#भुत

चेटकी...... लघु भयकथा

Submitted by salgaonkar.anup on 27 April, 2020 - 01:55

चंद्रमौळीच्या अरण्या शेजारी आसलेल्या आदिवासी पाड्यात एका नवशिक्या पोलिस पाटलाची नियुक्ती झाली. इतकी वर्षे या पाड्यावरचा पोलिस ठाण्याचा बंद दरवाजा आज काय तो उघडला. पाड्यावरची दोन चार मंडळी पोलीसाच्या सोबतीला आले. मनावरची आणि ठाण्यातली सगळी जाळीजळमटं काढून पोलिस नव्या उमेदीनं कामाला लागला. गावक-यांना भेटून काही तक्रार तगादा आहे का? ते तपासू लागला. अचानक एक दिवस "जित्या सापडेना व्हं....!!" असं म्हणत चार-एक गावकरी अचानक ठाण्यात आले. त्या नंतर लगेच दुसऱ्याच दिवशी गावक-यांना उघड्या पठारावर स्मशानाशेजारी मानवी खोपडी आणि हाडं सापडली.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #भुत