कार्तिकातलं कौतुक ... बहरलेला बूच
Submitted by मनीमोहोर on 27 November, 2021 - 11:36
दिवाळी झाली की कार्तिक महिन्यात दिवस लहान होऊ लागतात. सावल्या दुपारीच लांब होऊ लागतात. उन्हाचा ताप कमी होऊ लागतो. हवा थोडी थंड होऊ लागते. अश्या दिवसात ठाण्याला आमच्याकडे बूचाचा महोत्सव साजरा होत असतो. कोकणपट्टीतील दमट हवेपेक्षा देशावरची थंड कोरडी हवा बुचाच्या झाडाला जास्त मानवते असं माझं निरीक्षण आहे .पण आमच्या सोसायटीच्या गेटवर दुशीकडे एक एक अशी दोन बुचाची खूप मोठी झाडं आहेत. ह्यांची मूळ जमिनीत फार खोलवर जात नसल्याने रोपटी असताना पावसात एकदा उन्मळून पडली ही होती पण नशिबाने रुजली पुन्हा छान. बुचाची गगनजाई किंवा आकाश मोगरा ही नावं ही सुंदरच आहेत पण मला जरा ती पुस्तकी थाटाची वाटतात.
शब्दखुणा: