आनंदाचा कंद : लंपन
Submitted by अनया on 22 January, 2025 - 22:02
काही पुस्तकं स्पष्टपणे लहान मुलांसाठी असतात तर काही मोठया माणसांसाठी. प्रकाश नारायण संतांची वनवास, शारदा संगीत, झुंबर आणि पंखा ही पुस्तकं मात्र, वयाने मोठं होता होता प्रत्येकाच्या मनात राहून गेलेल्या लहान मुलासाठी आहेत. ह्या पुस्तकांमधील दीर्घकथांचा नायक लंपन हा लहानपण आणि पौगंडावस्थेच्या सीमेवर असणारा अत्यंत निरागस आणि संवेदनाशील असा मुलगा आहे. ह्या पुस्तकातल्या कथा लंपनच्या साधारण सहा-सात ते बारा वर्षांपर्यंतच्या काळातल्या आहेत. लहानपण संपतंय आणि तारुण्याच्या सुगंधी झुळकांची हलकी जाणीव होते आहे, त्या दरम्यानचे हे अस्वस्थ करणारे दिवस.
विषय: