ताई (भाग १ ) ते अंतिम भाग

Submitted by मिरिंडा on 2 September, 2020 - 10:04

माझी आणि दीपाची ओळख जुनीच होती. कॉलेजची चार वर्षं ती माझी वर्गमैत्रिण असल्याने आम्ही खूपच जवळ आलो होतो. शेवटच्या वर्षी मी तिला प्रपोज केलं आणि तिनेही ते मान्य केले.फक्त तिची एकच अट होती की मी तिला घरी येऊन मागणी घालावी.अर्थात कोर्स पूर्ण झाला तरी कमवायला सुरुवात न झाल्याने सध्या6तरी आमची इच्छा दोघातच राहिली.तिच्या घरी मी दोनचारवेळा जाऊन आलो होतो. तिची आई लहानपणीच गेल्याने तिचा सांभाळ तिच्या पप्पांपेक्षा तिच्या ताईनेच केला होता. त्यामुळे तिला ताईचं कौतुक जास्त होतं.तिच्या घरात ताईची जरब जाणवायची, त्यामानाने तिचे पप्पा फारच फ्री होते.,,,,ताई दिसायला काळीसावळीच होती. तिचे खांदे थोडे रुंद ,नाक टोकदार ,ओठ जाडसर, डोळे मात्र स्वच्छ आणि टपोरे होते. घाटदार छाती, जिथे प्रथम लक्ष जात असे.आवाजात थोडी धार होती. पण मला पप्पांमुळे अजिबात टेन्शन नव्हतं.मी दीपा करता घरी येतो याची तिलाही कल्पना होती. ...
माझे आईवडील गावी होते. पण मला वडिलांनी वन बीएचके फ्लँट घेऊन दिला होता. त्यामुळे मला जागा घेण्याची गरज नव्हती.मी माझ्या विषयात डॉक्टरेट मिळवली. लवकरच मला एका कॉलेज मधे प्रोफेसरशिप मिळाली. दीपाला सांगितल्यावर ती म्हणाली , " तू तर लकीच आहेस बाबा. यात जवळजवळ चार वर्षांचा काळ लोटला होता. एक दिवस आम्ही चौपाटीवर बसलो असताना मी दीपाला विचारलं, " तुला विचारल़ तर राग येणार नाही ना . " तिने मानेनेच नाही म्हंटलं. मी चांचरतच विचारलं, " ताई लग्न अजून कसं झालं नाही..,,? " मला बरंच काही विचारायचं होतं. पण तिला आवडणार नाही असं वाटून मी थांबलो.
थोडा वेळ जाऊन देऊन दीपा म्हणाली, " ताई करिता चारपाच स्थळं पाहिली होती पण ती कुणालाच पसंत पडत नव्हती. का ते माहीत नाही. मुलगा पाहून गेल्यावर दोन चार दिवसातच उत्तर यायचं, आपलं जमेल असं वाटत नाही,किंवा पत्रिका जमत नाही अशी ठाशीव उत्तरं यायची. एकाच मुलानी ताई थोराड दिसते असं कळवलं होतं . ते ताईला लागलं. मग तिनी मुलं पाहण्याचं बंद केलं. ". .... मला प्रोफेसरशिप मिळाल्याने एक दिवस पेढे घेऊन मी दीपाच्या घरी गेलो. रविवार असल्याने पप्पा घरीच होते. दीपानी दार उघडलं. आश्चर्यानी ती म्हणाली, " हे काय ? अचानक ? बोलला नाहीस येणार आहेस ते. " त्यावर माझ्या खंवचट स्वभावानुसार मी म्हंटलं, " का पंचारती घेऊन आली असतीस की काय ? " तिला राग आला होता ,हे माझ्या लक्षात आलं. मी पप्पांकडे जाऊन त्यांना नमस्कार करीत म्हंटलं, " पेढे घ्या , मला सिद्धेश्वर कॉलेजमधे प्रोफेसरशिप मिळाली. " ते खूष होत म्हणाले, " वा ! सिद्णधेश्ववर म्हणजे प्रसिद्ध कॉलेज आहे. चला म्हणजे लग्नाचा मार्ग मोकळा झाला...छे हो . दीपाला जॉब लागला की मगच. " दीपा थोडी नाराज दिसली. पण मी लक्ष दिलं नाही. आतून ताई आल्या अणि त्यानी चहा बिस्किटं आणली. त्या मात्र बसल्या नाहीत. लगेचंच आत गेल्या. मी दीपाला खुणेनी ती आत का गेली असं विचारल्यावर लक्ष देऊ नकोस असे हातवारे केले. असो पप्पांनी विचारलं ," मला वाटतं मी आता तुमच्या घरी जाऊन लग्नाबद्दल विचारायला हरकत नाही . " अर्थातच मी त्याला नकार दिला. मी मागणी घालायची होती ना. इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन मी उठलो. तेवढ्यात आतून ताई येऊन म्हणाल्या, " परवा आमच्याकडे जेवायला यायला हरकत नाही तुम्हाला . " ते ऐकून पप्पा म्हणाले , " पाहिलत, ताईला खूपच जाणीव आहे. खरंच याच तुम्ही परवा रात्री. " त्यावर ताईच्या घाटदार छातीकडे पाहात मी पाहू म्हंटलं आणि निघालो. माझ्या डोळ्यांकडे पाहत दीपा माझ्या बरोबर खाली आली. मला झापत ती म्हणाली " तुला अगाऊपणानी बोलायला बरं जमतंय रे. काही जेवायला येण्याची गरज नाही ". मी मुकाट्यानी निघून गेलो.........
या घटनेला महिना दोन महिने झाले.मध्यंतरी दीपा भेटत राहिली. मी फारसा घरी जात नव्हतो . पण तिला त्याची पर्वा नव्हती.मी तिचाच आहे याबद्दल तिची खात्री झाली होती. मलाही तिच्याबद्दल तेवढंच आकर्षण होतं. दीपा भेठत राहिली तरी ताई बद्दल बोलणं टाळताना दिसली. मी ताईचा विषय काढल्यावर ती वैतागून म्हणाली, " तू हल्ली ताईची आठवण फार काढतोस. का बरं ? " ...." अगं सहजच. " ......"आपल्यामधे ताईला आणीत जाऊ नकोस.तिचं सगळंच वागणं चांगलं आहे असं नाही. " त्पावर मी विचारलं " नीट सांग ना . " तिने ते बोलणं सोडून दिलं. मीही जास्त जोर दिला नाही. पप्पाही ताईबद्दल जास्त बोलत नसत.एक दोन वेळा दीपा आणि मी फारच जवळ आलो..पण दीपाने सावरल्याने फारसा प्रॉब्लेम आला नाही. मी तर आता लग्नासाठी अधीर झालो होतो.
एक दिवस तिचा फोन आला . तिला जॉब मिळाला होता. सरकारी काम आउटसोर्स केलेल्या कंपनीकडून तिची निवड झाली होती. पण त्यासाठी तिला दूरच्या खेड्यात जावं लागणार होतं. अजून तरी केव्हा ते कळलेलं नव्हतं. दीपा आता जाणार या जाणिवेने तिचा सहवास मिळावा म्हणून तिला विचारल्याशिवाय सरप्राइज म्हणून शनिवारची सिनेमाची दोन तिकिटं काढली होती . एक दिवस तिचा फोन आला " मला तुझ्याशी काही बोलायचंय " मी तिला उत्साहाने शनिवारची शेवटच्या शोची दोन तिकिटं काढली असल्याचं सांगितल.... त्यावर ती फोन करून सांगते असं म्हणाली. तिचा फोन आला नाही. याचा अर्थ ती घरीच आहे असा मी घेतला. शनिवारी अचानक पाऊस पडला. थंड वाऱ्याबरोबर मातीचा गंध आणि ओलसरपणा वातावरणातील मादकता वाढवीत होता. आता मी तिकिटं काढल्याचा शहाणपणाच केला असं वाटू लागलं......... रात्रीचा शो आणि बरोबर दीपासारखी रूपगर्विता. ती रस्त्याने जाताना तिच्याकडे एकदा पाहणारा माणूस पुन्हा वळून पाहातच असे. ओव्हल शेप चेहरा , चकचकीत डोळे , थोडंसं अपरं नाक , नाजूक शिडशिडित बांधा , टोकदार पण नाजूक छाती आणि लाल गोरेपण तिला शोभून दिसत होतं. खरंतर आकर्षक वर्णन करायला मी काही लेखक नाही. यातच तुम्ही समजून जा. तिला जवळ घेतल्यावर तिचे ऊष्ण श्वास मला फार आवडायचे. मी फारच अधीर झालो होतो. हाफ डे असल्याने वेळ झाल्यास दीपाकडे राहण्याचा माझा मानस होता. मी दीपाला फोन लावूंन पाहिला. तीनचार वेळा लावल्यावरही " ये नंबर मौजूद नही है किंवा धिस नं. इज नौट रीचेबल " असली उत्तरं आल्याने माझा विरस झाला. घाईघाईने गाडी काढली. पावसाची रिपरिप चालूच होती . मला थंडीपेक्षा पावसाळा आवडतो. त्यात मादकता जास्त असते. आजूज्बाजूला फिरणाऱ्या स्त्रिया व मुली खूपच आकर्षक आणि मादक वाटतात. वातावरणाचा परिणाम दुसरं काय ....? दीपाच्या सोसायटीत एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे दोन पार्किंग्ज. तिचं घर माझ्या घरापासून सहासात किलोमिटर लांब होतं. तुम्हाला वाटत असेल की माझ्या आईवडिलांचा काहीच रोल नाही की काय . मी प्रत्येक खबर आईपर्यंत पोचवीत असे. अगदी दीपाचे फोटो आणि व्हीडीओ सुद्धा. आई खूष होती. इतकी सुंदर मुलगी आपल्या घरात येणार म्हंटल्यावर तिचे सारखे फोन यायचे. कधी कधी दीपा पण आईशी चॅटिंग करीत असे. मी जवळ जवळ अर्ध्या तासाने दीपाच्या सोसायटीत शिरलो. जाताना गजरा न्यायला विसरलो नव्हतो. कारण आमचा तो एक कार्यक्रम असायचा. थेटरच्या अंधारात तिच्या केसात गजरा माळणं आणि हक्काचं चुंबन घेणं‍ . याची तिलाही नशा येत असे. मी अजूनपर्यंत तरी स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करीत नसे. पण दीपाचे पप्पा मात्र करीत आणि मला ऑफरही करीत. पण माझा नकार पक्का असे. आट वाजत होते . मी दीपाच्या घरावरची बेल वाजवली. पप्पांनी दार उघडलं. आत शिरत मी दीपाबद्दल विचारलं आणि सिनेमाला जाणार असल्याचंही बोल्लो . पण पप्पांनी मात्र दीपाने जॉब जॉइन केल्याचं सांगितलं.. विरस आणि राग या दोन्ही भावना माझ्या चेहऱ्यावर दिसत असाव्यात. पप्पा म्हणाले, " आत्ताच तर सात वाजता गेली ती. तुम्हाला फोन करायचा खूप प्रयत्न केला तिनी. पण तुमचा फोन नॉट रीचेबल येत होता. " माझ्या खिशातला गजरा सुकत चालल्याचा मला भास झाला. माझे खांदे निराशेने पडले असावेत. पप्पा माझ्याजवळ येऊन खांद्यावर हात ठेवीत म्हणाले " टेक इत ईझी, अविनशराव. आपण तिला परत फोन लावू. " मी कपाळावरचा घाम पुसला. सगळी मादकता आणि आकर्षण एका क्षणात उतरलं..........

पप्पांनी दीपाला फोन लावायचा प्रयत्न केला. पण फोनने कसमच खाल्ली होती, की लागायचंच नाही म्हणून.दोन तीन वेळा प्रयत्न करुनही फोन लागेना. तेव्हा माझा पेशन्स संपला. मी चिडून म्हणालो, " पाहिलत, हे असंच ही करते. हेच माझ्या हातून झालं असतं तर ही काय वाट्टेल ते बोलल्ली असती मला. काय झालं होतं मला काल नाहीतर परवा भेटली असती तर. " ......माझा त्रागा त्यांना समजत होता. " खरतर, मला मिळणारं सूख नाहीसं झालं होतं .म्हणून माझी चिडचिड होतहोती.तेवढ्यात आतल्या दरवाज्यातून ताई बाहेर आल्या. मी रागान त्यांच्याकडे पाहिलं. एखाद्या तरुण माणसासमोर तमाशा करणं, कोणालाही आवडतं. तो तुमच्या इतकाच विचलीत होऊन तुमची बाजू उचलून धरतो. मी ताईंकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. अचानक माझं मन म्हणालं अरे तिला यायला सांग ना. दीपा नही तो दीपाकी ताईही सही. माणसाचं मन इतकं थर्ड क्लास विचार करीत असेल असं वाटलं नाही. मी जोरात मान झटकीत स्वत:शीच पुटपुटलो.मी काही असलं करणार नाही. ते पप्पांनी ऐकलं असावं. ते चटकन म्हणाले," अहो काय करणार नाही तुम्ही......? " मी काही नाही म्हणालो पण मग खिशातून तिकिटं काढून ती टीपॉय वर आपटत म्हणालो. " याचं काय करणार ,फेकून देऊ. ? या दीपाला अक्कलच नाही, " मनातला सुप्त विचार आता बलवान होत होता. आणि सभ्य विचार घाबरटपणाने विरले होते. मग मनाने सुचवलं ,अरे ती बघ तयार होऊन आल्ये. . मी ताईंकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. आज त्या जास्तच आकर्षक दिसत होत्या. पारदर्शक गुलाबी साडीच्या पदराखाली लपलेल्या घाटदार स्तनांनी आता मला चांगलीच फूस लावली होती. मग माझ्या मनात आलं, ताई आली तर तर तर .......???. ताईने मेकपही चांगला केला होता. एव्हाना त्यानी लावलेला गुलाबाचा मादक परफ्यूम खोलीभर दरवळू लागला. तेवढ्यात पप्पा म्हणाले, " असं काय करता ?, मी शेजारी विचारुन येतो, शेजारचे मि. आणि मिसेस दाबके जातायत का ते......" असं म्हणून तिकिटे उचलण्यासाठी ते खाली वाकले. पण ताईच मधे म्हणाल्या, " ते किती वयस्कर आहेत , आणि सिनमा तरुण जोडप्यांसाठी आहे. विचार करा जरा. " पप्पांनी तिकिटं खाली ठेवली.त्यावर मी तिकिटांकडे न पाहता उठलो आणि म्हणालो," चला मी निघतो . " त्याचा आश्चर्यकारक परिणाम होईल असं वाटलं नव्हतं.... अचानक ताई म्हणाल्या ," चला मी येते तुमच्या बरोबर... चालेल ना ? ..
पाठमोरा झालेला मी मान मागे वळवून आश्चर्यचकितपणे त्यांच्याकडे पाहू लागलो. पप्पाचं तोंड भीतीवजा आश्चर्याने उघडे राहिले. धक्का आणि अमान्य निर्णय याने त्यांची कुतर ओढ होताना मला जाणवली पण माझ्या मनासारखं घडत असल्याने मी भोळसट भाव तोंडावर आणले.जाणारा मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसलो. पप्पांच्या कपाळावर क्षणभरापुरती आलेली आठी माझ्या नजरेतून सुटली नाही. कदाचित मी पुन्हा येऊन बसलो हे त्यांना आवडलं नाही.किंबहुना मला विषयाचं वळण अपेक्षित होतं असं त्याना वाटल्याचं मला दिसलं.मी तसंच जायला हवं होतं , पण बरेच दिवसांबद्दलचं ताईंचं आकर्षण मला जास्त प्रबळ वाटलं. काहीतरी विचारायचं म्हणून मी ताईंना चांचरतच ( खोटेपणाने) विचारलं," तुम्ही खरंच येणार आहात ....? मी काय तिकिटं फाडून मोकळा होईन. " पण पप्पाचा विश्वास बसलेला मला दिसला नाही. त्यानी मान फिरवली. असं म् हणून तिकिटं काढून फाडायला घेतली. ताई पटकन माझ्या हातातून तिकिटं काढून घे म्हणाल्या, " मी म्हंटलं ना येईन म्हणून, होय की नाही हो पप्पा ? " ... ते मान खाली घालून न पटताही म्हणाले, " अं ! हो हो .."
कदाचित ताईला नाराज करणं त्याना परवडण्यासारखं नसावं. ताईंच्या अंगाचा पर्फ्युम मिश्रित वास माझ्या नाकात शिरला. पावसाला बाहेर उधाण आलं होतं. सुरवातीचाच पाऊस एवढ्या जोरात पडताना प्मोरथमच पाहत होतो.पप्पा समोर नसते तर मी ताईंना जवळ ओढल्याच असत्या. माझ्या अंगात ताई एखाद्या व्हायरस सारख्या भिनत चालल्या होत्या. ...... "ताई अतिशय practical वागते.
पहिल्या पासूनच ती तशी आहे. " पप्पा नक्की कोणत्या भावनेने बोलले मला कळलं नाही. मी म्हणालो, " चला तर मग आपल्याला निघायला हवं.
दहा मिनिटातच आम्ही निघालो. जाताना पप्पा म्हणाले " सांभाळून जा, आणि यायला उशीर होणार असेल तर आजची रात्र इथेच राहिलात तरी चालेल. चार खोल्या आहेत काय? " मला पप्पांची कींव आली.. ताईना नाराज करण्याची संधी ते हेतूपूर्वक घेत नव्हते. गाडी पर्यंत ताई माझ्या बरोबरीने चालत होत्या . त्यांच्या मांसल दंडाचा स्पर्श आणि घाटदार छातीचा होणारा स्पर्श मला घट्टपणा जाणवून देत होता. मी गाडी उघडली ताई माझ्या शेजारी फ्रंट सीटवर गाडीत बसल्या मी चोरट्य नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. त्या आनंदात दिसल्या त्याना घाम का येत होता कळलं नाही. त्या प्रथमच एका तरुण पुरुषा बरोबर बाहेर जात असाव्यात. तुम्ही म्हणाल ही काय पटावळ लावल्ये पुढे सांगा की. गाडी सुरू केली. ताईंना चोरट्या नजरेने मी न्याहाळत होतो. पंधरावीस मिनिटांमधे आम्ही थेटरजवळ पोहोचलो. गाडी लावली आणि कशीतरी लॉक करुन धावतच थेटरमधे शिरलो. मल्टिप्लेक्सचं नाव होतं. दी रेनी मल्टिप्लेक्स. आता ताईंचा हात हातात घेऊन मी बिनधास्त चालत होतं. अधूनमधून ताईंचा होणारा स्पर्श आणि गंध मला सुखावीत होता. या सगळ्यात माझ्या मनात एकदाही दीपाचा विचार आला नाही. चित्रपट मराठी होता. नाव होतं " रेशमी नाती " . आम्ही ऑडिटोरियम मधे पोहोचलो.आमच्या सिटा शेवटच्या लाईन मधली एका कोपऱ्यातल्या होत्या. सिटकडे जाताजाता माझा हात आता ताईंच्या गळ्यात गेला त्यांनीही माझ्या हातात हात गुंफला. आम्ही स्थानापन्न झालो. जेमतेम आम्ही धरुन चारपाचंच जोडपी होतो. अंधार झाला चित्रपट चालू झाला. मी अंधारातच ताईंच्या कानात कुजबुजलो. " ताई गजरा आणलाय , तुमच्या केसात मी माळला तर चालेल का ? " प्रतिक्रिया रागीट येईल या अपेक्षेने माझी छाती धडधडली. पण तसं काहीच झालं नाही. उलट ताई ला लाजत थोड्या पाठमोऱ्या होऊन म्हणाल्या ," माळा.... " माझा जीव भांड्यात पडला . तरीही थरथरत्या हाताने मी तो माळला. माझा हात त्यांच्या केसांवरुन गळ्यावर फिरला , मी तेवढ्यात त्यांच्या गळ्यावर आणि मानेवर ओठ टेकवले. केसातला वास आणि गुलाबाचा पर्फ्यूमयाने मी धुंद झालो. मी हलक्या हाताने त्यांचा चेहरा कुरवाळला. ताई रोमांचित होत होत्या . त्यांनी चेहरा हळूहळू माझ्याकडे वळवला आणि त्या माझ्या मिठीत विसावल्या . मी त्याची चुंबनं घेऊ लागलो . त्या एवढ्या उत्तेजित झाल्या की त्यांनी माझ्या केसात हात फिरवीत चुंबनं घेतली. माझ्या केसांतून त्या हात फिरवित राहिल्या. त्यांच्या ऊष्ण आणि अधीर श्वासांनी मला वेढलं. माझा एक हात आता त्यांच्या घाटदार तटतटलेल्या छातीवरुन फिरु लागला. मी त्यांना म्हणालो, " आय लव्ह यू ताई, आय रियली लव्ह यू...." " ताई म्हणू नका गायत्री म्हणा ," ..त्यावर त्या अधिकच बिलगल्या परंतू लगेचंच भानावर येऊन बाजूला पण झाल्या. लवकरच लाईट लागले. मध्यंतर झाला होता. इतर जोडपीही हळूहळू एकमेकांपासून बाजूला झाली.. त्यांना मी तुम्ही काही खाणार का म्हंटल्यावर नाही म्हणाल्या. तरीही बाहेर जाऊन दोन चोकोबार आणले..
उरलेला चित्रपट जेमतेमच पाहिला मध्यंतरा आधीची पुनराव्रुत्ती झालीच होती. चित्रपट संपला आम्ही बाहेर आलो . हातातला हात ताई पण सोडायला तयार नव्हत्या. वीसपंचवीस मिनिटांनी आम्ही घरी पोहोचलो. ताईंचा चेहरा समाधानाने उजळला होता. गेटजवळ गाडी थांबवून मी गुडबाय म्हणालो, " गुडबाय ताई, सॉरी , गायत्री ! " ......असं म्हणून मी निरोप घेण्यासाठी खाली उतरलो. त्यावर ती म्हणाली," हे काय आज इथे राहताय ना ..... ? " तिला जवळ घेत म्हणालो, " पुन्हा केव्हातरी. ..."
त्यावर ती म्हणाली," पुढच्या शनिवारी या. रात्री राहा सकाळी दीपा पण येईल. गप्पा वगैरे मारु तिला घेऊन बाहेर जेवायला जाऊ. " मी म्हंटलं ," हो ,पण दीपा रविवारी येणार असेल तर मीही रविवारी येईन. शनिवारी येऊन काय करु. " ....... " हो पण आत्ताचं राहणंउधार राहीलं, त्याचं काय ? आणि पप्पाना काय सांगू . या की आपण तिघे मिळून गप्पा मारु. मधेच तोडीत म्हंटलं ," पप्पा कशाला हवेत ? ते काय गप्पा मारणार ? पण दोघंच असलो तर बिघडणार आहे का ? .." ...."खरंतर तुम्ही आज राहायला पाहिजे होतं. " ती आग्रहाने म्हणाली. ती एवढा आग्रह का करीत होती मला समजेना , कदाचित मला ते पुढे कळावं अशी योजना असावी. खरं म्हणजे मी आजचं मरण पुढे ढकलंल होतं असं मला पुढे घडलेल्या घटनांवरुन वाटलं. असो मी तिला जवळ घेऊन ओझरता किस देऊन निघालो.... काय कोण जाणे पण तिच्या डोक्यात वेगळंच चाललं असावं असं वाटतं. असलं फीलिंग मला दीपा बरोबर कधीच आलं नाही कदाचित आम्ही.दोघांनी एकमेकाना स्वीकारलं असावं . नाहीतरी दीपाची आणि माझी चार वर्षांची जवळीक होती. त्यामुळे ती माझ्यात पूर्णपणे मिसळली होती. इथे तसं नव्हतं ताई व्हायरस होत्या. अचानक संसर्गा सारख्या आणि एकच दिवस जवळीकीला झालेला होता..एकमेकांची ओळख जेमतेमच झालेली. मी गाडी स्टार्ट केली आणि निघालो. ताईंनी हात हालवला. पण डोळे मात्र कठोर वाटले। घरी पोहोचलो तर दीड वाजला होता. अचानक फोन वाजला . दीपाचा फोन होता. ," अरे मी पुढच्या रविवारी घरी येणार आहे. म्हणजे माझा प्रोजेक्टही संपेल आणि मी तुझ्याबरोबर भटकायलाही फ्री असेन. " मी ठीक आहे म्हंटलं त्यावर ती म्हणाली, " ए, रागावलास ? अँम सॉरी यार. " मी फोन बंद करुन टाकला. तिचा दोनतीन वेळा फोन आला पण मी बंद केला. अंथरुणावर पडल्या पडल्या मला ताईंचे कठोर डोळे आठवले. अचानक मला दीपाशी प्रतारणा केल्यासारखं वाटलं. मी विचलित झालो. मी ताईंशी एवढा उत्तेजित होऊन का वागलो मला कळेना. पण तिचा प्रतिसादही मिळाला होता. ती तशी वखवखलेली वाटली. पुरुषी स्पर्शासाठी आसुसलेली. तरीही नामानिराळी होणारी. तिच्या कठोर डोळ्यांचा अर्थ मला असा लागला .
लवकरच मी झोपेच्या आधीन झालो. .......
... . .मस्त सकाळ झाली. नाही म्हंटलं तरी ताईंनी माझंं थोडं का होईना समाधान केलं होतं. मग मी सगळंच विसरलो आणि आईला फोन लावला. रविवारी माझा शिरस्ताच होता. .....

आईशी काही वेळ बोलल्यावर मला जरा बरं वाटलं. कामावरही माझं फारसं लक्ष नव्हतं. मला वाटतं मी दीपाशी फारच तोडून वागत होतो. चूक माझीच होती . ताईंच्या मोहात मीच पडलो होतो. अचानक माझ्या मनात आलं , जे घडलं त्याबद्दल पप्पाना आणि दीपाला तिनी सांगितलं तर. ताईला मी बजावायचं विसरलो होतो. मला अचानक हलकासा घाम येतोय असं वाटू लागलं. आणि असुरक्षितही ........मी दीपाला फोन लावायचा प्रयत्न करु लागलो. तिचा फोन बिझी आला. मग लक्षात आलं की आपण ताईंचा नंबरही घेतला नाही. कामात अतिशय काटेकोर वागणारा मी अशी सीली मिस्टेक कशी काय करु शकतो. पण पप्पांचा फोन नं. माझ्याकडे होता. पप्पाना फोन केला आणि त्याना कळलं असलं तर ? ..... ते भडकून काही बोलले तर आत्ताच दीपाशी लग्न मोडेल. आईचीही निराशा होईल. असो. दीपाला विचारलं नाही हे बरं झालं. तुला काय करायचाय ताईचा नंबर. रविवार कसातरी घालवला. सोमवारी कॉलेजमधे गेलो. गेल्याबरोबर प्रिन्सिपलने बोलावल्याचं समजलं. मला त्यांची भिती वाटत नसे. तरीही उत्सुकता होतीच. त्यांच्या शिफारशीनीच तर लागलो होतो. दरवाजा उघडून मी गुड मॉर्निंग म्हंटलं. मला बसायची खूण करीत म्हणाले," अवि, अरे घरी सगळं ठीक आहे ना ? मला तर तू disturb वाटतोस. मी चांचरत म्हणालो, " नाही तसं काही नही. " मी असं म्हणताच त्यांनी माझ्यापुढे फाईल टाकली आणि म्हणाले, मग हे काय आहे ....?". मीच पाठवलेली फाईल होती. फाईल मधले कागद सुरवातीला लिहीलेले होते. बाकी कागद कोरे होते. सरांनी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनी पाहिलं. " काय समजलं ना. दुसरं कोणाची फाईल असती तर मी काय केलं असतं माहिती आहे ना..... घेऊन जा ती फाईल अपडेट करुन पाठव. " मी फाईल घेऊन उठलो दरवाजाकडे वळलो आणि त्यानी विचारलं, " अवि, काही प्रॉब्लेम असेल तर सांग. पाहिजे तर थोडी रजा घे. " मी येस सर म्हणालो आणि बाहेर पडलो.
गेल्या आठवड्यापासून मी दीपा आणि तिच्या घरच्यांमधे फार गुंतलो होतो. त्यामुळे कामाचं महत्व मी विसरलो होतो. असं पुन्हा व्हायला नको.मला जरा वाईटच वाटलं. असो मी कामाकडे लक्ष दिलं.कॉलेजच्या वेळात तरी दीपाचे फोन कटाक्षानी टाळण्याचं मी ठरवलं. दिवस चांगला गेला. घरी आलो. आज अचानक एकटेपणाचा कंटाळा आला....... काहीतरी करायचं म्हणून मी टेबल आवरायला घेतलं. असली कामं दीपा आली कीच होत असतं. शिव्या देत देत सगळा फ्ल्याट स्वच्छ करायची. मग ती मुद्दाम म्हणायची ," व्यवस्थितपणा रक्तात असावा लागतो. तो शिकवून येत नाही समजलास ना ,,? मग तिची मी थट्टा करायचो, " तू काही बोललीस का, मला ऐकायला जरा कमी येतं......वगैरे " मग ती मला मारायला धावायची. असो. मी पुस्तकं आणि डायऱ्या नीट रचून आहे तिथेच ठेवल्या. माझी आई सांगायची, आवरायचं नसेल ना तर निदान आहेत त्या वस्तू नीट रचून तिथेच ठेवाव्यात, चांगलं दिसतं तरी. मग मी खण उघडले . तेही साफ करावेत म्हणून पण ओसंडून वाहत होते. माझी साफ करण्याची ताकद संपली होती. मुख्य म्हणजे मला जेवायला जायचं होतं. तरीही काही कार्ड पाहीली. त्यात एक हाताला लागलं ते दीपाच्या पप्पांचं होतं. वर त्यांचं नाव आणि नंबर होता.कोणतंही कार्ड उलटून पाहायचं ही मला लागलेली संवय होती. हो, सवयीवरुन आठवलं. मी दोन वर्षांपुर्वी सुटीच्या दिवसात महिना दीडमहिना एका खाजगी डिटेक्टिव्हडे कामाला होतो..तो सांगायचा हातात आलेला कागद म्हणजेच पुरावा उलटूनही बारकाईने पाहावा . काहीतरी जास्त माहिती मिळते . कधी फोन नं. असतो तर कधी हिशेब किंवा एखादं नाव खरडलेलं सापडतं. ते नेमकं महत्वाचं असतं. आत्ताही तेच झालं फोन नं आणि त्याला फुली काढलेली. मी ते कार्ड घाईघाईने खिशात टाकलं..खण तसेच बंद केले. आणि घर बंद करुन जेवायला निघालो. जिथे मी जेवायला जायचो तिथला मालक माझी गाडी असल्याने नमस्कार करीत माझे स्वागत करायचा. माझ्यासारखा गाडीवाला माणूस त्याच्या हॉटेलात जेवायला येतो ही त्याच्या द्रुष्टीने अभिमानाची गोष्ट असावी. मी ऑर्डर दिली. अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली . पप्पांच्या कार्डामागचा नंबर ताईंचा तर नाही. त्यांचाच असणार. मला ती कल्पना आवडली. माझा आनंद गगनात मावेना.मी कधी एकदा जेऊन घरी जातो आणि ताईंना नंबर लावतो, असं मला वाटलं. मी उतावीळपणावर ताबा ठेवला. मग तो दुसऱ्याच कोणाचा नंबर निघाला तर दुसऱ्या दिवसापासून माझं काम व्यवस्थित चालू झालं. दिवस फारच व्यग्रतेत गेला. घरी आलो आणि ताईंचा वाटणारा फोन लावला. " Hallo," ताईंचाच आवाज होता. मग मी नाटक केलं. " अरे ताई तुम्ही का ? सॉरी चुकून लागला. " असं म्हणून मी बंद करण्यासाठी टच करायच्या आतच ताई म्हणाल्या. " अविनाशराव, माझा नंबर कसा मिळाला ? " ...... मी तत्परतेने उत्तर दिले.." चुकून लागलाय. माझ्या सहाय्यकाला मी फोन लावीत होतो. तुम्हाला कसा काय लागला कोण जाणे..ठीक आहे मी बंद करतो. " त्यावर त्या घाईघाईने म्हणाल्या," थांबा ऐका. तुम्हाला येत्या शनिवारी न येता रविवारी आलात तरी चालेल. फक्त आमचा अलिबागला वाडा आहे तिकडे जायचंय , दीपालाही सांगितलंय.."....."अहो पण मला सोमवारी कॉलेजला जायचंय... " एक दिवस मारा की दांडी. माझ्यासाठी, .....माराल ना..? "........." बघतो ...." .आणि फोन बंद केला. नाहीतरी प्रिन्सिपल म्हणालेच आहेत, थोडी रजा घ्या.. मी जेवणासाठी बाहेर निघालो. ताईंसाठी मी दांडी मारणार . शक्यच नाही. मी जेऊन घरी आलो. पावसाचा जबरदस्त आवाज येत होता . मला चित्रपटाच्या दिवसाची आठवण झाली. पुन्हा एकदा ताईंची मिठी आठवली..पुरषी स्पर्शासाठी आसुसलेली ताई आणि इतर बरंचस वातावरण आठवू लागलं. मी एकप्रकारच्या नशेतच घरी पोहोचलो..आणि दीपाला फोन लावला. रात्रीचे नऊ वाजत होते. तिनी फोन उचलला नाही. कदाचित ती जेवत असावी. दीपाला पुन्हा फोन लावला. "अरे आत्ताच मी जेऊन आले. बोल"......" काय ग , आपल्याला अलिबागला जायचंय ? " ......... " तुला काय माहीत ? " ,,,,,,"अगं ताईना फोन केला होता तेव्हा त्या म्हणाल्या. " .... " पण तुला नंबर कोणी दिला ? ताई पासून सांभाळून राहा.." आणि तिने फोन बंद केला. तिला राग आला असावा. मी परत फोन केला पण तिनी कट् केला.मीच तिला सांगणार होतो. बरं झालं सांगितलं नाही ते . .....अलिबागला कशासाठ जायचं मला कळेना.अधून मधून दीपाचा फोन येत राहिला. पण तिलाही अलिबागला का जायचंय माहित नसावं.म्हणजे विचार ताईंचाच असावा. हा सापळा तर नसेल. काय माहित ,पण ताईंच्या प्रत्येक क्रुतीचा मला संशय येऊ लागला. सोमवारची सुटी मी मंजूर करुन घेतली. पण दीपाला आणि ताईनाही त्याबद्दल मुद्दामच बोललोनाही....शुक्रवारी रात्रीच मला दीपाचा फोन आला. ती रविवारी पहाटेच पोहोचत होती . तिने परत एकदा ताईंपासून दूर राहा असं कळवलं. शनिवारचा दिवस असाच लोळत घालवला. पावसामुळे बाहेर जाता येत नव्हतं.... मी ताईंच्या स्वप्नरंजनात मश्गुल होतो. मधेच एकदा पप्पांचा फोन आला. आता म्हातारा का फोन करीत होता कुणास ठाऊक. मी कंटाळून फोन घेतला.." येताय ना उद्या. सकाळी लवकरच या. दीपा पण पहाटेसच येणार आहे. " मी होकार दिला आणि फोन कट् केला. म्हातारा आणि मुलगी यांचा सापळा आहे तर. या आठवड्यातला एकही दिवस असा गेला नाही की ताईंच्या प्रणयाची आठवण झाली नाही. ताईंनी टाकलेला गळ माझ्या शरिरात खोल अडकला होता.
मी रविवारी सकाळी डॉट सात वाजता ताईंच्या घरी पोहोचलो. आता माझ्या बोलण्यात दीपाच्या घरी ऐवजी ताईंच्या घरी येऊ लागलं. दार अर्थातच ताईंनी उघडलं. ताई साडी नेसून तयार झालेल्या दिसल्या.
न्हायलेले सुगंधी केस खांद्यावरुन पुढे घेत त्या गोड हसल्या. पण त्याचं ते हास्य ओठांपुरतच मर्यादीत दिसलं. साधारणपणे माणूस आनंदानी हासतो तेव्हात्याचा सगळा चेहरा हसतो.मुख्य म्हणजे त्याचे डोळे हसतात. ताईंचं आत्ताचं हसणं डोळ्यांपर्यंत पोहोचलंच नव्हतं.त्यांचे डोळे स्थिर असून माझा वेध घेत होतेअसं वाटलं.अचानक मला दीपाला भेटून परत जावंस वाटलं . तेवढ्यात ताईंनी आपला पदर पुढे ओढूनपुन्हा खांद्यावरटाकला तेवढ्य अवधीत त्यांच्या घाटदार छातीचं ओझरतं दर्शन झालं. मी काही न न बोलता सोफ्यावर बसलो.आतून पप्पाआले.त्यांनी पुजा वगैरे केली असावी. ताई आत गेल्या.मला दीपाला भेटायचं होतं.मी पप्पाना दीपा
बद्दल विचारल. ती अजून झोपली असल्याचं ते म्हणाले.तेवढ्यात दीपा आली.

दीपाचा चेहरा मला पाहून फुलला होता. " अगं, लवकर तयार हो. आपल्याला निघायचंय ना .....? " मी इच्छा नसतानाही म्हणालो. मला तर तिनी उशीर केला आणि जाण्याचं रद्द झालं तर बरं होईल असं वाटत होतं. त्यावर पप्पाही म्हणाले, " दीपा जरा लवकर तयार हो बेटा. एव्हाना आपण निघायला पाहिजे होतं... " ते पुढे काही म्हणणार तेवढ्यात दीपा त्यांच्या जवळ जाऊन त्याना कवटाळीत म्हणाछली," हे काय हो पप्पा, तीन साडेतीनला तर मी आल्ये. नाही गेलं तर नाही का चालणार...." आता मात्र पप्पा माघार घेत म्हणाले, " तुला काय म्हणायचंय ना ते ताईला सांग. उगाच दोघी मला मधे घेऊ नका.,,," असं म्हणून ते जागचे उठले आणि आत गेले. तेशढ्यात ताई येत म्हणाल्या. ""दीपा तू अजून इथेच ,तू बाथरुममधे असायला हवीस. " मग तिला उठवून त्यानी आतल्या खोलीत ढकललं. ताई अगदी व्यवस्थित तयार झाल्या होत्या. आत्ता मात्र त्यांनी जाळीदार लाल रंगाचा टॉप आणि खाली निळी लेगिन्स घातली होती. आता तर त्यांची घाटदार छाती लाल चुन्नीने झांकली होती. पण छाती तगडबंद दिसत होती. लेगिन्समधून नितंब त्यांची गोलाई धाडसीपणे दाखवीत होते. माझं डोकं परत गरम होऊ लागलं .मी चोरट्या नजरेने
त्यांच्याकडे पाहिलं. दिवसा चेहरा थोडा पुरषी वाटत होता. पण त्या चांगल्याच आकर्षक दिसत होत्या.आत्ता जर का त्या इथे एकट्याच असत्या तर मी त्याना माझ्या कवेत नक्कीच घेतलं असतं. पुन्हा एकदा मला ताईंनी झपाटलं. माझ्याकडे न बघताच त्या म्हणाल्या , " तुम्ही थोडा चहा तरी घ्याल ना ? आता आवडती तुमची दीपा आलेली आहे... " ही सूचना होती का खंवचटपणा होता मला कळेना. म्हणजे आता जरा विचार काबूत ठेवा असं तर त्याना म्हणायचं नव्हतं. माझेच प्रश्न . माझीच उत्तरं. ..... माझ्याकडे थेट पाहात त्या कीचन मधे गेल्या..मला दीपा येईपर्यंत वाट पाहावी लागणार होती.. का कोण जाणे वातावरणावर परत ताईंचं गारुड पसरल्यासारखं मला वाटलं..... तेवढ्यात दीपा आली. ती तर
मेकप करुनच बाहेर आली. तिचं एक बरं होतं, खूप कमी वेळात ती तयार होत असे. ती चांगलीच आकर्षक दिसत होती. कदाचित आठवडाभर मी तिला पाहिलेली नसल्यामुळेही असेल. ती गोड हसली. ताई पण आकर्षक दिसायच्या पण त्याना प्रयत्न करावा लागत असे.काहीही असलं तरी ताईंची फिगर मादकता निर्माण करीत असे.लगेचंच ताईही बाहेर आल्या. गडद जांभळ्या रंगाची लिपस्टिक त्यांच्या विखारी स्वभावाला एखाद्या नागिणीसारखी शोभून दिसत होती. ताईंनी लावलेला चंदनाचा सेंट मात्र मला थोडा कळकट वाटला. कदाचित त्यांचा घाम त्यात मिसळला असावा. वातावरण थोडंसं सुखद आणि स्वप्नाळू होता होता मधेच पप्पांचा आवाज आला ," अरे चला चला निघायला हवं, व्हॉट आर वुई वेटिंग फॉर ? कमॉन गर्ल्स. .." असं आम्ही निघालो. गाडीशी पोहोचता पोहचताच पावसाची जोरदार सर आली. आणि आम्ही सगळे चांगलेच भिजलो. पाऊस थांबण्याची चिन्हे न दिसल्याने गाडी अनलॉक करुन ड्रायव्हिंग सीटवर बसता बसता एकदम ओरडलो, " चला जिथे जो उभा आहे तिथे त्याने बसून घ्यावे. असं म्हंटल्या बरोबर ताई माझ्याजवळ फ्रंट सीटवर बसल्या आणि दीपा आणि पप्पा मागे बसले. माझी अपेक्षा दीपा बसेल अशीच होती. मी सहज रिअर मिरर मधे पाहिलं. दीपाचा निराशेने आक्रसलेला चेहरा दिसला. तिच्या कपाळावर सूक्ष्म अठी होती. ताई माझ्या शेजारीच बसल्याने दिवसा उजेडी त्यांची छाती मला दिसत होती. थिएटरमधल्या अंधारात फक्त घाटदारपणाचा स्पर्श अनुभवला होता. त्यांच्या छातीची वर खाली होणारी लयबद्ध हालचाल माझ्यापासून अर्ध्या हाताच्या अंतरावर होती. ब्रेकवर हात ठेवता ठेवता छातीवर हात जाणार नाही याची खबरदारी मला दीपामुळे घेणं भाग होतं.त्या एकट्या असत्या तर....तर ?
असो . सगळ्यानाच गरम होत असावं. पाऊस जोरात पडत असला तरी काचा बंद असल्याने मधेच अचानक दीपाच्या ओरडण्याने जागा झालो. " अरे, तो एसी तरी फुल कर ना. जीव घुसमटतोय नुसता." अस म्हंटल्यावर मी घाबरुन एसी वाढवला.दीपाने झालेल्या निराशेला वाट करुन दिल्याचं समजलं. अधूनमधून मी चोरट्या नजरेने ताईंचं निरिक्षण करीत होतो. ताईंनी सेंट लावला होता तरीही त्यांचा घाम मिश्रीत दर्प मादकता वाढवीत होता.ताईही माझं निरिक्षण करीत होत्या. पण एक क्षण असा आला की दोघांचही निरिक्षण एकाच वेळेस चालल्याचं दोघांच्याही लक्षात आलं. मग मी मुद्दामच खिडकी बाहेर पाहत ड्रायव्हिंग करु लागलो. कोणीच कसं काहीच बोलत नाही ? याचं मला आश्चर्य वाटलं मी जोराय ब्रेक दाबून गाडी थांबवली. परिणामी ताई माझ्याजवळ आल्या आणि दीपा पप्पांजवळ. लगेचंच दीपा ओरडली ,"अरे काय झालं काय ? अशी काय गाडी चालवतोयस ? आणि आपण थांबलो कशाला ?" मी जरा जोरातच ओरडलो" आपण मयताला चाललोय का? एवढा सीरीयसनेस कशाला ? दोन तरुणी बरोबर असताना स्मशानशांतता का ? चला मी गाडी फिरवतो. " , त्यावर वाईट वाटून दीपा म्हणाली " सॉरी,,," मग मीच म्हंटलं " ठीक आहे , कोणाला जागा बदलायच्या असतील तर पाहा. " ताईंची इच्छा दिसली नाही . दीपानी नाद सोडला असावा. मलाही ताई जवळ हव्या होत्या. पंधरावीस मिनिटं मग दोघींची बडबड चालू राहिली. मी एका रिसॉर्ट कम हॉटेलजवळ गाडी थांबवली आणि म्हंटलं " बघा कोणाला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर. असं म्हणून मी खाली उतरलो.
माझ्या मागोमाग सगळेच उतरले. प्रथम मी आणि दीपा बरोबर चालत निघालो. ताई आणि पप्पा सावकाश चालत येत होते. मी दीपाकडे पाहिलं तिचा चेहरा पुष्कळसा सौम्य वाटला. तिचे डोळे थोडे जागरणाने थकल्यासारखे दिसले. मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून माझ्याकडे ओढली. तिला असं आवडत असल्याचं दिसलं मी तिला जवळ घेऊन दाबली. तिने पण माझ्या खाद्यावर मान टेकवली. तिचा चेहरा कुरवाळल्यावर तिला बरं वाटलेलं दिसलं. मी मागे वळून पाहिलं. ताई फक्त पाहात होत्या. हॉटेलमधे शिरल्यावर मी मुद्दामच दीपाजवळ बसलो.
वेगवेगळ्या ऑर्डर्स सगळ्यांनी मागवल्या . हेतू हा की ज्याला जे आवडेल ते तो खाऊ शकेल. ताईंनी दीपाच्या प्लेटमधला वडा घेतला मी मुद्दामच ताईंच्या प्लेटमधल्या सामोशाचा तुकडा घेतला. आणि दीपाकडे पाहिँलं
तिच्या चेहऱ्यावर आठी पडली नाही. उलट ती हसली. आता मी तिच्या जवळ होतो. त्यामुळे काहीही केलं तरी तिला चालणार असावं. असा मी तर्क काढला. बायकाना नवरा फक्त जवळ म्हणजे त्यांच्या मालकी हक्काच्या परिसरात असावा लागतो. पप्पा चुपचाप खात होते. त्याना खरोखरीची भूक लागली असावी. त्यांनीही दीपाच्या प्लेटमधला वडा उचलला, ते पाहूऩ दीपा म्हणाली, " मी खाऊ ना काहीतरी ....? " पप्पा म् हणाले," माझ्या प्लेटमधलं खा. मग तर झालं ... " तेवढ्यात टेबलाखालच्या माझ्या पायाला कसला तरी गरम स्पर्श झाला. मी हळूच पाहिलं तो ताईंचा पाय होता. त्या अर्थपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहात होत्या. मग मीही माझा पाय त्यांच्या पायावरुन फिरवला. त्यांना तो जाणवल्याचे दिसले. मग मीच म्हंटलं " चला निघायला हवं. अजून दीडेक तास तरी आहे. माळशेजचा पायथा फार जवळ नाही आहे. त्यात गावात घर शोधणं म्हणजे अर्धा एक तास नक्की. आपण साडे पाचच्या आत पोहोचत नाही हे नक्की. " आम्ही गाडीकडे निघालो। तेव्हा गाडीत बसत पप्पा म्हणाले," आहो गावात शिरलो की माहिती असल्याने वाडा लवकरच सापडेल. तरीही गेल्या वर्ष सहा महिन्यात जाणं झालं नाही.."
साडेतीन वाजत होते. पाऊस थांबला होता. दूरवर कुठेतरी काळे ढग दिसत होते. चकचकीत ऊन पडलं होतं. ओलसर थंड वातावरण आता वाढत होतं. वाराही घूंघूं.. घूंघूं... आवाज करीत वाहत होता. वरखाली जाणारा डोंगराळ रस्ता आता दोन्ही बाजूवर असलेल्या लालबुंद मातीच्या अंगावर वाढलेलं हिरवंगार दाट जंगल मधूनच जाणारं रस्त्याचं काळं कार्पेट भराभर मागे टाकीत आम्ही चाललो होतो. आता एसी बंद केल्याने दोन खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. वारा सगळ्यांचेच केस उडवीत होता . ताई मधेच म्हणाल्या खिडक्या बंद करा आणि एसी चालू करा. आता दीपाची तिच्या प्रोजेक्ट बद्दल नॉन स्टॉप बडबड चालू होती. ताईंनी स्वत: भोवती डोक्यावरुन चुन्नी गुंडाळून घेतली होती. ते पाहून मी विचारलं, " ताई थंडी लागत असेल तर एसी बंद करुन हीटर चालू करु का ? " , असं विचारल्यावर ताई चिडल्या सारख्या दिसल्या आणि म्हणाल्या ," काहीतरीच काय ,,,,," मी मिरर मधून दीपाकडे पाहिलं. हसत होती. मग पंधरावीस मिनिटं कोणीच काही बोललं नाही. दीपा आणि पप्पा पेंगत होते. ते लवकरच निद्राधीन झाले. ते जाणवून मी थेट ताईंकडे पाहिलं. एसीच्या वाऱ्याने उडणाऱ्या चुन्नीला धरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ताईंच्या मला जवळ असलेला खांदा कुरवाळीत म्हंटलं, " आज इतकं मौनव्रतसं धरलयत ? रागावलात का ? "
माझ्या हातात हात गुंफत ताई फक्त लाजल्या. तेवढ्यात दुसऱ्या हातात धरलेलं चुन्नीचं टोकं उडालं आणि त्यांची घाटदार सताड उघडी पडली.
मी हळूच माझा हात त्यांच्या चेहऱ्यावरुन फिरवला. ताईंचं चेहरा उत्तेजित होऊन लाल झाला. मग मी माझा हात काढून घेतला. ताईंनी उघडी दिसणारी छाती झाकायचा जराही प्रयत्न कला नाही. ड्रायव्हिंगमुळे माझा दुसरा हात पूर्ण गुंतला असल्याने मला काहीच करता येत नव्हतं. असं वाटत होतं गाडी थांबवावी आणि ताईंना मिठीत ओढून प्रणयाच्या सगळ्या पायऱ्या ओलांडून ताईंच्या गरम श्वासात हरवून जावं. पण हे शक्य नाही जाणवून मी ड्रायव्हिंग कडे लक्ष केंद्रित केलं. आता अर्ध्या तासावर भिरणे गाव आलं असताना मी ताईना म्हंटलं " आलं तुमचं गाव." अजूनही पप्पा आणि पेंगत होते. मी स्पीड कमी करीत गाडी साईडला लावली. ते पाहून ताई म्हणाल्या, " हे काय गाडी का थांबवलीत. ,,? " ताईंची छाती अजूनही सताड उघडी होती. मी पटकन ताईना खेचून माझ्याअडे ओढल्या. त्याबरोबर त्या माझ्या मिठीत आल्या. मी त्यानी धक्का देऊन मला बाजूला ढकलले. नेमके त्याच वेळेस पप्पा जागे झाले..खडबडून म्हणाले ," पोचलो आपण ,,,? " त्यावर मी म्हणालो ," गाडी गरम झाल्ये म्हणून थांबवल्ये. " मी बाहेर येऊन बॉनेट उघडले. गाडी खरच तापली होती. मग थंड पाणी घेऊन गाडीत घातलं. मी थोडं इकडे तिकडे केलं बॉनेट बंद करुन गाडी स्टार्ट केली. आता दीपाही उठली होती. पप्पानी इकडे तिकडे पाहून ओळखलं आणि म्हणाले, " अरे हेच तर भिरणे गाव, उजव्याबाजूला. गाडी उजवकडे घ्या. " मी गाडी उजवीकडे वळवली. मग सरळगाडी घेऊन दहा मिनिटे गेल्यावर जंगलातच पप्पा महणाले, " हा काय आला की वाडा , घ्या डावीकडे, ते पाहा गेट. "
... समोर एक गंजलेले प्रचंड गेट होतं. खाली उतरुन पप्पानी ते उघडलं. मी गाडी आत घातली. पाच वाजून गेले होते. संधीप्रकाशात काळ्या चिऱ्यांमधे बाधलेला एक दुमजली वाडा एखाद्या राक्षसा सारखा बसला होता. आम्ही सगळेच खाली उतरलो. समोरुन काटकिट्या अंगाचा एक उंच माणूस आला आणि त्यानी पप्पाना नमस्कार केला. आमचं सामान उचलून तो वाड्याकडे चालू लागला. आम्हीही त्याच्या मागोमाग वाड्यात प्रवेश केला

का कोण जाणे मला हा वाडा अजिबात आवडला नाही. एक तर आतला पिवळा प्रकाश. आणि मुख्य दरवाजाचा आकार. तो मोठा होता पण आकार बदामासारखा. इतकाच फरक की बदामाचा खालचा भाग टोकदार असतो. इथे मात्र दोन्ही बाजू एकदम थांबल्यासारख्या वाटत होत्या. त्यात सरळ उंबरा बसवलेला होता. कोणाचं आर्किटेक्चर होतं कोण जाणे. मी इकडे तिकडे पाहात आत शिरलो. बाहेरचा हॉल रेल्वे प्ल्ँटफॉर्म सारखा मोठा वाटला. आम्ही सगळेच जण किडा मुंग्यांचा पुचका जणू एका कोपऱ्यात जमला आहे असं वाटलं. सीलिंग पंधरा ते वीस फूट उंचीचं. म्हणजे जिन्यांच्या पायऱ्या पण बऱ्याच असणार. हॉलला एकूण सहा खिडक्या सगळ्याच बदामाच्या आकाराच्या. आर्किटेक्टला बदामाचं बरंच आकर्षण असावं. लांबच्या एका बदामी दरवाज्यातून साठीकडे झुकलेली स्त्री आली. तिने सगळ्याना नमस्कार करुन म्हणाली, " चहा की काही थंड पेय्य घेणार की जेवणच करणार." मी थंड पेय्य घेणार असल्याचं म्हंटलं . तिथल्याच सोफ्यावर बसलो. माझं निरीक्षण चालूच होतं, ते पाहून पप्पा म्हणाले, " वाडा दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वीचा असावा. आम्ही इथले आता चौथे मालक. हे सगळं विचित्र बांधलंय खरं पण ते तोडून नवीन बांधायचं म्हंटलं तर काही कोट घालवावे लागतील. आणि इथे कोण नेहमीसाठी राहणार आहे. ...नाही का ? " . पतिसादाकरिता मी फक्त हुंकार भरला. इथे बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या असतील. एकाच फेरीत काहीच पाहणं होणार नाही. तेवढ्यात मोठा ग्लासभरुन आंब्याचं थंडगार पन्हं राधाबाईंनी आणून ठेवलं. बाहेर काळोख पसरला होता. राधाबाईंनी एक दोन उघड्या खिडक्या आणि बदामी दरवाज्या बंद करीत म्हंटलं, " या जंगलातून वेगवेगळे किडे आणि सरपटणारे प्राणी आले ना तर त्याना हुसकून लावताना जीव वरखाली होईल. आणि रात्री झोप लागणार नाही ती वेगळीच." असं म्हणून त्या आत गेल्या. .... ताई म्हणाल्या, " चला मी तुम्हाला वाडा आणि त्याबरोबर तुमची खोलीही. म्हणजे जेवल्यावर विश्रांती घेऊ शकाल. " असं म्हणून त्या उठल्या पण मी हाललो नाही . त्या एका भिंतीत कपाटासारखी दारं असलेला दरवाज्या उघडू लागल्या. दारं उघडल्यावर भिंतीतला एक जिना दिसू लागला. जो वरच्या मजल्यावर जात आसावा. . मी हालत नाही असं पाहून आधीच मोठे असलेले डोळे आणखिन मोठे करीत ताई म्हणाल्या, " अरे हो, दीपा आली पाहिजे बरोबर, नाही का ? " त्यावर दीपा लगेचंच म्हणाली, " त्याला तू घेऊन गेलीस हरकत नाही." मी उठलो आणि ताईंच्या मागे गेलो. जिन्यावरही पिवळा अंधुक प्रकाश होताच. ......एका वेळेला एकच माणूस जाऊ शकेल एवढाच रुंद जिना. मला आश्चर्य वाटतं, एरवी प्रशस्तपणाची कमाल करणारे हे जुने लोक जिन्यांच्या बाबत एवढे कंजूसपणा का करीत असत. हे ताईंना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. मी आणि ताईंंमधे आता एका पायरीचंच अंतर होतं. ताई टॉर्च पेटवून म्हणाल्या ," नीट चाला, पुढे पायऱ्या वळतायत म्हणून तिरक्या आणि अधिक अरुंद होतायत. आता ताईंना अक्षरश : चिकटून मी चाललो होतो. आमच्याच सावल्या जिन्यावर पडत असल्याने टॉर्च लागत होता. ताईंचा लावलेला सेंट संपला असावा आणि त्यांच्या मादक घामाचा दर्प मला वेडं करीत होता. ताईंना आत्ताच मागून पकडावं म्हणून मी माझे दोन्ही हात उचलले पण ताईंना वळणारी पायरी नीट न दिसल्याने किंवा त्यानी हे मुद्दाम केलं असावं म्हणून म्हणा, ताईंचा तोल गेला आणि त्या माझ्या अंगावर पडल्याने माझ्या खांद्यावर दोन्ही हात टेकून त्यानी तोल सांभाळला , मी त्यांंना घट्ट धरुन ठेवल्या. आता माझे ओठ आपसूकच त्यांच्या घट्ट छातीवर टेकले मी त्यांच्या घट्ट छातीला आलिंगन दिले. त्याही माझा चेहरा त्यांच्या छातीवर दाबू लागल्या . जे नैसर्गिक आणि आवश्यक असतं ते तोल साभाळल्यावर तिथेच थांबतं. पण पुढचं दाबणं आणि मी घेत असलेली छातीची चुंबनं थाबेनात. आता ताईंनी माझा चेहरा त्यांच्या ओठांसाठी वर केला आणि ओठ टेकवणार एवढ्यात त्या ओरडल्या, अहो आपण दोघेही पडू. " त्यांचे डोळे जिन्याच्या पायथ्याकडे होते. मी मान फिरवून खाली पाहीलं . शेवटच्या पायरीवर दीपा उभी होती. तिला पण वर यायचं असावं........
तिचे डोळे रागाने विस्फारलेले दिसले. कोणालाही तसंच वाटलं असतं. ताई पुढे निघून गेल्या. मी दीपा येईस्तोवर तिथेच थांबलो. माझ्याजवळ आल्या आल्या मला म्हणाली ," काय चाललं होतं तुमचं ,, मी सांगितलं होतं ना ताईपासून दूर राहा म्हणून. " मी तिला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग आम्ही दोघेही दहाबारा वाकड्या पायऱ्या चढून एकदाचे वरच्या मजल्यावर आलो....ताई वरुन टॉर्च दाखवीत उभ्या होत्या. धक्का दायक गोष्ट म्हणजे वरती जिन्यातल्या दिव्याचा अंधुक प्रकाश पसरला होता. प्रकाश कसला अंधारच जास्ती. तेवढ्यात ताईंनी समोरच्याच खोलीचं कुलुप उघडलं आत शिरुन लाइट ऑन केला. पुन्हा आतल्या पिवळ्या प्रकाशात एक प्रशस्त खोली दिसली जिच्या समोरच्या भिंतींपर्यंत उजेड जेमतेमच पोहोचला होता. खोली कसली एक मोठा दिवाणखानाच होता. भिंती मळकट पिवळ्या रंगाच्या असाव्यात.ल़ाबच्या कोपऱ्यात एक बेड दिसला. जवळच एक टेबल खुर्ची आणि वॉर्डरोब होतं. दोघांचेही रंग काळपट चॉकलेटी होते. दीपा आत न शिरता बाहेरच उभी होती. ते पाहून मी तिला आत बोलावले त्यावर ती म्हणाली " मी बाजूच्या खोल्या उघडून बघते. " असं म्हणून तिनी ताईंकडून चाव्या घेतल्या. ती गेल्यावर ताई म्हणाल्या, " ही तुमची खोली. वॉशरुम जिन्याच्या डाव्या बाजूला आहे. " आता त्या माझ्या जवळ येत म्हणाल्या, " या नं, मघाशी अर्धवट राहिलेलं काम पुरं करु या. आता दीपा एवढ्यात येत नाही असं म्हणून त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकले. त्यांचे ऊष्ण श्वास आणि वासनेनी आसुसलेले गरम ओठ माझ्या ओठांवर टेकले. माझा हात त्यांच्या पाठीवरुन फिरत होता. त्या वेड्यासारखी माझी चुंबनं घेऊ लागल्या. दरवाज्या उघडा असल्याची जाणीव होऊन दीपा येईल की काय या भीतीने मी त्याना दूर लोटणार एवढ्यात दीपाने दरवाज्यात येऊन हाक मारली. " ताई त्या खोलीतला लाईट लागत नाहीये. ..बल्ब गेलाय का ? " ते ऐकून मी ताईंना जोरात दूर लोटलं. त्या तोल सावरीत दरवाज्याजवळ गेल्या . आणि दीपाच्याहातात आणखी एक चावी खुपशीत म्हणाल्या, " ती रुम माझ्यासाठी ठेव. तू पुढची रुम उघड " दीपा गेली. तिला काही दिसलं नसावं असं वाटतं. किंवा दिसूनही तिने न दिसल्यासारखं केलं असावं. मी थोडा घाबरलो, आता ती मला फैलावर घेणार हे नक्की. ताई आत वळत म्हणाल्या, " सबंध रात्र आपल्याला आहे. तुम्ही फ्रेश होऊन या जेवण तयारच असेल. माझी रुम तुमच्या बाजूचीच आहे. " आणि मिश्किल हसत निघून गेल्या.
मी दरवाज्या आतून लावून घेतला आणि समोरची खिडकी उघडली. आत मधे थोडा थोडा येणारा पावसाचा आवाज एकदम वाढला.
पाऊस बराच पडत असावा.सहज म्हणून मी खिडकीबाहेर पाहिलं. काळोखामधे दाटीवाटीने उभे असलेले मोठाले व्रुक्ष माझ्यावर नजर ठेवून असावेत असं वाटलं. खोलीतला थंडगार ओलसरपणा अंगावर काटा आणीत होता.समोरच असलेलं वॉर्डरोब मी उघडण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण त्याची दारं जरा देखिल हालली नाहीत. त्याला कुलुप नव्हतं. असलं तरी अंगचं असावं. ताईंकडे किल्ल्या कोण मागणार. मी दारं ओढून पाहायचा पुन्हा प्रयत्न करुन पाहिला. दारं मालकाशी भलतीच इमानदार आहेत असं वाटलं. पप्पानीही कधी उघडायचा प्रयत्न केला नसावा. पुरुषाचा स्वभाव शिकाऱ्या सारखा असतो. एखाद्या गोष्टीच्या तो मागे पडला तर ती तडीस नेईपर्यंत सोडत नाही. आजूबाजूला दारं उचकटण्यासाठी काही मिळतंय का ते पाहू लागलो. आता तुम्ही म्हणाल मला हे नसते उपद्व्याप कोणी सांगितले होते. मुकाट्यानी जेवायचं आणी झोपायचं सोडून. पण पुरषी स्वभाव दुसरं काय ? मी सगळीकडे शोधलं पण काहीही सपडलं नाही. शेवटी टेबलाचे खण कसेतरी उघडले. आत एक हातभर लांबीचा लोखंडी तुकडा , चामड्याचे हातमोजे ,एक लहान घमेलं, काही खिळे इ. सापडलं. का कोणजाणे चामड्याच्या हात मोज्यांचा संबंध कोणत्या तरी गुन्ह्याशी असावा असं वाटलं. एकूण माझं वाड्यासंबंधी मत चांगलं नसल्यामुळे असं झालं असावं. मी लोखंडाचा तुकडा घेऊन वॉर्डरोबकडे निघालो. कदाचित जेवणाचं बोलावण़ येईल असं वाटलं म्हणून मी तो तुकडा परत टेबलाच्या खणात ठेवला. तेवढ्यात दरवाज्या वाजला. दारात राधाबाई, " खाली चला सायब जेवण तयार आहे. " त्या नम्रपणे म्हणाल्या. त्या गेल्यावर कपडे बदलून जेवायला निघणार एवढ्यात दीपा आली. " चल जेवायला...ताईला नको ना पाठवू बोलवायला. " मी काहीतरीच काय अशा अर्थी हात उडवले. जेणेकरुन खेळीमेळीचं वातावरण राहील. याचा अर्थ तिनी मगाशी पाहिलं होतं तर . मी तिच्या मागोमाग निमूटपणे खालच्या हॉलमधे आलो. टेबलावरच्या उदबत्त्यांच्यावासाने मन प्रसन्न झाले. आम्ही दोघानी अशा रातीने खुर्च्या पकडल्या की माझा आणि ताईंचा
संबंधच येणार नाही. टेबल आठ माणसांचं आणि आम्ही चौघेच..ताईंचा चेहरा थोडा आक्रसल्यासारखा दिसला. जेवण अतिशय सुंदर आणि चविष्ट होतं. मी शाकाहारी असल्याने जेवणात एकही मांसाहारी पदार्थ नव्हता. जेवणं शांततेत चालू होती. अचानक घुं घुं घुं .....घूंघूं.... घूं असा घुबडाचा आवाज आला. मी जरा दचकलो. हा अपशकूनच होता. मी बाकीच्यांकडे पाहिलं. पण ते जसं काही घडलंच नाही असे जेवत होते..हा आवाज अशुभ आहे हे मला बाकीच्याना सांगावसं वाटत होतं. आस्ते आस्ते जेवणं झाली. राधाबाईंनी प्रत्येकाच्या हातावर बडीशेप ठेवली. मग सगळेच रेळल्यासारखे सोफ्यांवर बसले. अचानक ताई म्हणाल्या ," इथे असे घुबडाचे आवाज कॉमन आहेत. दिवसासुद्धा येतात. " काही वेळान मी उठलो. दीपाकडे पाहून म्हणालो," ,चला, मला झोप येत्ये. " .... " ,नक्की झोपायलाच जाताय ना ? की काही शोध घ्यायचाय. ? " ताई खंवचटपणे म्हणाल्या. मी काही शोधतोय हे याना कसं माहीत. ताईंचा आगाऊपणा मला आवडेनासा झाला..काही न बोलता मी जिन्याकडे वळलो. खोलीत जाऊन मी दरवाज्या लावून घेतला. टेबलाच्या खणातला लोखंडी तुकडा काढून मी तो वॉर्डरोबच्या बंद दरवाज्यात घालून जोर लावू लागलो. दोनचार वेळा प्रयत्न केला पण उघडलं नाही. मी विचार केला आपल्याला तरी काय करायचंय हे सगळं करुन ,गुमान झोपलो तर...... माझी नजर वॉर्डरोबच्या खालच्या भागात बरोबर मधे एक लाकडाची खिटी दिसली. मी ती आधी पाहिली असती तर ते केव्हाच उघडले असते. मी जोर लावून ती उघडली तर ती तुटून खाली पडली. मी कपाळावर हात मारुन घेतला. आता तर आशाच नाहीशी झाली. मी पुन्हा लोखंडी तुकड्याने प्रयत्न केला. दोन अडीच इंच जाडीचा दरवाज्या थोडा हालला.. मग पुन्हा जोर लावून पाहिलि आता ते हळूहळू उघडू लागला. पुन्हा पाच सात मिनिटांच्या झटापटीने तो उघडला. आत काही जरीकाठाच्या लुगड्याच्या घड्या , एक घमेलं,काही काठ्या ,चारदोन मुखवटे, काळ्या रंगाचे डगले, ते बाजूला केल्यावर माझा हात एका गोलसर वस्तूवरुन फिरला मी ती बाहेर ओढली, ती एक मानवी कवटी होती. मी घाबरुन ती खाली टाकली. त्यावर ती भंगली, दोन तुकडे आणि भुसा झालेली कवटी पुन्हा उचलणं मला किळसवाणं वाटू लागलं. ,,,,,,, हळूहळू मी भानावर आलो, पण कोणीतरी दरवाज्या वाजवीत होतं. माझ्या अंगाला थरथर सुटली आणि मानेवरुन घामाचा ओघळ वाहत माझ्या निकर पर्यंत आला. ,,,,,,

.......घाबरून मी अर्धवट फुटलेली कवटी उचलून प्रथम वार्ड रोबच्या खणात टाकली. तिचा भुसा कसातरी गोळा करून वार्डरोबच्या बाजूच्या खणात फेकला. दरवाज्या उघडला दारात ताई उभ्या‍ . मी पटकन टाईम पाहिला साडेदहा होत होते. आत येत ताई म्हणाल्या , " टाईम बघू नका. दीपा आत्ताच झोपायला गेल्ये." ताई आता साडीमध्ये होत्या. त्या आत शिरल्या. एकूणच सर्व वातावरण पाहून म्हणाल्या, " काय शोधाशोध चालल्ये . तुम्हा पीएचडी वाल्यांची नजर सारखी काही ना काही तरी शोधत असते. " असं म्हणून त्यांनी दरवाज्या लावला. माझी छाती धडकली. आता ही बाई काय करते असा भाव माझ्या तोंडावर असावा . हे ओळखून त्या म्हणाल्या, " अहो मी काही तुम्हाला खात नाही " त्यावर मी बेड्वर बैठक मारली. त्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या. अचानक त्या टेबलाकडे वळल्या. मग माझ्याकडे पाठ वळवून म्हणाल्या, " तुम्हाला एक गोष्ट विचारू का ......? " प्रश्न अर्धवट सोडून माझ्याकडे पाहू लागल्या. हुं. बोला असे म्हणून त्या काय विचारतात या भीतीने त्यांच्याकडे पाहात राहिलो. पण त्या बोलेनात. मग मी त्यांच्याकडे आलो आणि म्ह्णालो, ..... " काय विचायचंय विचार ना गायत्री , " मी मुद्दामच एकेरी उल्लेख केला. तिने खालच्या मानेनेच विचारले, " तुम्ही आता लग्न करणार असालच नाही का ? घाबरू नका मी दीपाला सिनेमा बद्दल काहीच सागितलं नाही...... मग काय ठरलंय तुमचं. " असं म्हणत त्या जवळ आल्या. स्वतःच्या सेंटचा वास मला जाणवेल असं पाहात त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवीत त्यांचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. आता त्या किस करण्याच्या अतरावर होत्या. पण मी स्वतःला सावरलं. आणि बाजूला झालो. त्यांच्या डोळ्यात निराशा आणि रागही डोकावला. त्या ज्या ज्या वेळेल खूण करतील तेव्हा तेव्हा मी बळी पडलं पाहिजे असं त्याना वाटत असावं. मग थोड्या लांब गेल्या आणि पाठमोऱ्या वळत दरवाज्या कडे वळल्या. मला वाटलं माझी सुटका झाली. आत्ता मला दीपा पाहिजे होती. आम्ही दोघेही आठवडाभर दूर होतो.. पण माझा अंदाज चुकला. त्या पाठमोऱ्या अवस्थेत ब्लाऊज काढू लागल्या. मला समजेना. त्या पुढे काय करण्याच्या विचारात आहेत या आश्चर्यात असताना त्यांनी ब्लाऊज पूर्ण काढला होता. पदर अजून तसाच होता. आता त्या ब्रेसियरचे हूक काढू लागल्या. ब्रेसियर आणि ब्लाऊज काढून खाली ठेवीत त्यांनी पदरही काढला. मी उत्तेजित झालो. त्याना कधी एकदा कवेत घेतोय असे वाटून मी माझे दोन्ही हात उचलून त्यांच्याकडे पाऊल टाकलं. बरोबर त्याचवेळी त्या माझ्याकडे वळल्या. डाव्या हातातल्या मोबाइलचा टौर्च त्यांनी स्वतःच्या घाटदार छाती कडे वळवला. पदराखाली झांकलेली त्यांची ताठर काळी निपल्स दिसत होती.. आता त्यांनी हळू हळू पदर बाजूला करायला सुरुवात केली. खोलितला उजेड तसा मंदच होता. त्यांची घट्ट छाती आता पूर्ण पणे उघडी झाली. मी मॅडसारखा छातीकडे पाहत असताना त्यांनी दोन्ही स्तनांमधला भाग उघडला आणि म्हणाल्या, " तुम्ही यू रिअली लव्ह मी म्हणाला होतात ना ? " आणि त्यात असलेल्या चार पाच कोडाच्या तेजाने चमकणाऱ्या डागांकडे पाहून म्हणाल्या, " माझ्याशी लग्न कराल ? ...... " मला ते पाहून चांगलाच धक्का बसला होता.
माझा स्तंभित झालेला चेहरा पाहून त्यांना आणि मला एकाच वेळी कळून चुकलं की माझी विकेट गेलेली आहे. ......आपली छाती तशीच उघडी ठेवीत एकेक पाऊल माझ्याकडे टाकीत त्या म्हणाल्या, " बघा , आत्ता जर तुम्ही दीपाला सोडलीत तर निदान तीन चार वर्ष तरी तिच लग्न होणं शक्य नाही. म्हणजे ती फ्र्स्ट्रेट होणार. विचार करा . मी तर लग्नाची बायको असेनच पण ती पण तुमच्या सोबत असेल. म्हणजे समजतंय ना ..... एकाच द्गडात दोन पक्षी . ........ " आता त्या जवळ येत चालल्या होत्या. त्यां च्या घाटदार छातीवरचे काळेभोर निपल्स आता ताठ होऊ लागले होते. आता त्या माझ्यापासून हाताच्या अंतरावर होत्या. त्या काय म्हणत होत्या ते माझ्या आस्ते आस्ते लक्षात आलं. मला प्रथम चीड आली. मग राग आणि एखाद दोन कानफटात मारण्याची इच्छा झाली.. माझा हात उठणार एवढ्यात त्या म्हणाल्या , " म्हणजे आजकालच्या भाषेत , बाय वन गेट वन फ्री. " ... आणि त्या हासत सुटलया . माझा हात तत्क्षणीच उठला आणि त्यांच्या गालावर जाऊन फाटकन पडला. मला वाटलं अपमान आणि राग यांनी त्या मागे सरकतील. पण तसं न होता त्यांनी मला घट्ट मिठी मारून माझं चुंबन घेण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या. मला मागे सारकवीत त्यांनी मला बेडबर उताणे पाडले आणि उघड्या छातीनेच त्या माझ्या अंगावर चढल्या. आणि हसू लागल्या. मला त्यांची किळस येऊ लागली. आपल्या बहिणीबद्दल अस खालच्या पातळीचं विधान करणारी ती स्त्री मला आवडेनाशी झाली. मग त्या हिडिसपण हासू लागल्या. त्या बरोबर त्यांचे थोडे लांबट आणि चमकणारे सुळे मला दिसले. मी घाबरून मागे सरकलो. अचानक त्यांच्या अंगात पाशवी बळ संचारलं.त्यांच्या ओठांच्या कोपऱ्यात लाळ जमा झालेली दिसली. मला अत्यंत घ्रुणा आली. मी जिवानिशी जोर लावून त्याना मागे ढकलल्या. चपळाईने उठलो आणि दरवाज्या उघडला. बाहेर येऊन मी दीपाच्या दरवाज्यावर थापा मारू लागलो. ताई आत नक्की काय करीत होत्या ते समजत नव्हते.. आता दीपाने दरवाज्या उघडण्याची गरज होती पण ती झोपेत असावी. मी आता वेड्यासारखा दरवाज्या ठोकीत होतो. दीपाला कसली एवढी झोप लागली होती , कोण जाणे. फाटकन दरवाज्या उघडला. आणि ताई बाहेर पडल्या. मी येताना दरवाज्या बाहेरून लावून घेताला असता तर बरं झालं असतं असं वाटू लागलं. ताईंनी आता कपडे नीट घातले होते. पण त्यांच्या एका हातात सुरा होता. आणि त्या विकट हास्य करीत माझ्याकडे येऊ लागल्या. अजून दीपानी दरवाज्या उघडला नव्हता. ताईंच्या ओठाच्या कोपऱ्यातून लाळ गळत असलेली दिसली. जणू एखादा पिसाळलेला कुत्राच . त्या जवळ आल्या आणि सुरा असलेला हात वर करून माझ्यावर उगारला. मी चपळाईने त्यांचा हात घट्ट पकडून सुरा काढून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. अजूनही दीपाने दरवाज्या उघडला नव्हता. तेवड्यात मला ढकलीत ताई भिंतीच्या दुसऱ्या टोकाला आल्या . आणि तिथे त्यानी वरच्या कोनाड्यात हात घालून तो तेथील कळ दाबली असावी खडर्र र्र ..... असा आवाज करीत भिंतीतला एक दरवाज्या उघडला आणि मी कोणत्यातरी मार्गामध्ये पडलो. ताईंनी त्या बोळकंडीतला लाईट लावला. आणी मला ढकलून आत सरकवण्याचा पयत्न करू लागल्या. मागून अचानक पप्पांचा आवाज आला , " गायत्री सोड त्याना. .... " पण गायत्री ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हती. पप्पांच्या मऊ बोलण्याचा ताईंवर काहीही परिणाम झाला नाही. पप्पांनी ताईंची सत्ता फार वर्षांपूर्वीच मानलेली होती. आता विरोधाचा काही उपयोग होणार नव्हता. अचानक दीपाने दरवाज्या उघडला. ती ओरडली, " ताई सोड त्याला..... " आणि तिच्या हातातला सुरा काढण्याचा पयत्न करू लागली. ताईंचं लक्ष विचलित झालेलं पाहून मी त्यांना जोरात धक्का दिला आणि त्या बोळकंडी बाहेर पडल्या. मी चपळाईने उठून त्या बोळकंडी बाहेर आलो.. आता पुन्हा मागे लागल्या. मी पटकन दीपाच्या खोलीत शिरून दार लावून घेतले.......

मी खिडकी लावून झोपायचा प्रयत्न करु लागलो. झोपेनी न येण्याचं ठरवलं असावं. मधेच मला डॉक्टर तिडबिडेंची आठवण झाली. कोण हा तिडबिडे ....? माझं डोकं चालेना. हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. मला परत परत वाटू लागलं. आपण आत्ताच निघावं . कुठून तरी ताई खोलीतून बाहेर आली तर ? .........माझी आज रजाच होती. पण घरी वेळेवर गेलो तर विश्रांती तरी होईल. मी दीपाच्या खोलीत होतो. दीपा कुठे होती आणि पप्पा ? ताईला माझ्या खोलीत डांबलेलं होतं. माणसाला अतिशांतता आणि कशाचीही जाग नसलेली जागा आवडत नाही. मी अंथरुणावर पडलो होतो. किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. मला लहानशी डुलकी लागली असावी त्यात स्वप्न पडलं . कोणीतरी एका मोठ्या हॉलचं कुलुप तोडीत होतं. लवकरच मला असं दिसलं की तो एक रानटी लोकांचा जमाव होता. त्यात माझी भूमिका मात्र समजत नव्हती. लांबून कुठूनतरी ढोल बडवण्याचा आवाज येत होता. हळूहळू कुलपावरचे घाव ऐकू येण्याऐवजी काहीतरी खरडल्याचा, घासल्याचा आवाज आता येत होता. अचानक स्वप्न नाहीसं झालं. दीर्घ मोठे श्वास कमी होत होते. मी कूस बदलली. अजूनही खरडण्याचा आवाज येत होता. तो माझ्या अगदी जवळून म्हणजे माझ्या जवळच्या भिंतीतून येत असावा. माझी झोप आता चाळवली आणि नाहीशी झाली . मी डोळे उघडले. अंधारात खोलीतल्या सामानाच्य कडा अर्धवट दिसत होत्या. आता भिंतीतला आवाज मोठा झाला. मी घाबरुन ताडकन् उठून बसलो. अंधारात मी " कोण आहे तिकडे ,,,,? असा प्रश्न फेकला. उत्तरादाखल फक्त खरडणं थांबलं. मी लाईट लावला. पिवळ्या उजेडात मला काहीच दिसेना. आता परत हळू आवाजात खरडणं चालू झालं. मी सावकाश त्या भिंतीला कान लावून उभा राहिलो. आवाज अचानक बंद झाला. .....भिंतीवर लहान आवाजात धक्के बसू लागले. मी काठीसारखं हत्यार शोधत होतो. आता माझी पाठ आवाजाकडे वळली होती.
मी टेबलाचा खण उघडण्याचा जोरदार प्रयत्न करीत होतो. तेवढ्यात भिंतीतला एक जुनाट दरवाज्या खडर्र.खट्....खडखड ...आवाज करीत उघडला. त्याचबरोबर जिन्यावरच्या पायऱ्यांवरुन ताईंचा निष्प्राण देह गडगडत मी उभा होतो तिथे येऊन धडकला. त्यांची छाती रक्ताने भरली होती. आणि जमिनीवरही आता रक्ताचं लहानसं डबकं तयार होत होतं. ताईंच्या डाव्या छातीवर धाररदार सुरा भोसकलेला दिसत होता. मी सहज म्हणून सुरा काढायचा प्रयत्न करुन पाहिला पण छातीत घुसलेला सुरा मला काढता येईना. माझ्या आयुष्यात मी प्रथमच नुकताच खून झालेला देह जवळून पाहत होतो.... तेवढ्यात जिन्यावरुन ताईंना ओलांडून पप्पा खोलीत आले. त्यांच्या हातात पिस्तूल होतं.त्यांच्या हातात काल मी पाहिलेले चामड्याचे मोजे होते.माझे विस्तारलेले डोळ्यांकडे पाहत ते म्हणाले, " तुम्हाला धक्का बसणं स्वभाविक आहे. पण माझं हे प्लानिंग फार जुनं होतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल ,पिस्तुल असताना मी सुरा का वापरला ? " ,........ मला पप्पांचा राग आला होता, मी बोलत नाही असं पाहून टेबलाजवळच्या खुर्चीवर बसत म्हणाले," काय आहे ना अविनाशराव, ह्या ताईनी डॉमिनेट करुन माझं चैन नाहीसं केलं होतं. अचानक मला तुम्हाला ताईनी वाड्यावर बोलवल्याचं समजलं .तिचं प्लानिंग मला माहित होतं. डॉ.तिडबिडेना बोलवून ती तुमच्या कमरेच्या खालचा भाग तीन चार वर्षाच्या मुलाएवढा करुन, तुम्हाला गुलाम बनवणार होती. आणि इथेच ठेवणार होती. हे डॉक्टर तिडबिडे कोण तुमच्या मनात आलं असेलच नाही का ? ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांचं संशोधन अमेरिकन सरकार विकत घेणार आहे. दीपा इतक्यात उठणार नाही. त्यामुळे आपल्याला आता वेळच वेळ आहे. तुमच्या शंकाही नाहीशा होतील.... काय? " .......आता मात्र मला म्हाताऱ्याचा फार राग आला. माझ्या मनात वेगळेच विचार चाललेले पाहून त्यानी पिस्तुलाचं टोक माझ्याकडे वळवलं. तरीही धीर करुन मी म्हंटलं, " समजा मी पोलिसाना बोलावलं तर..... ?" थोडा वेळ तसाच जाऊन देत माझ्याकडे रोखून बघत पप्पा महणाले. " काय आहे ना अविनाशराव तुम्ही त्या सुऱ्याला हात लावलाय, आणि मी माझं काम हातमोजे घालून केलंय. ठसे तुमचे मिळतील. बोलवाच तुम्ही पोलिसाना. आणी दुसरं म्हणजे तुम्ही तिच्या बरोबर सिनेमाला गेला होतात. तिनी ते दीपाला सांगीन म्हंटल्यावर तुम्हाला भिती वाटली. तसं झालं तर हीही जाईल आणि तीही जाईल या भितीनी तुम्ही दीपा आवडत असल्यानं हिला संपवायचा प्रयत्न केलात, हे मी सांगू शकतो. बोलवा, बोलवाच तुम्ही पोलिसाना. ताईनी तुम्हाला चांगलंच नादी लावलं होतं. आणि तुम्ही इथं यायला तयार झालात, अशी सुवर्णसंधी मी कशी सोडीन, सांगा. " ........ माझ्या कपाळावर आणि मानेवर घामाचे थेंब जमू लागले होते. मला एक प्रकारची थरथर सुटली.
पप्पांचा बिनधास्तपणा पाहून आणि लक्ष विचलित झालेले पाहून त्यांच्या हातावर हल्ला करीत हातातलं पिस्तूल खेचून घेण्याचा प्रयत्न केला. ते सावध झाले आणि मला दरवाज्याकडे ढकलून त्यांनी तोल सांभाळीत हातातलं पिस्तूल माझ्यावर रोखीत म्हंटलं, " आता तुम्ही ताईला खेचून जिन्याजवळ आणून खाली न्यायला मला मदत करा. अंगणात खड्डे खोदा. ". मी ताईंच्या खांद्याखाली हात घालून ओढायला सुरुवात केली. त्यांचं वजन मुळातच जास्त असावं. एवढं वजन ओढण्याची मला संवय नव्हती. असल्या गोष्टी चित्रपटातच पाहिल्या होत्या. ताई तसूभरही हलल्या नाहीत. ते पाहून पप्पा पिस्तूल खिशात ठेवीत म्हणाले" अजिबात चलाखी करायची नाही समजलं ना . चला लावा जोर ." त्यांनी ताईंना पायांकडून उचलंल. जिन्यापर्यंत नेताना आम्हाला चांगलाच दम लागला. पप्पाना कसं अडकवायचं माझा प्लान चालूच राहिला. काहीतरी विचारायचंं म्हणून विचारलं, " पपा, राधाबाईना चुकवून कसं करणार ....?" त्यानी यावर आधीच विचार केला असावा. " अहो राधाबाईचीही मी सोय लावलीच असेल ना ....? , तुम्हाला काय वाटतं . " , सहजपणे मी विचारलं, " त्याना तुम्ही घरी पाठवलंच असेल. " ..... " हो पाठवलं की फक्त देवाच्या घरी. कारण त्याना स्वत:चं घर नाही. आधीच्या मालकानीच त्याना ठेवल्या होत्या. त्या विनापाश , विनापत्य,अनाथ विधवा. या जगात त्यांचा एकही नातेवाईक नाही.. विकत घेतल्यावर त्याना आणि सखारामला(म्हणजे सामान नेणारा ) आम्ही इथेच राहायला सांगितलं. राधाबाईंनी तर पाय धरले. कारण त्याना कुठेही आसरा नव्हता नवरा गेल्यापासून त्या वाड्याच्या सेवेतच होत्या. म्हणून तर दोन खड्डे खोदावे लागतील. उगाच का तुमची मदत हव्ये मला ? " , मी शहारलो. " म्हणजे त्यानाही तुम्ही मारलंत तर. " ..... " बिच्चारी, मला तिला मारणं भाग होतं हो. तसे तिचे माझ्याशी बायकोसारखे संबंध होतेच. पण काय आहे ना , माणूस खुनाच्या मामल्यात वफादार कसा राहणार , नाही का? तिला उगाच त्रास नको म्हणून तिची सुटका केली. " अचानक मला वॉशरुम जायची जाणीव झाली. पप्पाना सांगितल्यावर ते म्हणाले, " ओके बट नो चीटिंग हं. ते वॉशरुमच्या बाहेर उभे राहिले . तिथेच त्यानी चूक केली. मी आत जाऊन फ्लश सोडला आणि खिशातला मोबाईल काढून पोलिसाना फोन केला. " बोला, कोण ? ... "..... मी पुन्हा एकदा फ्लश चालू केला. " मी अविनाश सातपुते बोलतोय. इथे खून झालाय, बदामी वाडा. " आणि मी फोन कट केला . पँटची झिप लावतो न लावतो तोच पपा आत शिरले.
आणि पिसतूल माझ्या असं म्हणून त्यानी माझा मोबाईल खेचून घेतला. वॉशरुमच्या बाहेर आलो. आता ताईंना त्या नागमोडी अरुंद जिन्यावरुन वाड्याच्या पुढच्या भा गात घेऊन जायचं असावं. की मागच्या भागात ?. आता मी जिन्याच्या पायरीवर उभा होतो. ताईंच्या काखेत हात घालून उचलण्याचा प्रयत्न मी करीत होतो. आणि पप्पा ताईंचे पाय उचलीत म्हणाले, " पायरी सांभाळा, नाहीतर मागच्या पडलात तर तुम्हाला खोक पडायची. इथे तिडबिडेंशिवाय डॉक्टर नाही..डॉक्टरसाठी तालुक्याला जावं लागतं. अजून राधाबाईंना उचलायच्येत. तरुण असून तुमच्यात जोर फार कमी आहे. " मी त्यांचं बोलणं मनावर घतलं नाही. किती वाजत होते याचा अंदाज मला येत नव्हता. आम्ही ताईंना घेऊन उतरायला सुरुवात केली. ताई हळूहळू जड होत चालल्या होत्या.. आता टाइम त्यानाच विचारावा लागेल.. तेवढ्यात हॉलमधल्या घड्याळानी तीन ठोके दिले..माझं अंग आता चांगलंच दुखू लागलं. लावीत ओरडले, " पोलिसाना बोलवताय ? "
कसेतरी आम्ही हॉलमधे आलो..ताईंना खाली ठेवल्या. दीपा जागी व्हावी असं मला सारखं वाटत होतं.मी इकडे तिकडे पाहत होतो. ते पाहून पप्पा म्हणाले, " चहा घेणार का ,थोडा ,,,? एवढे कष्ट केल्यावर थोडं उत्तेजक पेय्य हवंच , नाही का ? तुम्ही दारु पीत नाही मला माहिती आहे. " मी काहीच बोलत नाही असं पाहून ते पुढे म्हणाले, " ,चहा मीच बनवणार आहे. आणि काय आहे जाणारा जातोच हो. त्यामुळे जिवंत माणसाचं रुटीन थोडंच बदलंतय ? ". न राहवून मी म्हंटलं ," तुमच्या हातून दोन खून झालेले आहेत. दोन दोन प्रेतं समोर असताना, हे कसं सुचतं हो तुम्हाला. ? " मला आता उजाडेपर्यंत टाईमपास करायचा होता. दिवसाउजेडी पोलिस येण्याची जास्त शक्यता होती.माझं बोलणं त्याना फारसं आवडलं नाही. पण काही न बोलता ते कीचनकडे वळले. मी त्यांच्यामागे जाऊ लागलो. त्यानी कीचनमधला लाईट लावला. तिथे असलेली राधाबाईंची बॉडी गायब झालेली दिसली. ते न आवडून म्हणाले ," या राधाबाई गेल्या कुठे ? इथेच तर पडल्या होत्या. रक्ताचे डाग सगळीकडे दिसत होते. त्यांचा माग काढीत पप्पा त्याना शोधत होते. हातातलं पिस्तूल माझ्याकडे वळवून म्हणाले " चला मला राधाबाईना शोधायला मदत करा. हिला गोळीच घालायला हवी होती. " आम्ही शोधू लागलो. रक्ताचे मागच्या दरवाज्याशी येऊन दिसेनासे झाले. दरवाज्या अर्धवट उघडा होता. त्या नक्कीच मागच्या दरवाज्याने पळाल्या असणार. पण गेल्या कुठे . मागच्या दरवाज्यातून बाहेर जाणार एवढ्यात, मला त्यामागे मेन फ्यूज दिसले. पप्पा बाहेर पडले..मला त्यांनी बाहेर यायला सांगितलं. माझ्या वाड्यातले लाईट घालवले आणि पटकन् दरवाज्या लावून घेतला तर ते बाहेर अडकतील. मी विजेच्यावेगाने दरवाज्या लावून घेतला आणि आतून एकदाची कडी घातली. अंगच्या कुलुपावर अवलंबून राहण्यात अर्थ नव्हता. पप्पांकडे चावी असण्याची शक्यता होती . बाहेरुन त्यांचा करडा आवाज आला. " अविनाश दरवाज्या उघड. नाहीतर, बिजागिरींवर घालून दरवाज्या मैडून आत येईन. मग तर तू मेलासच समज. आता त्यानी घाणेरड्या शिव्या घालायला सुरुवात केली. ते आत आले तर त्याना दिसू नये म्हणून मी मेन फ्यूज काढून घेतले..आता आत पूर्ण अंधार झाला होता.
आता माझ्या जवळ मोबाईलही नव्हता की मी दीपाला किंवा पोलिसाना करु शकलो असतो.पप्पांच्या शिव्या चालूच होत्या त्यात त्यांनी एक गोळी तिचा दणदणीत आवाज वाडाभर घुमला. गोळीचा आवाज मी कधीच ऐकला नव्हता. आता मी त्यांच्याकडे लक्ष न देता . ओट्यावरची काडेपेटी शोधू लागलो. कीचनची रचना मला माहीत नव्हती. एक दोन वेळा भिंतीवर आपटलो ही. पप्पाचा नेम चुकला असावा. कारण दरवाज्या अजूनही शाबूत होता. काडेपेटी असायलाच हवी. कारण खेडेगावात गँस कसा असेल. कदाचित असेलही. मी कीचन पाहिलंच नव्हतं. असो . ओट्याखालच्या खणात अंदाजाने हात फिरवला. दोन चार डबे मोठ्ठा आवाज करीत खाली पडले. ते ऐकून पप्पांची शिव्यांची सरबत्ती पुन्हा चालू झाली. बाजूच्या दुसऱ्या खणात हात फिरवला पुन्हा डबे पडले . पण यावेळेस मात्र काडेपेटी पडल्यासारखा आवाज आला. कीचनच्या लादीवर पडून हात फिरवायला सुरुवात केली. अचानक एक बंडल हाताला लागलं. तर ते काडेपेट्यांचा बॉक्स निघाला. मी थरथरत्याहातानी काडी ओढली मला हॉलकडे जाण्याचा मार्ग दिसला . पुन्हा काढी ओढून जिना शोधला . कडी विझली. परत अंधार झाला. मी अंदाजानीच जिन्याकडे चाललो होतो. अचानक पायाखाली काय आलं कळलं नाही. अडखळून मी आडवा झालो. हातातला काडेपेटीचा बॉक्स फेला गेला. कसातरी उभं राहून मी तो बॉक्स शोधला. आणि काडी ओढून पाहिली. तर,,,,,जे पाहिलं त्यानी मी शहारलो. काडीच्या अंधुक प्रकाशात मला ताईंचा फुगलेला चेहरा आणि त्यांची माझ्याकडे पाहणारी कधी न बंद नहोणारी तटस्थ सताड नजर दिसली. पप्पांचा आवाज येत नव्हता. ते नक्कीच पुढच्या दरवाज्याने प्रयत्न करतील. मी हळूहळू तिकडे चालू लागलो. आता मलाच लाईटाची गरज भासू लागली . पण काडेपेटीतल्या काड्यांवर मी मुख्य दरवाज्या गाठला. बाप रे, केवढा दम लागला. प्लँपफॉर्मच्या आकाराएवढा हॉल मोठा आहे विसरलोच होतो.काडी ओढून पाहिलं आतले बोल्ट लावलेले होते. मी निश्चिंत झालो. पुन्हा मागे वळून जिन्याकडे जाताना दुसरं कोणीतरी आत आहे, असं जाणवलं. अंगाला घाम सुटला . कोण असेल ? पप्पा, राधाबाई का ताई , का दीपा .... ?

माझ्या तोंडाला कोरड पडू लागली. कोरड्या तोंडानेच मी ओरडलो, " क्...क्... कोण आहे तिकडे......." पण माझा आवाज दोन फुटांपर्यंतही गेला नसावा. माझ्या खिशात अजूनही मेन फ्यूज होते. मोबाईलही जवळ नव्हता. अतिशय थंड शांततेत पावसाचा तेवढा लागलेला एकसूर भयाण शांततेचा भंग करीत होता. खिडक्या सगळ्याच बंद असल्याने बाहेरची हवा आत येत नव्हती. हॉलमधलं डायनिंग टेबलही बरंच दूर होतं. तिथे पाणी असलं तर......? आत पुन्हा कोणाच्यातरी फिरण्याची खसफस ऐकू आली. मला भीती वाटू लागली. मला स्वत:च्या नेभळटपणाचा राग आला. जरा बरं वाटलं. रागाने भितीवर नियंत्रण आणलं. तात्पुरत्या निर्माण झालेल्या बळावर मी भराभर पावले टाकली. भीती परत यायच्या आत मला जाऊन मेन फ्यूज लावायचे होते. अचानक माझ्यासमोरचा अंधार गडद झाला. समोरुन कोणीतरी येत होतं. .......पण मांजराच्या पावलानी....माझं डोकं घामानी आणि भीतीनी ओलं झालं. मी पटकन् समोरच्या माणसाला पाठ दाखवीत पुढे निघालो.पण त्याने झटकन फिरुन माझ्या मानेभोवती घट्ट पकड मिळवली. मी सुटण्याची धडपड केली. उपयोग झाला नाही. माझा श्वास वरचा वर खालचा खाली होऊ लागला.मगरमिठीच ती सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्याने दुसऱ्या हाताने सुऱ्याचं टोक माझ्या कमरेत घुसवलं, पुढच्याच क्षणी माझ्या कमरेजवळ रक्त वाहत असल्याचं जाणवू लागलं. आता मला सुटायलाच हवं.कॉलेजमधे असताना NCC मधलं ट्रेनिंग आठवलं. आमचा ट्रेनिंग ऑफिसर सांगत होता" अगर किसीने आपकी गर्दन पीछेसे पकडी है तो आप अपना दाहिना घुटना मोडके पीछे की तरफ घुमाके अपनी लात उपर कराके जोरसे झाडिये, तो ये लात पकडनेवालेके अंडाशयपर जा धडकेगी और उसकी पकड एकदमसे छूटकर वो तिलमिलाकर जमीपर गिरेगा. अब आप घूमके वो उठनेसे पहिले दो चार जबरदस्त लाते उसके पेटमे जमा दो वो उठेगा नही और आप भाग सकोगे. ......." मी बरोब्बर तेच केलं. माझी लाथ तर बसली . तो वेदनेने कळवळत खाली पडला. पण मला त्याला जास्त मारण्यात रस नव्हता. खरंतर मी चूक केली. तोही कमी नव्हता. तो कळ दाबीत उठला आणि माझा पाय ओढून मला खाली पाडले. माझ्या डोक्यात कशानेतरी त्याने घाव घातला. मी तिथेच बेशुद्ध होऊन पडलो. .......मी किती वेळ शुद्धीत नव्हतो कुणास ठाऊक.हळूहळू मी शुद्धीवर येत होतो. प्रथम माझ्या डोक्यात पडणारे घण जाणवले. मी कण्हू लागलो. माझं कण्हणं कोणाला तरी ऐकू गेलं असावं.हळूहळू मी डोळे उघडले. पिवळा प्रकाश डोळ्याना झोबत होता. एवढ्यात शब्द ऐकू आले......." डॉक्टर, हा शुद्धीवर येतोत बहुतेक. पाणी मारुन पाहतो." पप्पांचा आवाज ऐकू आला. म्हणजे पप्पा आत आले तर. ..... माझ्या तोंडावर पाणी मारलं गेलं . मी डोकं दाबून धरीत उठलो. आता हा डॉक्टर कोण ? तिडबिडे तर नाही ? डॉक्टरला कोणी बोलावलं ? आणि पोलीस काय करतायत ? नाहीतरी ते शेवटीच येतात. मी डोळे पूर्ण उघडले. पप्पा माझ्यावर वाकून पाहत होते. समोर डॉक्टर की कोण तो उभा होता. माझ्या डोक्यात सारख्या कळा येत होत्या. पप्पा म्हणाले," आता तरी चहा घेणार ना ,,, असं म्हणून त्यांनी माझ्यापुढे कप केला. मी अर्धवट उठून बसत म्हणालो, " दीपा कुठे आहे ? " त्यावर हसत ते म्हणाले" ती उठल्ये पण तिला तिच्याच खोलीत बंद करुन ठेवलंय."
पाणी ....पाणी म्हणत मी पुन्हा जमिनीवर लोळण घेतली..पप्पानी पाण्याचा ग्लास पुढे केला. थंडगार पाण्याने जरा बरं वाटलं. मग त्यांनी जवळच ठेवलेला चहाचा कप माझ्या तोंडाला लावला.आता जरा डोकं चालू लागलं. पप्पा आत कसे आले आणि हा डॉक्टर कसा आला ? घड्याळात पाच ठोके पडले. मी उठून उभा राहिलो. डोक्यात जबरदस्त कळ गेली. अजूनही डॉक्टरचा चेहरा दिसत नव्हता. मी जरा दुबळेपणाचं जास्त नाटक करीत जवळच्याच खुर्चीवर डोकं हातात धरुन बसलो. पप्पा म्हणाले ," याला तळघरात बंद करुन ठेवायला हवं, म्हणजे पुढची ट्रीटमेंट देणं तुम्हाला सोपं जाईल. ताईची इच्छापण पूर्ण होईल. चला लवकरच उजाडायच्या आत हालचाल करायला हवी " आणि ते ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलं, म्हणजे कमरे खालचा भाग आखूड करणार. हा डॉक्टर तिडबिडेच आहे. पोलिसाना परत फोन करायला हवा.... मोबाईल पप्पांकडून घेतला पाहिजे. दीपा उठली कशी नाही , राधाबाईंचं काय.....? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला ताबडतोबच मिळालं. डॉक्टर पिचक्या आवाजात म्हणाले, " हो पण याला प्रथम तळघरात टाकू. नंतर ताई आणि राधाबाई याना मागच्या दलदलीत फेकू. आता खड्डे खणायला वेळ नाही , हे सगळं दीपाच्या अपरोक्ष व्हायला हवं. " मग डॉ. माझ्याकडे वळून मला जोरात हलवित म्हणाले, " ए! ऊठ तुला काही झालेलं नाही. नाटकं करु नकोस. ..." असं म्हणून त्यांनी मला दोनतीन कानफटात मारल्या. मी कसातरी उभा राहिलो. मग दोघांनी मला ढकलीत जेमतेम कीचन पर्यंत ओढून नेले. आता बल्बच्या पिवळ्या प्रकाशात मला राधाबाईंचा म्रूतदेह दिसला. त्यांच्या पाठीत सुरा खुपसला होता. मी सर्व बळ एकवटून त्या दोघांना जोरात धक्का दिला. पप्पा कोलमडले , फ्रीजवर आपटून पडले. त्यांच्या कपाळावर जबर फटका बसला होता. पण बारीक दिसणाऱ्या डॉक्टरची पकड मात्र जीवघेणी होती. त्याने मला खाली पाडलं आणि माझ्या छातीवर बसून तो माझा गळा दाबू लागला. तेवढ्यात दोन गोष्टी अचानक घडल्या. दारावरची बेल दोनतीन वेळा वाजली आणि भिंतीतला जिना उघडून दीपा कीचनमधे आली. तिच्या हातात जड पेपरवेट होता. ...पप्पाना सुचेनासं झालं. दोन मुडदे कुठे लपवायचे त्याना कळेना. दीपा हातातला पेपरवेट उगारुन डॉक्टरांकडे धावली . पप्पा दीपाला धरायला धावले. परत बेल वाजली. पण आता ती सारखी वाजत राहिली . दीपाच्या कानफटीत त्यानी दिली. तिच्या हातातला पेपरवेट आवाज करीत खाली पडला.
......... आता मात्र पुन्हा पुन्हा बेल वाजत राहिली. मग पप्पा म्हणाले, " डॉक्टर याला घेऊन तुम्ही वर जा आणि तळघरात ढकलून द्या. मी हे मुडदे कुठे लपवायचे ते पाहतो.." आता दारावर धक्के बसू लागले. पप्पांनी जरा जोरातच विचारलं," कोण आहे, " सकाळी सकाळी सभ्य माणसाचा दरवाज्या वर धडका देत आहात. आत्ता मी पोलिसाना फोन करतो. " ......त्यावर उत्तर आलं," अरे ए , ! बऱ्या बोलानं दार उघड. आम्हीच पोलास आहोत. उघड लवकर...." आता मात्र पप्पा घाबरले. डॉक्टरांनी मला ढकलीत जिन्यावर आणलं. जिन्याचा दरवाज्या लावून घेतला. पप्पांनी मग प्रथम दीपाला ढकलीत अडगळीच्या खोलीत बंद करुन ठेवली. अजून कोणाच्याही मदती शिवाय दोन्ही मुडदे मागील दरवाज्याने बाहेर काढून दलदलीत ढकलायचे होते . आता मुख्य दरवाज्यावरील धडका थांबल्या होत्या. पप्पांना आश्चर्य वाटलं. अचानक पोलीस गेले कुठे त्याना समजेना.
मग त्यांच्या लक्षात आलं की हे धोकादायक आहे. पण मिळालेल्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. कीचनमधली दोन कपाटांकडे त्यांचं लक्ष गेलं. या कपाटांमधे ठेवलं तर ,,,,,? मग त्यांनी कपाटांकडे निरखून पाहिलं. समोरच्या बाजूला काच होती. म्हणजे आत घालून उपयोग नाही. वेळ चालला होता. लवकर काहीतरी करायला हवं होतं. हा डॉक्टर वर काय करतोय..... त्यांना एक कल्पना सुचली. नाहीतरी पोलिस पुढच्या दरवाज्याशी नाहीत. आपण बाहेर पडून या दोघाना झाडांमधे लपवून ठेवलं तर ,,,? विचारांच्या गर्दीने आणि वेळ नष्ट होत चालल्याने त्यांना आता भीती वाटू लागली. त्यांच्या अंगाला थरथर सुटली. भीतीवर नियंत्रण यावं म्हणून त्यांनी फ्रीज उघडला. आत फक्त बियर होती. तिचा काहीच उपयोग नाही. त्यांनी परत एकदा फ्रीजमधे नजर फिरवली. केव्हातरी मागच्या वर्षात ठेवलेली क्वार्टर दिसली.. आत काय आहे हेही न पाहता, त्यांनी बाटली उघडून तोंडाला लावली. आता कसला सोडा आणि पाणी ,,,,? त्यानी कच्चीच प्यायली. ,,,,,,ती रम होती. घसा जाळीत जाणाऱ्या अल्कोहोलने त्याना हुषारी बरोबर स्थिरता आली. ते तिथल्याच एका खुर्चीवर बसले. अति श्रमाने त्याना घेरी येत्ये असं वाटलं. नाही म्हंटलं तरी ते जवळजवळ रात्रभर जागेच होते. अचानक त्याना सरुची आठवण झाली. पंधरावीस वर्षांपूर्वी ती गेली होती. बाहेर संबंध ठेवण्याचा त्यानी खूप प्रयत्न केला होता. पण त्याना जमलं नाही. राधाबाईंना मारणं आवश्यक होतं. नाहीतर त्या आज असत्या. पण तिच्यासमोरच सगळं घडल्याने तिला मारणं भाग होतं. त्यांनी क्वार्टर अर्धी केली होती. अचानक जिन्याचा दरवाज्या उघडला आणि डॉक्टर आत आले. म्हणाले," अरे नुसते बसलात काय ? या दोघांचं काय .....? " पप्पानी उत्तरादाखल त्यांच्या हातात क्वार्टर दिली.मग त्यानी पोलिसांबद्दल आणि मुडद्यांचं काय करायचं ते थोडक्यात सांगितलं. अचानक मागच्या दरवाज्यावर गोळी झाडल्याचा दणदणीत आवाज आला. त्या दोघांची खाडकन उतरली. मग डॉक्टरांच्या मदतीने दोन्ही बॉडीज पुढच्या दरवाज्याकडे सरकवायला सुरुवात झाली. आता त्या बॉडीज चांगल्याच जड झाल्या होत्या . " धडाम धूम " असा आवाज आला. मधेच ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसळली. वाऱ्यापावसाची जुगलबंदी चालू झाली. दोघाना ,काही मैल धावून आल्यागत चांगलाच दम लागला होता.
सहा वाजत आले. बाहेर सूर्यप्रकाश पडलाच असणार. जंगलामुळे दिवसाची जाणीव होत नव्हती. दोघांनी घामाच्या धारा पुसण्यात आणि दम खाण्यात काही मिनिटं घालवली. मिनिट मिनिट आता महत्वाचं होतं. अडगळीच्या खोलीच्या दरवाज्यावर दीपाच्या धडका चालूच होत्या. पुन्हा मुडदे ओढण्याचं काम चालू झालं. दरवाज्यातून मुडदे बाहेर सहजासहजी बाहेर काढता येतील अशा दिशेत ठेवले गेले. दोघांनी दमून आपली डोकी दरवाज्यावर टेकली. मग मोठं अवसान आणून पप्पांनी बोल्ट उघडले , अडसर दूर केला आणि लँच उघडला. आता दरवाज्या उघडायचा म्हणून दोघांनी जोर लावला त्याबरोबर उघड्या दरवाज्यातून वाऱ्यासहित पाऊस भुंकल्यासारखा ओरडला. अचानक दोघांवर पाण्याचा मारा झाला. आता बाहेर उजाडल्याच्या खुणा दिसू लागल्या. दोघेही एकदम बाजूला झाले आणि तिकडे पोलिस दरवाज्या फोडण्यात यशस्वी झाले. इकडे पप्पा आणि डॉक्टर ताईंची बॉडी बाहेर काढण्यात यशस्वी झाले. बाहेर उभ्या असलेल्या पप्पांच्या खांद्यावर कॉन्स्टेबल जाधव आणि मसुरकरांची पकड बसली. त्यांना बाजूला ओढीत जाधव म्हणाल, " स्वत: खून करुन आम्हालाच मदतीला बोलावतोस काय ,,,,? " ...... घाबरुन जाऊन पप्पा म्हणाले ," छे हो ! मी खूनही नाही केला आणि फोनही......त़ो बघा खुनी पळतोय ... " असं म्हणून मागील दरवाज्याकडे धावण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांकडे त्यांनी बोट दाखवलं. पण आत शिरलेल्या इन्स्पेक्टर सूर्यकांतानी त्याना जोरात कानफटात मारुन पकडलं. इन्स्पे. नी अडगळीच्या खोलीच्या धडका ऐकून ते उघडलं आणि दीपाची सुटका केली. ती बाहेर येता येता गुदमरल्यामुळे भोवळ येऊन त्यांच्याच अंगावर कोसळली. त्यांनी तिला तिथल्या खुर्चीवर बसवली आणि तिच्या तोंडावर शुद्धीवर येण्यासाठी पाणी मारु लागले. हळूहळू चांगलंच उजाडलं. पप्पाना आणि डॉक्टराना ताब्यात घेतल्यावर कॉ. मसुरकर म्हणाले, " सर तुम्ही लकी आहात, याला ओळखलंत का आपण ? हा डॉ. तिडबिडे पेंडिंग मेडिकल इन्क्वयरीज मधे हा वाँटेड होता. " त्यावर इन्स्पे. म्हणाले, " बरोबर आहे तुमचं, आपण खरंच लकी आहोत. " मग डॉक्टरकडे मोर्चा वळवीत त्यांना एक कानफटात मारीत म्हणाले, " माणसाचं शरीर आखूड करणारा. चल आता आत, आपल्याला भरपूर वेळ आहे तुझं संशोधन समजून घ्यायला. " दिपा शुद्धीवर आली. तिने माझ्याबद्दल विचारलं. पण मला कुठे ठेवलंय याचा अंदाज नसल्याने इन्स्पे. साहेबांनी डॉ.ना दरडावून विचारलं, " काय रे कुठे डांबलंयस अविनाशला ?" ते बोलत नसल्याचे पाहून इन्स्पे .त्यांची कॉलर पकडीत ओरडले , " सांगतोस ,का आता मारु दोन चार ... " तरीही डॉ. म्हणाले, " मी कोणत्याही अविनाशला वगैरे ओळखत नाही." मग इन्स्पे. साहेबांनी दोन चार वाजवल्यावर अविनाशला भुयारात बंद करुन ठेवल्याचं सागितलं. त्यांना तसेच धरुन जिन्याने वरच्या मजल्यावर गेले.
वर गेल्यावर भिंतीतली कळ दाबल्यावर कंटाळल्या सारखा आवाज करीत गुप्त दरवाजा उघडला . एक बोळकंडी सारखा भाग दिसला. तिथे डॉक्टरला ढकलीत इन्स्पे. साहेब आणि जाधव आत शिरले . भिंतीतली बटणं दाबल्यावर पिवळट प्रकाशात मी तिथेच बांधलेल्या अवस्थेत सापडलो. मला सोडवल्यावर मी म्हणालो, " फोन मीच केला होता. दोन्ही खून पप्पांनीच केलेले आहेत. हे डॉ. अतिशय डांबरट आहेत. आपल्या संशोधनाचे प्रयोग ते करुन त्याचा vdo काढतात , कशासाठी माहीत नाही. " , चला खाली जाऊ आणि दोघाना पोलिस स्टेशनला घेऊन जाऊ." मग आम्ही चौघे खाली आलो . पप्पा खाली मान घालून बसले होते. पावसाने निर्माण केलेली थंडी होती तरी त्यांच्या कपाळावर घाम जमला होता. गेल्या गेल्या दीपाला जवळ घेतलं. तिला चांगलाच धक्का बसला होता. पप्पा असं काही करतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं. आता ते तिची नजर टाळीत होते. " हे असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. " मग आम्ही सगळेच पोलिसांच्या गाडीतून निघालो. बसल्यावर मी इन्स्पे. ना विचारलं, " वाड्याचं नाव माहीत नसताना सुचलं ते सांगितलं, पण तुम्हाला तो कसा सापडला ? ". .... त्यावर ते म्हणाले," वाडा याच नावाने गावात प्रसिद्ध आहे. बरोबर ना पप्पा ?" .... उत्तरादाखल त्यानी फक्त मान डोलावली .
