ताई (भाग १ ) ते अंतिम भाग
Submitted by मिरिंडा on 2 September, 2020 - 10:04
माझी आणि दीपाची ओळख जुनीच होती. कॉलेजची चार वर्षं ती माझी वर्गमैत्रिण असल्याने आम्ही खूपच जवळ आलो होतो. शेवटच्या वर्षी मी तिला प्रपोज केलं आणि तिनेही ते मान्य केले.फक्त तिची एकच अट होती की मी तिला घरी येऊन मागणी घालावी.अर्थात कोर्स पूर्ण झाला तरी कमवायला सुरुवात न झाल्याने सध्या6तरी आमची इच्छा दोघातच राहिली.तिच्या घरी मी दोनचारवेळा जाऊन आलो होतो. तिची आई लहानपणीच गेल्याने तिचा सांभाळ तिच्या पप्पांपेक्षा तिच्या ताईनेच केला होता. त्यामुळे तिला ताईचं कौतुक जास्त होतं.तिच्या घरात ताईची जरब जाणवायची, त्यामानाने तिचे पप्पा फारच फ्री होते.,,,,ताई दिसायला काळीसावळीच होती.
शब्दखुणा: