पावसाळून टाकणाऱ्या ढगांच्या गर्दीपलीकडे
एक ‘निळे’ जग आहे
ढगांच्या पलीकडे ‘त्या’ जगात
माझा विचार जात नाही
मी करतोच विचार केवळ पोटापुरता!
ते जग कसे असेल?
त्याची व्याप्ती किती असेल?
तिथेही लोक असतील का?
या आणि तत्सम ‘निरर्थक’ प्रश्नांना
माझ्या विचारांच्या दुनियेत
सुईच्या टोकावर जागा असते
तेवढीही जागा मी देत नाही
पांडवाना जागा न देणाऱ्या कौरवासम!
जाणूनच कि असे प्रश्न काही दिवस
मनात पालं ठोकतात
एकाचा हात धरून दुसरा,दुसऱ्याचा तिसरा
प्रश्न येत राहतात
शहराकडे घोंगावत येणाऱ्या गर्दीसारखे.
अख्या मनाची झोपडपट्टी होते.
झोपड्या अधिकाराची भाषा करतात मग हळूहळू !
म्हणूनच मी मुळात
तशा प्रश्नांचे अस्तित्व नाकारून‘
माझ्या’ प्रश्नांना महत्व देतो
निवडून आलेला नेता
निवडक लोकांची कामे करतो तसा!
हिरवळीच्या मिठीत सुखावणारा मी;
मला पावसाशी देणे-घेणे.
असलं जरी नातं त्या पावसाचं
त्याच निळ्या आभाळातील नक्षत्रांशी
तरीही खोलात न जाता
मी खुशालचेंडू मिरवत राहतो
ढगांच्या सावलीत
‘कळत नाही’ वा ‘माहितीच नाही’ चे वेड पांघरून.
‘तो मी नव्हेच’ म्हणत
मी बडेजावात चालत जातो
निळ्या जगाकडे सोयीस्कररीत्या डोळ्झाक करून.
ढगांच्या जगात,हिरवळीच्या मिठीत
मी जगत राहतो मरेपर्यंत
शहाण्यासारखा !
‘निळे’ जग, सुईच्या टोकावर
‘निळे’ जग, सुईच्या टोकावर जागा, मनाची झोपडपट्टी , निवडक लोकांची कामे, ‘कळत नाही’ वा ‘माहितीच नाही’ चे वेड पांघरून.... या सगळ्याच कल्पना आवडल्या
छान आहे कविता!
मालक मुजरा!!!!!!!!!!
मालक मुजरा!!!!!!!!!!
अतिशय सुरेख जमली आहे कविता..
अतिशय सुरेख जमली आहे कविता..
मस्त जमलीय! .अभिनंदन !!
मस्त जमलीय! .अभिनंदन !!
कल्पना चांगली हातळलीय. आवडली.
कल्पना चांगली हातळलीय.
आवडली.
धन्यवाद.
धन्यवाद.
मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.
मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.