Submitted by चिंचीमणी on 23 May, 2020 - 14:33
काहीच सुचेना आता
शब्दांनी पाठ फिरवली
वरवरचे माझे दुःख
लिहून शाईही सुकली
कुजबुजू लागले कागद
वाऱ्याशी काहीबाही
वृत्तांनी संग सोडला
मात्रांना लागली घाई
निरोपही न घेता माझा
यमकही निघाली जेव्हा
सगळेच निसटले होते
मजला हे कळले तेव्हा
माझ्या सोबत हे सारे
जगले होते स्वच्छंदी
क्षणभंगुर दाद मिळवण्या
मी केले त्यांना बंदी
-©अभिजीत गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा ! फारच सुरेख कविता
वा ! फारच सुरेख कविता
वाह! कविता आवडली.
वाह! कविता आवडली.
(अवांतर)
पण खरंच आपण कवितेच्या शब्दांना जायबंदी करु पाहतो पण कविता मात्र आपल्याला न जुमानता तिला हवा तोच आकार घेते... ते कागदावर उतरवुन झालं की समजत..
असो! पुलेशु!