बॉडी लँग्वेज.
Submitted by बिथोवन on 22 September, 2020 - 04:22
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटलमध्ये सुपर ओव्हरमध्ये संपलेला क्रिकेटचा सामना तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल की मार्क्स स्टॉइनिसने मयांकच्या देहबोलीवर कसे बारीक लक्ष ठेवले आणि त्याला चूक करायला भाग पाडले. ३ चेंडूंत केवळ १ धाव आणि सामना जवळजवळ मयंकच्या हातात होता. 'मयंक आता चेंडू केवळ पुश करून एक धाव काढतो की चौकार-षटकाराने सामना संपवतो, हे पाहावे लागेल,' असे समालोचक म्हणाला पण तो फटका मारणार हे नक्की, हे त्याच्या देहबोलीत असणाऱ्या आक्रमणाची लक्षणे दिसत होती त्यावरून कोणीही कयास बांधला असता. पहिला डॉट बॉल गेला.
विषय:
शब्दखुणा: