Birthday

मायबोलीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 15 August, 2023 - 07:04

मायबोली म्हणजे एक मोठे कुटुंबच!
या कुटुंबातील व्यक्तींना (मायबोलीकरांना) वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास हा धागा!!!
ज्या व्यक्तीला शुभेच्छा देत आहात त्यांच्याविषयीची काही विशेष आठवण असेल तर ती देखील शेअर करू शकता!

(टीप: आपले चांगले मित्र / मैत्रीण जे मायबोलीकर नाहीत अशांना शुभेच्छा देण्यासाठी हा धागा वापरू नये! त्यांना मायबोलीवरुन शुभेच्छा द्यायच्याच असल्यास आधी त्यांना मायबोलीवर येऊन खाते उघडण्यास सांगावे आणि मग यथेच्छ शुभेच्छा द्याव्यात!!)

विषय: 

लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट करावा का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 April, 2020 - 02:51

जगभर लोकं मरत असताना तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करत आहात त्यापेक्षा बर्थडेचा खर्च दान करा अशी चर्चा अखेर त्या धाग्यावर सुरु झाल्याने तिथला मूळ हेतू बारगळू नये म्हणून हा स्वतंत्र धागा काढत आहे.

अश्या पोस्ट तिथे टाकणारयांवर मी नाराज बिलकुल नाही. या काळात उधळपट्टी न करता तो पैसा गरजूंना द्यावा असा पहिला विचार मनात येणे स्वाभाविक आहे. किंबहुना ती लक्षात घेऊनच मी ही चर्चा स्वतंत्र धाग्यात करूया अशी विनंती सुरुवातीलाच केली होती.

पण मला वाटते हा मदतीचा पहिला विचार मनात आल्यानंतर दुसरा विचार करणेही गरजेचे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Birthday