लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट करावा का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 April, 2020 - 02:51

जगभर लोकं मरत असताना तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करत आहात त्यापेक्षा बर्थडेचा खर्च दान करा अशी चर्चा अखेर त्या धाग्यावर सुरु झाल्याने तिथला मूळ हेतू बारगळू नये म्हणून हा स्वतंत्र धागा काढत आहे.

अश्या पोस्ट तिथे टाकणारयांवर मी नाराज बिलकुल नाही. या काळात उधळपट्टी न करता तो पैसा गरजूंना द्यावा असा पहिला विचार मनात येणे स्वाभाविक आहे. किंबहुना ती लक्षात घेऊनच मी ही चर्चा स्वतंत्र धाग्यात करूया अशी विनंती सुरुवातीलाच केली होती.

पण मला वाटते हा मदतीचा पहिला विचार मनात आल्यानंतर दुसरा विचार करणेही गरजेचे आहे.

माझे वैयक्तिक म्हणाल तर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एका ग्रूपसोबत जेवण पुरवण्यात खारीचा वाटा ऊच्लत आहे. आतापर्यंतचा एकूण आकडा जोडल्यास ती खारही पुरेशी मोठी झाली आहे. तर ऊगाच बड्डेच्याच दिवशी हे वेगळे डिखावा केल्यासारखे करायची गरज आहे काय?
याआधीही मुलांच्या नावे काही वेळा बायकोने अशी मदत केली आहे. किती वेळा ते मला कल्पनाही नाही कारण ती मला सांगतही नाही. आणि हेच मी सुद्धा फॉलो करतो. याबाबत शाहरूखचा आदर्श आहे. आज मात्र मुलांच्या आनंदावर कोणी प्रश्न उठवल्याने नाईलाजाने उल्लेख करावा लागला.

असो, तर यंदाचा बड्डेचा खर्च तिथे द्या असे कोणी म्हणाले तर मुळातच होममेड केक व्यतीरीक्त खर्च होणारच नाहीये यंदा.

मग तरीही बड्डे सेलिब्रेशन म्हणजे काय? आणि जगभर लोकं मरत असताना तो साजरा करायची खुमखुमी का??

तर याचे एकमेव कारण मुलांचा आनंद.

या लॉकडाऊन काळात गेला महिनाभर आपल्या सर्वांचीच पोरे घरात अडकली आहेत. त्यांचे मनोरंजन जे काही आहे ते घरातच आहे. मोठ्यांना जिथे हे लॉकडाऊन गरजेचे आहे हे माहीत असूनही असे कोंडले गेल्याने फ्रस्टेशन येऊ लागलेय तिथे ज्या लहान मुलांना हे नक्की कश्यासाठी याचे पुरेसे गांभीर्य नसल्याने त्यांना या लॉकडाऊन काळात रमवायची जबाबदारी आपलीच आहे.

मोठी माणसे वर्क फ्रॉम करताहेत. व्हॉट्सप फेसबूकवर ऑनलाईन मित्रांशी कनेक्टेड आहेत. नवनवीन खाद्यपदार्थ बनवून त्यांचे फोटो काढून अपलोड करताहेत, साडी चॅलेंज, पाणीपुरी चॅलेंज, जुना फोटो चॅलेंज खेळात रमताहेत....

पण लहान पोरांचे काय?? कार्टून लाऊन दिले, रंगवायला कलर्स दिले आणखी काही करत त्यांचेही रुटीन सेट केले तर झाले? मग दिड महिना वा कदाचित त्यापेक्षाही जास्त काळ त्यांनी न कंटाळता हेच करावे अशी अपेक्षा ठेवायची का?

