माझे डॉक्टर!---३-- दंतकथा!
"अपॉइंटमेंट आहे का?"
"नाही."
"डॉक्टर त्या शिवाय वेळ नाही देऊ शकत!" ती ततंगडी रिसेप्शनिस्ट मला सांगत होती.
"मला हे माहित नव्हतं! आणि माझ्या दातांना पण माहित नव्हतं, नसता मी आधी तुमची अपॉंटमेंट घेतली असती आणि मग, त्या कोपऱ्यातल्या दाढेला, 'बाई, आता तुला दुखायला हरकत नाही.' म्हणून सांगितलं असत!"
दाढदुखीने मी हैराण होतो अन हि बया अपॉंटमेंटच महत्व मला सांगत होती.
" तुझ्या डॉक्टरांना सांग, मला आत्ताच्या आत्ता त्यांची भेट हवी! सकाळी नऊ ते रात्री नऊ दवाखाना उघडा राहील म्हणून, रस्ताभर आडवी पाटी लावलीत. आणि मी त्या वेळेत आलोय!"
"अरे, तुम्ही दादागिरी करताय!"