शिववडापाव.
मोदी जी- एक वडा पाव दे रे बाबा...
शिववडावाला - चटणी कुठली देऊ ? लाल की हिरवी?
मोदी जी - लाल दे, हिरवी नको...
मीडिया - मोदीनीं हिरवी चटणी नाकारली... हिरव्याचा द्वेष.... पहा.. हेच का ह्यांचे सेक्युलॅरिझम...? २०१४ पासून हे वाढत चाललं आहे आणि आता तर कळस झाला आहे.
संजय राऊत - ह्या शिववड्यावर मोदीनीं जी लाल राळ उडवली आहे आणि पावा वर घाव घातला आहे.. हा वड्याचा अपमान आहे, त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे .. राजीनाम्याचा कागद त्यांनी हिरवी चटणी नाकारली तेंव्हाच तयार ठेवायला पाहिजे होता. सामना कुणाशी करतायत ते...?
आमच्या बिल्डिंगमधून खाली उतरलात कि लगेच चौक लागतो. नेहमी गजबजलेला. अगदी प्रातिनिधिक असा. चार रस्ते चार बाजूंनी अस्ताव्यस्तपणे एकत्र येतात तिथे. एका कोपऱ्यातलं वाण्याचं दुकान फूटभर रस्त्यावर आलेलं असतंय. तिकडे तो भाज्या मांडतो. वरती लावलेल्या हिरव्या रंगाच्या दिव्याने त्या दिवसभर ताज्या दिसत राहतात. दुसऱ्या कोपऱ्यात चहावाल्याने त्याचा संसार थाटलाय. त्याने दुकानासमोर टाकलेल्या बाकड्यांवर दिवसभर गर्दी असते. एखादे टोपीवाले आजोबा, रोजंदारीवरचे मजूर, समोरच्या स्टॅन्डवरचे रिक्षावाले, काळ्या काचांच्या गाडीतून उतरणारे "गुंठामंत्री" आणि असे कित्येक जण. त्याबाजूलाच पोहे, मेदुवडा, इडली मिळते.