आमच्याकडे जे काही सेलिब्रेट होते त्यात पोरांना कसा जास्तीत जास्त आनंद येईल हेच बघून प्लान केले जाते. याचसाठी सासरमाहेरच्या दोन्ही घरातल्या एकूण एक सदस्यांचा वाढदिवस मुलांच्या हस्ते केक कापून साजरा केला जातो. अगदी आमचा लग्नाचा वाढदिवसही आम्ही मुलांना सरप्राईज देत सॉफ्ट टॉईजने घर सजवले होते. त्यांनीच केक कापला त्यांनीच पार्टी केली. आम्ही नुसते वेटर आणि फोटोग्राफरच्या भुमिकेत होतो. त्यामुळे जेव्हा नंतर फोटो फेसबूलवर टाकले तेव्हा कोणाला समजले नाही की वाढदिवस आमच्य लग्नाचा होता की मुलांची पार्टी होती.

असो, सांगायचा मुद्दा हा की आता हा आठवडाभर मम्माच्या वाढदिवसाला तिला काहीतरी सरप्राईज द्यायचे यामुळे मुलगी एक्सायटेड राहणार आहे. वाढदिवसाचा दिवसही स्पेशल होईलच. आणि त्यातून मिळणारा आनंद पोरांना आणखी चार दिवस पुरेल.

वाढदिवस असो वा कुठलेही फॅमिलीसोबत केलेले कुठलेही सेलिब्रेशन असो, ते साजरे करायला पैसा नाही तर नियत लागते, एकमेकांवर प्रेम लागते. आणि ते अनुभवण्यासाठी मी तर म्हणेन या काळात बर्थडे सेलिब्रेशन करा....

धागा चर्चेला खुला आहे...
सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा चर्चेला खुला आहे...
सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल...
>>>>

जसं काही लोक सांगतील तसं वागणार आहेस.

करायचा अस्सेल तर खुश्शाल कर वाढदिवस साजरा. नसेल करायचा तर नको करू.
ऊठसूठ धागा कशाला काढतोस. किती वेळ वाया घालवतोस.

लवकर मोठा हो, होशील तेव्हा (आणि झालास तर) खूप मोठा होऊ शकतोस.

आतापर्यंतचा एकूण आकडा जोडल्यास ती खारही पुरेशी मोठी झाली आहे
हरकत नाही खारीची मगर झाली तरी उत्तम प्ण करत रहा. काही एक गरज नाही सेलेब्रेट करायची.आणी ते वय एक वर्षाने कमी हा पॉईंटाचा मुद्दा आहेच.

लॉक डाऊन मध्येच कशाला रोजच करा बड्डे. तसेही रोज एका दिवसाने वाढत च असते शरीर तुमची समज वाढली काय आणि नाही काय. फरक कोणाला पडतो. गोड धोड बनवा खूप खा. ओवाळून घ्या. चांगले अभ्यंग स्नान करा. घरातच छान कपडे घालून मिरवा फोटो काढा. घरीच लोक केक बनवत आहे तुम्ही शिकून घ्या बनवा. मेणबत्या लावा किंवा विझवा. काय हवे ते करा. फक्त एक करा. कोणाला विचारू नका. आपल्याला जे योग्य वाटते ते स्वतःच्या हिमतीवर करून टाका

हर्षद Happy Happy

जेम्स बॉण्ड - मगर झाली की तिला दिवाणखान्यात ठेवायची आणि तिला बघायला तिकीट लावायचं
आलेला पैसा दान धर्मात द्यायचा

Happy

मगर झाली की तिला दिवाणखान्यात ठेवायची आणि तिला बघायला तिकीट लावायचं
आलेला पैसा दान धर्मात द्यायचा

देवा......नका हो अशा आयडीया देवु....परत सकाळी धागा/गे दिसायचा/चे.
मगर दिवाणखान्यात ठेवु की किचन मधे?
मगर बेडरुम मधे ठेवल्यास होणारे नुकसान.
वगैरे वगैरे...

:). Happy

गोड धोड बनवा खूप खा. ओवाळून घ्या. चांगले अभ्यंग स्नान करा. घरातच छान कपडे घालून मिरवा फोटो काढा. घरीच लोक केक बनवत आहे तुम्ही शिकून घ्या बनवा. मेणबत्या लावा किंवा विझवा. काय हवे ते करा. फक्त एक करा. कोणाला विचारू नका. आपल्याला जे योग्य वाटते ते स्वतःच्या हिमतीवर करून टाका

Submitted by रोहिणी चंद्रात्... on 25 April, 2020 - 12:54

>>>>

धन्यवाद रोहीणीजी

आपली ही आयड्या छान आहे.
##
चांगले अभ्यंग स्नान करा. घरातच छान कपडे घालून मिरवा फोटो काढा.
##

गेले काही दिवस लॉकडाऊन प्लस कमालीचे ग्लोबल वॉर्मिंग यामुळे अगदी दशावतार झालाय लूक्सचा. हा बड्डे चांगले कपडे घालून मिरवल्याने एक मरगळ झटकली जाईल. एक चैतन्य येईल Happy

या लॉकडाऊन काळात हे गरजेचेही आहे. छान मुद्दा

हर्पेन धन्यवाद

जसं काही लोक सांगतील तसं वागणार आहेस.
>>>
नाही.
पण लोकं काही चुकीचे वागत आहेत हे समजल्यास त्यांना कर्रेक्ट करू शकतो ना... म्हणून धागा काढतो Happy

मजा करणेका चान्स है तो कल्लो!
क्या पता, कल हो ना हो Lol
Submitted by रॉनी on 25 April, 2020 - 17:28

>>>>

सहमत आहे.
हर पल यहा जी भर जिओ... जो है समा.. कल हो ना हो

बरेच लोकं अमुक काळात तमुक वागले का कसे दिसेल याचा विचार करताना आधी बाकीचे लोकं कसे वागताहेत बघूया म्हणून थांबतात... मग जर लक्षात आले की अरे लोकं व्हॉटसपवर नेहमीसारखे विनोद शेअर करत आहेत, घरी गोडधोड पक्वान्ने बनवून त्याचे फोटो शेअर करत आहेत हे बघितल्यावर मग त्यात ऊतरतात.

मी फेसबूकवर् सुद्धा माझ्या मित्रयादीत अश्या मैत्रीणी पाहिल्या आहेत की ज्या आधी कोरोनाकाळात साडी चॅलेंज खेळणारया बायकांवर टिकेचे असूड ओढत होत्या. पण नंतर मात्र स्व्त: डालगोना आणि पाणीपुरी चॅलेंजमध्ये रमल्या..

कधी बातम्यात आजूबाजूची परिस्थिती पाहिली की मन खरेच विषण्ण होते. एखादी व्हॉटसपपोस्ट वा विडिओ पाहिला की खरेच जेवणात मन लागत नाही. पण त्याचवेळी मुलांशी खेळताना जग अजूनही सुंदर आहे आणि आयुष्य अजूनही त्याच उमेदीने जगायचे आहे याची जाणीवही होते.

एक चैतन्य येईल^^^^^

एक कशाला, मला सांगा मी किमान 3-4 चैतन्ययांना पाठवीन
पण लॉक डाऊन संपू दे आधी
सगळे चैतन्य आणि मी तुमच्या मुंबईतल्या सगळ्या फ्लॅट वर येऊ पाहुणे म्हणून

तुमचा आधी खुप मोठा फॅन होतो..तुमचे yellow yellow dirty fellow, सुदाम्याचे पोहे..हे लेख क्लास होते..
काही धागे खरचं मनोरंजन करणारे होते.. हल्ली तुम्ही जे ऊठसूठ विनाकारण धागे काढायला लागलात ना..तर खरचं..
इरीटेड व्हायला होतं.. नका असं करू..जे तुम्ही माबोवर कमावलं ना ते नका असं घालवू..

बघा जमलं तर...हाताशी चांगला वेळ आहे तर लिहा ना काहीतरी चटपटीत...

का सकाळी उठल्यावर चंगच बांधता..आज धागा काढणार शंभर प्रतिसाद घेणार..

असं असेल तर कठिण आहे बुआ..

