काव्यलेखन कवी

पहिली कविता - गझलेच्या उंबरठ्यावर

Submitted by गणक on 12 July, 2020 - 13:56

तुला गजलेसारखी
नाही वाटली जरी
कविता बनूनी मला
तीच दाटली उरी

नाही शब्द भारदार
नाही वृत्त अलंकार
पण शस्त्र भावनेचे
हाती तिच्या धारधार

साधी सोपी तीची भाषा
चिंता ना , होईल हाशा
मनामध्ये जन्म घेता
दूर पळते निराशा

आहे नवख्या चालीची
कळी शब्दांच्या वेलीची
दर्दी रसिक थोडेसे
आस नाही मैफिलीची

कल्पनेची स्वारी असे
बोलावून येत नसे
माग घेता विचारात
माझ्या ओठांवर हसे

नऊरस सोबतीला
अर्थ गंध भुक जिला
तंत्र नियम जाळ्यात
अडकवू नका तिला

Subscribe to RSS - काव्यलेखन कवी