे खुळावे वरी
कडा डोंगराच्या खूणावून जाती
दरी काजळीची विसावे उरी

Subscribe to RSS - सोनकी