अमेरिकन गाठोडं!--१
शेवटी तो दिवस उजाडलाच. मुंबईहून रात्री अकरा वीसची फ्लाईट होती, म्हणून दुपारी बारालाच गाडी सांगितली होती. बारा वाजून गेले गाडीचा पत्ता नाही! फोन केला, तर तो फोन उचलेना! नेहमी मी 'विक्रांत' टूर कडे गाडी बुक करतो. आजवर असे कधीच झाले नव्हते. माझ्या पोटात गोळा आला. काय झाले असेल? गाडीचा प्रॉब्लेम? ड्रॉयव्हरचा? का मालकाचा? तगमग सुरु झाली. ऑस्टिनची फ्लाईट मिस झाली तर? अहमदनगर ते मुंबई किमान सहा तास. स्वयंपाकाचा राडा नको म्हणून वाटेत जेवण्याचे ठरवले होते. त्यासाठी तास दीड तास लागणारच होता. शिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास, एअरपोर्टवर तीन तास वेळेआधी पोहचावे लागणार होते.