काही कठीण नाही, आता त्यातले 50 तर माझे असतील प्रतिसाद
मी अधिच का नाही हे केलं असा विचार करून अपार खिन्नता येते Happy

अजय चव्हाण आपण आयुष्यात काही कमावलं असे समजणे आणि मग ते गमवायची भिती ऊराशी बाळगणे हे आयुष्य जगण्यातले थ्रिल घालवते Happy

मी या जगात येताना जे घेऊन आलेलो तेच घेऊन जाणार आहे. हे गीतेत सुद्धा लिहिले आहे की नाही याची कल्पना नाही.

म्हणजे मरेपर्यंत कर्कश्य आवाजात रडणार?
हे भलते अवघड असते
असे म्हणतात
डॉक्टर लोकांनी उलटे करून पाठीवर थापटले तर चालेल ना?

म्हणजे वाघाचे पंजे

हायला किती दिवसांनी हा पांचट जोक मारायला मिळाला
धन्यवाद रु तुमच्यामुळे मला पांचट पणा करायची संधी मिळते आहे

देव तुमच्यातील पांचट पणा असाच अबाधित ठेवो
+ 1572

आपण आयुष्यात काही कमावलं असे समजणे आणि मग ते गमवायची भिती ऊराशी बाळगणे हे आयुष्य जगण्यातले थ्रिल घालवते + ११११११११
ऋन्मेऽऽष मी तुमचा फॅन आहे. लिहीत रहा.

पुर्वपुण्याईमुळे लोक्स शालजोडीतली मारत्यात सध्या पण असच सुरू राह्यलं तर शाल राह्यची बाजूला, नुसत्याच जोड्यानी मारतील. वेळीच सुद्रा.

आज सहज राजकीय चर्चांचे धागे चाळले
आणि मनात विचार आला
कोरोनाकाळात ईतके राजकारण करावे का?
तिथे नेते ज्यांचा जन्म हेच करायला झाला आहे त्यांना करू दे ना. ईतर समर्थकांनी तरी यात आपली उर्जा शक्ती वेळ न घालवता भान ठेवावे. एकजूट दाखवावी..
नवीन धागा काढायची ईच्छा नसल्याने ईथेच हा मनात आलेला विचार मांडला

रुन्मेषजी मला विपु करत जा, मी नक्की धागे वर आणत जाईन तुमचे. तेवढाच माझा मगरीचा वाटा. आजकाल लोकही फार निष्ठुर झालेत.
नवीन धागा काढायची ईच्छा नसल्याने ईथेच हा मनात आलेला विचार मांडला
>>>>
हो ना, आता तुमचा या विषयावर एकही धागा नाही. दुसरा मी काढला, तेव्हाही तुम्हाला वाईट वाटलं होतं. पण संबंधित धाग्यावर प्रतिसाद देऊन आपल्या धाग्यावरचा एक प्रतिसाद का बरे कमी करावा...

पण संबंधित धाग्यावर प्रतिसाद देऊन आपल्या धाग्यावरचा एक प्रतिसाद का बरे कमी करावा...

>>>

अज्ञातवासी प्लीज चेक करा.
ईथे पोस्ट करायच्या आधी मी आप्ल्यच राज्यपाल धाग्यावर सेम पोस्ट करून आलो आहे
ते सुद्ध बोल्ड मध्ये लिहिले आहे
पण राजकीय धुळवडीत हे ऐकतोय कोण? आपल्यालाही ती पोस्ट दिसली नाही हे दुर्दैव्य.

हि बघा

कोरोनाकाळात रजकारण करावे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 May, 2020 - 12:37
संपादन (3 hours left)

माझा धागा तुझा धागा असले क्षुद्र विचार मी करत नाही ओ.
सचिनवर नेहमी शतकासाठी आणि वैयक्तिक विक्रमासाठी खेळतो असे आरोप व्हायचे. हे हुमयुन नेचरच आहे.

आताच धागा बघितला,
आधी टिंब दिसला मग प्रतिसाद दिसला.
ओके, संशयाचा फायदा देऊयात...