तर अशी ही 2014 च्या शेवटी सुरु झालेली,2015-16 मध्ये उग्र रूप धारण केलेली,2017 मध्ये सहनीय आणि 2018च्या शेवटाला शेवटाकडे गेलेली ऍसिडिटी. मी त्यावर 2018मध्ये विजय मिळवला असं म्हणायला हरकत नाही.
ह्या सगळ्यातून मी काय शिकले?
जेव्हा मी ह्या सगळ्या आजाराचा मागोवा घेतला तेव्हा ह्या सगळ्यात मी कुठे चुकले ते बघितलं.
सगळ्यात आधी मी माझी छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारी चिडचिड बंद केली.
खरंतर असं एखादा आजार किंवा एखादं संकट पुढे आलं की आपला शारीरिक, मानसिक, भावनिक प्रत्येक पातळीवर एक संघर्ष सुरु असतो. ह्या सगळ्या घडणाऱ्या घटनांमुळे मी सगळ्या पातळीवर पुरती खचले होते. हे सगळं माझ्यासोबतच का?
हा प्रश्न मला सतत सतवायचं. हे सगळं कधी संपणार? असं एक ना अनेक कितीतरी प्रश्न माझ्या मनात यायचे आणि मन फार फार दुःखी व्हायचं.
ह्या सगळ्यात माझा ड्रायविंग फोर्स जर कोणी असेल तर तो माझा मुलगा होता.
तर सगळा रिपोर्टचा जथ्था घेऊन मी डॉक्टरांना भेटले. त्यांनी सगळे रिपोर्ट काळजीपूर्वक तपासले. सगळेच रिपोर्ट नॉर्मल होते. त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीरात कोठेही बिघाड नाहीय. म्हणजे लिव्हर वर सूज आलीय किंवा esophaugus मोठा आहे किंवा यातलं काहीही नाहीय. मग काय झालय? तर तुमच्या शरीरात काहीतरी functional प्रॉब्लेम झालाय. म्हणजे कदाचित माझी नर्व्हस सिस्टिम उद्विपीत होऊन माझ्या मेंदूला उलट्या करण्याचे चुकीचे संकेत देत होती म्हणून माझ्या शरीरात काहीही तसा बिघाड नसताना हा त्रास सुरु झालेला. म्हंटल बर ठीकय.
दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांना आधीच्या टेस्टचे रिपोर्ट्स दाखवले. माझ्या सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यानंतर मात्र सुरु झाला तो टेस्ट्स चा सपाटा. त्या डॉक्टरांनी पोटाचा MRI आणि SCAN, X-RAY, SONOGRAPHY, BERRIUM Follow through आणि सोबतीला 5-6 ब्लड टेस्ट्स असा टेस्ट्सचा सपाटाच लाऊन दिला. माझ्या आजाराचं समूळ निदान व्हावं हा त्या मागचा उद्देश होता.
"हॅलो ऋचा, काय जेवलीयेस दुपारचं?"
"आई, फक्त शहाळ्याचं पाणी प्यायलीय."