कविता: लॉकडाउन मध्ये भांड्यांचे मनोगत
जेवणानंतर अक्षयपत्रात(बेसिन)जमलेल्या भांडयानी केला एकच गलका.....
थोडीशी थकून मी म्हणाले घेऊ द्या मला जरासा डुलका.
माझे म्हणणे ऐकून त्यांना आले खदखदून हसू
भांडी म्हणाली जा ग बाई जा तुझ्या कामाचा पाढा आमच्यापुढं नको वाचूस.
म्हातारीच्या गोष्टीप्रमाणे मी मात्र पुटपुटले ,डुलका घेते, फ्रेश होतें, नंतर चहाची भांडी वाढवून तुम्हा सगळ्यांचा समाचार घेते.
ताट -वाटी, कप-बशी आणि इतर पात्रांनी केली कुजबुज,जावू द्या रे तिला आपण करू आपले हितगुज.
एरव्ही एवढ्या संख्येने आपण तरी केव्हा भेटणार
कप-बशी,ताट-वाटी,चमचेच काय ते नळाखाली विहार करणार.