दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय
Sea Harrier and Ka-25
Sea Harrier and Ka-25
हिंदी महासागरातील झपाट्याने बदलणाऱ्या सुरक्षाविषयक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची गरज पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक डिझेल-इलेक्ट्रीक पाणबुड्या खरेदी करण्याची प्रक्रिया 2011 पासून प्रोजेक्ट-75 (इंडिया) अंतर्गत सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यातच मेक-इन-इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मधल्या काळात कंत्राटामधल्या नियम-अटींमध्ये बदल करण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया आणखीनच संथ झाली आहे.
स्वदेशात प्रथमच बांधण्यात आलेल्या विमानवाहू जहाजाचे (विक्रांत) येत्या 2 सप्टेंबरला कोची इथं भारतीय नौदलात सामिलीकरण होत आहे. कोचीतल्या गोदीमध्येच या जहाजाची बांधणी करण्यात आलेली आहे. देशाने जहाजबांधणीच्या क्षेत्रात गाठलेला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. 2009 मध्ये या जहाजाच्या सांगड्याच्या कामाची सुरुवात झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2013 मध्ये या जहाजाचे जलावतरण झाल्यानंतर त्यावर विविध प्रकारच्या यंत्रणा बसविल्या गेल्या. त्यानंतर काही महत्वाच्या सागरी चाचण्या नोव्हेंबर 2020 पासून पार पडल्यावर आता हे जहाज नौदलात सामील होत आहे.