माझे डॉक्टर!---४--कर्णपिशाच्य!
त्याच काय झालं होत कि, नेहमी प्रमाणे एकदा सर्दी झाली. दोन दिवसांनी कानठळी बसली! औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. 'जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!' या युक्तीची सत्यता पटली! येथे मला माझ्या अनुभवानेच दगा दिला. कानाला ऐकू येईना! सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे! कानात बोळे घालून उपयोग नव्हता! म्हणजे डाव्या कानात रातकिड्यांची किरकिर तर, उजव्या कानात भिस्मिला खा यांची शहनाई! २४x ७ चालूच!