द्वेष : एक भय गूढकथा, भाग ८
Submitted by प्रथमेश काटे on 24 February, 2024 - 10:12
जणू काहीच वेगळं घडत नाही अशा अविर्भावात, संथ बेफिकीरपणे श्री पायऱ्या चढून वर आलाआला. राजाभाऊ ही मनाची तयारी करीत मागून आले. अगदी सहजगत्या श्री कडी बाजूला सरकवून दरवाजा पुढे लोटला. आजूबाजूच्या पूर्ण शांततेत तो दरवाजाचा करकरण्याचा आवाज राजाभाऊंना पुढील भयानकतेचा सूचक वाटला ; पण त्यांनी तो विचार झटकून टाकला. एव्हाना दिव्यांची झकपक थांबली होती. दारं कडे कडेला आत गेली. तसा आतला काळोख एका नव्या, निराळ्या अधिकच गडद रूपात त्यांच्यासमोर साकार झाला. हात मागे घेऊन श्री जागेवर उभा राहिला त्याचे टप्पोरे, निळे डोळे त्या अंधारावर खिळलेले.