शहाण्यासारखा !
Submitted by मनाचा मालक on 15 October, 2010 - 08:38
पावसाळून टाकणाऱ्या ढगांच्या गर्दीपलीकडे
एक ‘निळे’ जग आहे
ढगांच्या पलीकडे ‘त्या’ जगात
माझा विचार जात नाही
मी करतोच विचार केवळ पोटापुरता!
ते जग कसे असेल?
त्याची व्याप्ती किती असेल?
तिथेही लोक असतील का?
या आणि तत्सम ‘निरर्थक’ प्रश्नांना
माझ्या विचारांच्या दुनियेत
सुईच्या टोकावर जागा असते
तेवढीही जागा मी देत नाही
पांडवाना जागा न देणाऱ्या कौरवासम!
जाणूनच कि असे प्रश्न काही दिवस
मनात पालं ठोकतात
एकाचा हात धरून दुसरा,दुसऱ्याचा तिसरा
प्रश्न येत राहतात
शहराकडे घोंगावत येणाऱ्या गर्दीसारखे.
अख्या मनाची झोपडपट्टी होते.
झोपड्या अधिकाराची भाषा करतात मग हळूहळू !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा