कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.
=========================================================
सावळ्याची पुळण!
सावळ्याची पुळण! बाबांच्या गावाला आणि आजोळाला जोडणारा एक वाळूचा पसरट पट्टा..
खालच्या डोहाशेजारी "आ" वासून पडलेल्या दोन मगरी पाहून, त्याने थेट धबधब्याखाली अंघोळ करावी असे ठरविले. डोंगरकड्यावरून कोसळणार्या त्या धबधब्याखाली अंघोळ करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. तिक्ष्ण बाणांसारखे टोचणारे पाण्याचे थेंब उघड्या शरीरावर झेलत संजय त्याचा पाठीमागच्या आठ दिवसांमधला जिवनमृत्युचा संघर्ष पार विसरून गेला! आठ दिवस त्याने या निर्जन बेटावर स्वतःचे आस्तित्व टिकवून ठेवले होते. स्वप्नांतही त्याने असा कधी विचार केलेला नव्हता की, आपल्याला आयुष्यात हा अनुभव कधी येईल! एक दिवस त्याला जिवंत प्राण्याला मारून खावे लागेल..........!
भारत विभूषण आपल्या सिंगल रूममध्ये विमनस्क स्थितीत बसला होता.. आत्ता या घडीला 'सबसे अनलकी कौन' असा गेम शो कुठे असता तर तो नक्कीच जिंकला असता.
तसा तो जन्मापासूनच अनलकी होता. जन्म देतानाच आय मेली अन् बाप आधीच गेला होता घर सोडून. आठवत होतं तेव्हापासून त्याच्या आज्यानंच त्याला वाढवलं होतं.. चार वर्षापूर्वी तोही गेला, अन् हा एकाकी झाला बिचारा.
सत्ते पे सत्ता .... अर्थात अगाध सत्ता ईश्वराची