जीवंत राहणार ते माझे शब्द सारे.....
आले रित्या हाती अन रित्या हातीच जाणार
अस्तित्व नक्कीच आज आहे उद्या नसणार
क्षणात सरेल सारे .....
क्षणात विरेलही....
आपल्या माणसाकडे आठवणीची शिदोरी सोडून जाणार
आयुष्याच्या खेळाला तिथे पुर्णविराम भेटणार
होत्याचे नव्हते होणार सारे
नव्हत्याचे होतेही होईल....
देह जळेल आत्मा ही शरीर बदलणार
कालांतराने नाव सोडले तर सर्वच मिटणार
तरीदेखील जीवंत राहणार ते माझे शब्द सारे
तरीदेखील जीवंत राहणार ते माझे शब्द सारे...
- वर्षा