वडापाव
Submitted by बिथोवन on 11 June, 2020 - 23:22
शिववडापाव.
मोदी जी- एक वडा पाव दे रे बाबा...
शिववडावाला - चटणी कुठली देऊ ? लाल की हिरवी?
मोदी जी - लाल दे, हिरवी नको...
मीडिया - मोदीनीं हिरवी चटणी नाकारली... हिरव्याचा द्वेष.... पहा.. हेच का ह्यांचे सेक्युलॅरिझम...? २०१४ पासून हे वाढत चाललं आहे आणि आता तर कळस झाला आहे.
संजय राऊत - ह्या शिववड्यावर मोदीनीं जी लाल राळ उडवली आहे आणि पावा वर घाव घातला आहे.. हा वड्याचा अपमान आहे, त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे .. राजीनाम्याचा कागद त्यांनी हिरवी चटणी नाकारली तेंव्हाच तयार ठेवायला पाहिजे होता. सामना कुणाशी करतायत ते...?
शब्दखुणा: