राज्यभाषा

आई v/s मम्मी आणि बाबा v/s पप्पा

Submitted by ओबामा on 27 February, 2024 - 08:51

काल संध्याकाळी मांडीवरच्या संगणकावर (शुध्द मराठीत laptop) नजर लाऊन काम करत असतानाच, माझ्या मुलीने हळूच जवळ येऊन, मेरे बापू (दंगल चित्रपट पाहिल्यापासून हे माझे नवीन नामकरण) अशी लाडाने साद घातली. अगदी प्रेमाने माझा गालगुच्चा घेत, ”My dady is so cute” अशी स्तुतीपर वाक्य टाकायला सुरूवात केली, तेव्हा मी एकदम सावध झालो. बायकोने, प्रेमाने अ$$हो आणि मुलगी लाडात येऊन माझ्याबद्दल जास्त आदर दाखवायला लागल्या की लगेच माझा एसीपी प्रद्दयुम्न होतो, “दया, कुछ तो गडबड है”.

Subscribe to RSS - राज्यभाषा