गाडीत ,खऱतर दीपा सोडून सगळेच पेंगत होते. अर्ध्यातासाऩतर आम्ही पो. स्टेशनला पोहोचलो. सगळेच स्थानापन्न झाल्यावर इन्स्पे. साहेब म्हणाले, " चला, पप्पा आणि डॉक्टर पोपटासारखं बोलयचं नाहीतर चार्जरुम आहेच,आणि तिथे आमच्याकडून खास मेजवानी मिळेलच. काय आहे ना हे आमचे कॉन्स्टेबल जाधव , हे गेले दोन वर्ष बसून आहेत. त्यांचे हात शिवशिवत असतात...." जाधवांकडे पाहत म्हणाले. चहा आला. पो. स्टेशनचा कळकट्ट चहा आला. त्यावेळेला तोही चांगला लागला. नंतर इन्स्पे.म्हणाले," चला, प्रथम अविनाशपासून सुरुवात करु. मी माझं स्टेटमेंट दिलं. मग दीपा म्हणाली, " मला काहीच बोलायचं नाही. पप्पांची मात्र मला कमाल वाटते. राधाबाईं बरोबरचे संबंध आणि त्यांचा राधाबाईंचा या दोघांनी केलेला खून ,यावर माझा विश्वासच बसत नाही. पप्पा तुमची तर मला वडील म्हणवून घ्यायला लाज वाटते. " डॉ. उसळून म्हणाले ," ए माझा खुनांशी काहीही संबंध नाही. " इन्स्पे. चिडून म्हणाले ," आधी खून करवून घ्यामचे आणि मग म्रुतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी इथे यायचं. काय बरोबर आहे ना ?. " .....अजिबात नाही. ... खून पप्पांनी केल्येत आणि ते करणार असल्याची मला कल्पनाही नव्हती." ,,,,,,, " सगळे गुन्हेगार असंच म्हणतात. पप्पा म्हणतात खून तुम्ही कलेत. काय समजायचं काय ? आम्हाला मोघम उत्तरं नाही चालत हो. चला जाधव घ्या दोघाना आत ," असं म्हणत ते उठले आणि डॉक्टरांजवळ जात त्यांनी पप्पा आणि डॉक्टरांच्या एकेक कानफटात भडकवली. जाधवांना म्हणाले " घ्या दोघांना आत, हात साफ करुन घ्या. मग जाधवांनी प्रथम डॉक्टराना कॉलर धरुन उचलंल आणि ओढीत अंधाऱ्या चार्जरुम मधे गेले. दहा पंधरा मिनिटं फक्त डॉक्टरांच्या किंकाळ्या आणि जाधवांच्या शिव्या ऐकू आल्या. मग त्याना मगाचसारखे ओढीत बाहेर आणलं. त्यांचा एक डोळा बाहेरुन काळा आणि आतून लाल दिसत होता. त्यांचा एक हातही लोंबत होता. ते जेमतेम खुर्चित बसले. ते पाहून पप्पा शहारले. आणि म्हणाले ," मी ...मी सगळं सांगतो सर पण मला मारु नका. "
ते पाहून आम्ही दोघे शहारलो आणि इन्स्पे. म्हणाले, " तुम्ही तर एका दगडात दोन पक्षी मारलेत की. गुड जॉब. " त्यावर मिशा पिळीत जाधव म्हणाले ," सर , आपली गिरिपच अशी असत्ये. "
मग मी विचारलं, " आम्ही दोघं गेलो तर चालेल का ? " थोडावेळ थांबून इन्स्पे. म्हणाले, " ठीक आहे निघा तुम्ही, पण सध्या वाडा सोडून जायचं नाही , तपास पुरा होईपर्यंत तुमची गरज लागेल. "
मग मात्र मी आणि दीपा उठलो. बाहेर आलो . तेव्हा दीपा बिलगून म्हणाली ," सॉरी अवि. पप्पा असे असतील असं वाटलं नाही रे. .. "
तेवढ्यात जाधव बाहेर येऊन म्हणाले " साहेब तुम्ही जाणार कशे ? थांबा ड्रायव्हर सोडेल तुम्हाला ." मग अर्ध्या तासात आम्ही वाड्यावर पोहोचलो. दिवसाच्या प्रकाशात वाडा आता बराच सौम्य दिसत होता. राधाबाई नसल्याने जेवणाचा प्रश्न होताच. खेडेगावात हॉटेल मिळणंही कठीण. मला कॉलेजमधे आणखी दोन दिवसांच्या रजेसाठी फोन करावा लागला.प्रिंसिपल जरा वैतागलेले दिसले. पण मी गेल्यावर सगळं सांगितलं की ऐकतील याची मला खात्री होती. थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही जेवणासाठी तालुक्याच्या गावी गेलो. चांगलं जेवण मिळायला ते काही मुंबई पुणं नव्हतं. असो घरी आल्यावर जे झालं त्यावर बरीच चर्चा झाली. मग मी दीपाला म्हंटलं, " आता आपण पुढे कसं करायचं .....म्हणजे आपल्या लग्नाचं आणि या वाड्याचं . "
त्यावर ती म्हणाली पहिल्यांदा लग्न करुन घेऊ. मग वाड्याबद्दल ठरवू. " मी सध्यातरी तिला होकार दिला. आता मला वाड्यात फारसा रस नव्हता. बघू ,जमेल तेव्हा नवीन बांधू. संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न नव्हता. पार्सल होतंच. आता वाड्यावर ठेवलेल्या गड्याचा प्रश्न होता. दीपाला पटत नव्हतं तरी मी त्याला ठेवण्याचं ठरवलं. कधीमधी या्वंसं वाटलं तर थोडीफार तरी व्यवस्था ठेवायला त्याची गरज होती. रात्र झाली. एवढ्या मोठ्या वाड्यात आम्ही दोघेही भुतासारखे राहणार होतो. आज एकाच खोलीत आणि एकाच बेडवर आम्ही झोपलो. बेडवर पडल्यावर दीपा लगेच जवळ येऊन म्हणाली ," पप्पा आणि ताईमुळे तुला खूप त्रास झाला असेल ना ? " डोळ्यतलं पाणी पुसत ती माझ्या मिठीत विसावली. आज पावसाने एक्झिट घेतली होती. मी तिला बाजूला करीत म्हंटलं," हे पाहा बाईसाहेब आता लग्न झाल्याशिवाय जवळ यायचं नाही. हा पोलीसतपास संपला की आपण लवकरच लग्न करु. मी गादी घालून खाली झोपणार आहे. " असं म्हंटल्यावर ती हो म्हणाली पण नाईलाजनेच. तिच्या तोंडावर ते स्पष्ट दिसत होतं. असो आम्हाला लवकरच झोप लागली.
सकाळी जाग आली ती इन्स्पेक्टर साहेबांच्या फोननेच. मी फोन घेतल्यावर ते म्हणाले," किती झोपणार आहात हो. सात आठवेळा फोन लावला मी. बरं तासाभरात पो.स्टेशनला या. मी गाडी पाठवतोय. " असं म्हणून त्यांनी फोन बंद केला. अजूनही मला सापडलेल्या कवटीबद्दल कुतुहलमिश्रीत भीती होती मी ते दीपाला मुद्दामच सांगीतलं नाही ती इथे राहू शकली नसती. मला भीती वाटत नव्हती असं नाही. . आम्ही पो. स्टेशनला जाण्याची तयारी करीत होतो. जो नोकर इथे होता त्यानी दूध आणून दिल्याने आमचा चहा वगैरे झाला दीपाला फार काही नाश्ताबिश्ता बनवता येत नव्हता. पण आत्ता मला वाद नको होता. अजून मी तिला ताईंबरोबर सिनेमा पाह्यला गेल़ो होतो हे सांगितलं नव्हतं.अजून मी वाड्याचा दलदलीच्या बाजूला असलेला भाग पाहिला नव्हता. लवकरच गाडी आली . आम्ही पो. स्टेशनकडे निघालो. येताना जेवूनच घरी यायला लागणार होतो. आल्याबरोबर इन्स्पे. साहेब म्हणाले , " झाले की रात्रीत दोघेही तयार. खून मात्र पप्पांनीच केले आहेत पण डॉक्टर त्यात सामील असणार याची मला खात्री आहे. नाहीतरी दुसऱ्या चौकशीत त्याला अडकवायचंच आहे. " मग मी त्याना दलदलीजवळच्या जागेबद्दल संशय व्यक्त केला. पप्पाना मी भेटू इच्छित नव्हतो पण दीपाला ओढ होती. म्हणून साहेबांच्या परवानगीने त्याना भेटायल गेली. तेवढ्यात इन्स्पे. साहेबांनी मागवलेला चहा आला. तो घेता घेता ते म्हणाले ," साधारणपणे आणखी दोन दिवसांनी घरी जाऊ शकता . " मग मी त्याना मला सापडलेल्या मानवी कवटीबद्दल त्याना सांगितलं. डोळे विस्फारित ते म्हणाले. " त्याच्याशी नक्कीच डॉक्टरचा संबंध असणार. ठीक आहे आम्ही आज संध्याकाळीच येऊ. वाड्याचा दुसरा भागही पाहू.नक्कीच काहीतरी सापडेल. " तेवढ्यात दीपा आली. मग आम्ही जायला निघालो.पुन्हा त्यांनी त्यांच्याच गाडीने आम्हाला सोडलं. वाड्यावर पोहोचल्यावर माझी गाडी घेऊन आम्ही जेवायला गेलो. जेवणात नाविन्य नव्हतंच. कसं असणार ? मी काही मुंबईत नव्हतो. यापुढे पोलिसांची गाडी वापरायची नाही हे मी ठरवलं. असो. परतल्यावर दीपानी परत लग्नाचा विषय काढला. तिचंही बरोबर होतं. घरी गेल्यावर ती एकटीच राहणार होती. तिला त्याची भीती वाटत होती. पप्पाची शिक्षा नक्कीच होती. म्हणजे आणखी काही वर्ष जाणार. केस चालू व्हायच्या आत लग्न झालं तर तिच्याबरोबर मी असेन. आणि केसमुळे होणारी बदनामी सहन करायला माझी मदत होणार होती.तास दोन तास चर्चा झाल्यावर मी लवकरात लवकर लग्न करण्याचं तिला आश्वासन दिलं. संध्याकाळी साडेपांच सहाच्या सुमारास इन्स्पेक्टर आले. आता मात्र येताना त्यांनी एकदोन माणसं जास्त आणली. पावसाची काळोखी भरली. पावसाला सुरुवात झाली. आल्याबरोबर ते माझ्या खोलीची झडती सुरु केली. कवटी आणि एक दोन मानवी हाडंही त्याना मिळाली. वॉर्डरोब मधले रबरी मोजे आणि इतर सामानही त्यानी बाहेर काढलं. साड्यांच्या वीसपंचवीस घड्या मिळाल्या .पण हात लावल्यावर त्यांचा भुगा होत होता. जो भाग चांगला होता तो प्लास्टिक पिशव्यांमधे सील करुन पुढील तपासासाठी पाठवण्याचं ठरवलं. एखाद्या वस्तूचं वय किती असावं हे ठरवणाऱ्या सरकारी खात्याकडे पाठवण्यासाठी वेगळ्या ठेवण्यात आल्या. आत्तपर्यंत दीपाने दोनदा चहा जमेल तसा नाश्ता बनवला होता.
आता साडेसात वाजत आले. " चला वाड्याची मागची बाजू पाहू." असं म्हणून इन्स्पे, दोन कॉन्स्टेबल्स बरोबर आणलेली जास्तीची माणसं, त्यातला एक कुलपं उघडणारा आणि दुसरा कुलपं तोडणारा त्याच्या हातात छोटीशी पहार होती., आणि आम्ही दोघं. मागील दरवाज्या आता अर्धवट तुटला होता. दहा पंधरा फुटांवर शतकानुशतकांची साचलेली दलदल होती. मागचा भाग नंतर केव्हातरी बनवून जोडला असावा. तरी पन्नास साठ वर्ष जुना असावा. मी वर्ष सांगतोय त्यावर विश्वास ठेवू नका ,कारण मी काही तज्ञ नाही..असो आम्ही या भागाचा मुख्य दरवाज्या अजून उघडला नव्हता ,तोच अचानक दड् दड् धाम् धडाम् धुम् असा आवाज होऊन तो भाग कोसळू लागला. अचानक प्रचंड धुरळा उडू लागला आणि दगड माती आमच्या अंगावर येऊ लागले. आम्ही तोंडावर रुमाल ठेवून दहा बारा फूट मागे सरकलो..".............मला वाटतं, एक दोन दिवस थांबावं लागेल " त्यावर इन्स्पे. म्हणाले " अहो थांबलो तर पावसाच्या पाण्यात पुरावे वाहून जातील की. पण मला वाटतं दिवसा उजेडी यावं." अहो, रात्रीत पुरावे वाहून जातील की ... " मी असं म्हंटलं खरं ,पण इन्स्पे. ना राग आला. " आमची चेष्टा करताय ? मिस्टर अविनाश एकदा का पुरावे हातातून निसटले की त्या तिडबिडेची फक्त चौकशी हातात राहील. आधीच तो आत्ताच्या घटनेत गुंतलेला नाही. आम्ही त्याला नेटमधे आणू पण तो थेट जबाबदार नसेल. आमचं काम वाटतं तेवढं सोपं नाही. उगाच टोमणे मारण्याचं काम करु नका . नाहीतरी मी एक कॉन्स्टेबल सोडून जाणार आहे. " मी सॉरी म्हणून बाजूला झालो. एका पोलीसला तिथे ठेवून इन्स्पेक्टर साहेब तांड्यासहित निघून गेले. म्हणजे आता आणखी काही दिवस आपले फुकट जाणार. अर्थात मी इन्स्पे. साहेबांची परवानगी घेऊन कॉलेजला जाऊन रजा वाढवून घ्यायचं ठरवलं. आता नऊ वाजून गेले होते. आम्ही पार्सल आणलेलं गरम करुन जेऊन घेतलं.बिछान्यावर पडल्या पडल्या मी दीपाला म्हंटलं " असं काही माझ्या आयुष्यात घडेल हे महिन्यापूर्वी कोणी सांगीतलं असतं तर मी विश्वास ठेवला नसता." त्यावर तिनी एकच उत्तर दिलं की आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे. तिच्या द्रुष्टीने हाच रिझल्ट महत्वाचा होता.
आस्ते आस्ते आम्हाला झोप लागली. सकाळ झाल्याचं लक्षातंच आलं नाही. आम्हाला वाड्यावरच्या एकमेव गड्याकडून दूध मिळत होतं, म्हणून उठल्याबरोबर चहा तरी मिळत होता. असो, रोजरोज पोलिसांची गाडी कशाला वापरायची, असा विचार करुन दहा वाजण्याच्या सुमारास आम्ही माझ्या गाडीने पो.स्टेशनला निघालो. अचानक आम्हाला आलेलं पाहून इन्स्पे.म्हणाले," तुम्ही आज न बोलवता कसे ? इथे येण्याचं लोक टाळतात " ......... . " त्याचं काय आहे की माझी इथे राहण्याची कितपत गरज आहे ते सांगितलंत तर बरं, म्हणजे मी कॉलेजमधे जाऊन रजा वाढवून घेईन. " थोडावेळ जाऊन देऊन ते म्हणाले ," बरोबर आहे तुमचं, तशी तुमची फारशी गरज नाही. जेव्हा लागेल तेव्हा बोलवून घेऊ. तुम्ही जायच्या आधी तुमचं दोघाचं स्टेटमेंट तेवढं आमच्या जाधव साहेबांकडे नोंदवून जा. तसंही जे झालंय त्याबद्दलचा तपास पुरा झालेला आहे. या दोघांना त्यात बरोबर गुंतवलं आहे. " मग आम्ही बाहेर येऊन जाधव साहेबाना आमची स्टेटमेंट्स देऊन निघालो. आता वाड्यावर जाऊन फक्त कपडे गोळा करायचे आणि चावी नोकराकडे जाऊन निघायचं या विचारांनी मी उत्साहीत झालो. भराभर ,सगळं उरकून आम्ही गाडीत बसलो आणि एकदाचे निघालो. मी अनिच्छेनी आलो होतो ,काहीच मजा न आल्याने अनिच्छेनीच निघालो. पावसाचा जोर वाढत होता. येताना आम्ही परत त्याच रेस्टॉरंट मधे जेवायला थांबलो. पण आत्ता ताई आणि पप्पा नव्हते. दीपाचे डोळे डबडबले. तिला समजावताना माझी पुरेवाट झाली. दीपाला घरी सोडून निघताना मला जड गेलं.. आता मात्र आई बाबांशी मी लवकरात लवकर बोलण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपलना भेटून सगळं सांगितल्या्वर लागेल तेव्हा रजा घे असं ते म्हणाले. आता प्रॉब्लेम सुटत होते. आईबाबांनी पण पुढच्याच आठवड्यातला मुहूर्त काढून नोंदणी पद्धतीने लग्न करण्यास परवानगी दिली . नाही म्हणायला आईची आणि दीपाची निराशा झाली. दीपाचे नातेवाईक कोणीच नव्हते त्यामुळे हा निर्णय योग्यच ठरला. पाचसहा मित्र आणि अगदी जुजबीच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. दीपा माझ्या घरी राहायला आली. दीपाच्या फ्लँटला कुलुप लागलं. तिला ते फारसं आवडलं नाही. पण मी तिला समजावून सांगितलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला. मी त्याना कालच लग्न झाल्याचे सांगितलं. तरीही त्यांनी तासाभराकरिता येऊन जायला सांगितलं. " फार काही नाही, एकदा तुमच्या कानावर सगळा तपशील घातला की आरोपपत्राच्या मंजुरीसाठी ते प्रयत्न करणार होते. केस कोर्टात उभी राहायला तीन ते सहा महिन्याचा कालावधी लागणार होता. आम्ही तासाभरातच निघालो . दुपारचे बारा वाजण्याच्यआ सुमारास आम्ही पो. स्टेशनला पोहोचलो. इन्स्पे. साहेबांनी लग्नाबद्दल अभिनंदन केलं आणि म्हणाले, " त्या वाड्याच्या पडक्या भागात आणखी दोन मानवी सांगाडे सापडले. डॉक्टरला थर्ड डिग्री ट्रीटमेंट दिल्याबरोबर भडाभडा ओकला. जे दोन सांगाडे सापडले त्यांच्यावर डॉ. ने प्रयोग केले होते. त्या दोघानाही यशस्वी चांचणीनंतर त्याने मारुन टाकले. आणि त्याला मदत कोणी केली तुमची मेव्हणी गायत्री आणि पप्पा. आता पोचलेच दोघेही जन्मभरापुरते. " ते ऐकल्यावर दीपा रडू लागली . तिने पप्पाना भेटण्याची विनंती केली. आम्ही दोघेही पप्पना भेटलो. ते आता बरेच म्हतारे वाटू लागले. पोलिसांची वागणूक व एकूणच तणावापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. दीपा सारखी रडत होती. ती म्हणाली " आपण चांगला वकील करु . तुम्ही नक्की सुटाल. " पण मला माहित होतं शिक्षा थोडीफार कमी होईल. शेवटी त्यानी मर्डर केले होते. आम्ही डॉ. ना भेटायला गेलोच नाही. ना तो आमचा नातेवाईक होता ना मित्र. निघताना इन्स्पे. साहेब म्हणाले, " या केसमधे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. ठीक आहे. तुम्ही निघा . अजून बराच वेळ लागेल." मग आम्ही घरी जायला निघालो..............जवळजवळ पाच वर्ष लागली. पप्पाना आणि डॉक्टरला जन्मठेप झाली.
वाडा तिथेच होता. आम्ही त्यासाठी गिर्हाईक पाहतोय. आयुष्यात भलताच अनुभव आला तो मी विसरु शकलो नाही.
(संपूर्ण)
.

Group content visibility: 
Use group defaults

छान