किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटलमध्ये सुपर ओव्हरमध्ये संपलेला क्रिकेटचा सामना तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल की मार्क्स स्टॉइनिसने मयांकच्या देहबोलीवर कसे बारीक लक्ष ठेवले आणि त्याला चूक करायला भाग पाडले. ३ चेंडूंत केवळ १ धाव आणि सामना जवळजवळ मयंकच्या हातात होता. 'मयंक आता चेंडू केवळ पुश करून एक धाव काढतो की चौकार-षटकाराने सामना संपवतो, हे पाहावे लागेल,' असे समालोचक म्हणाला पण तो फटका मारणार हे नक्की, हे त्याच्या देहबोलीत असणाऱ्या आक्रमणाची लक्षणे दिसत होती त्यावरून कोणीही कयास बांधला असता. पहिला डॉट बॉल गेला. आता मयंकला दोन चेंडूंत अवघी एक धावा करायची होती आणि ८९ धावांवर खेळत असलेल्या मयंकसाठी इट वॉज इझी.
पण मयंकची बॉडी लँग्वेज जास्त आक्रमक झाली ती दिल्ली कॅपिटलचा गोलंदाज मार्क्स स्टॉइनिसनेही बरोबर ओळखली. त्याने फुलटॉस टाकला आणि मयंक जाळ्यात अडकला. त्याने बॅक पॉइंटवर उभ्या असलेल्या शिमरॉन हेटमायरच्या हातात कॅच दिला. नंतर येणाऱ्या निकोलस पूरनला धावा
करण्यासाठी फटका मारावा लागणारच हे उघड होते, जे स्टोयनिसला माहीत होते, त्याने
पुन्हा फुलटॉँस टाकला, पूरनने अपेक्षेनुसार फटका मारला आणि झेल दिला. सामना बरोबरीत सुटून सुपर ओव्हरला सुरुवात
झाली. त्यात किंग्ज इलेव्हनने, के एल राहुल ने मयंकला फलंदाजीला का पाठवले नाही हे एक कोडेच आहे. किंग्ज इलेव्हन त्याच्या फॉर्मचा फायदा घेऊ शकला असता आणि त्याला न पाठवून तो दिल्ली कॅपिटलकडून पराभूत झाला.
आपली बॉडी लँग्वेज आपल्याला कधी कधी असा दगा देते जर समोरचा वाचणारा त्यात माहीर असेल तर.
....