मायबोलीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 15 August, 2023 - 07:04

मायबोली म्हणजे एक मोठे कुटुंबच!
या कुटुंबातील व्यक्तींना (मायबोलीकरांना) वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास हा धागा!!!
ज्या व्यक्तीला शुभेच्छा देत आहात त्यांच्याविषयीची काही विशेष आठवण असेल तर ती देखील शेअर करू शकता!

(टीप: आपले चांगले मित्र / मैत्रीण जे मायबोलीकर नाहीत अशांना शुभेच्छा देण्यासाठी हा धागा वापरू नये! त्यांना मायबोलीवरुन शुभेच्छा द्यायच्याच असल्यास आधी त्यांना मायबोलीवर येऊन खाते उघडण्यास सांगावे आणि मग यथेच्छ शुभेच्छा द्याव्यात!!)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज १५ ऑगस्ट!
मायबोलीकर 'साधना' यांचा आज वाढदिवस आहे!
साधनाताईंना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

आज बागुलबुवा उर्फ असुदे ह्याचाही वाढदिवस. बाबुला आणि साधनालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

साधना आणि बागुल बुवा, वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy
15 ऑगस्ट माझ्यामते वाढदिवसाची सर्वात स्पेशल तारीख आहे. नशीबवान आहात Happy

ऋन्मेष तुमचाही वादि आज असतो ना?
>>>>>>
@ सामो, 11 ऑगस्टला असतो. झाला चार दिवसांपूर्वी. पण तुम्ही अंदाजे लक्षात ठेवला या बद्दल धन्यवाद. हे मला अनपेक्षित होते Happy अन्यथा मी मुद्दाम सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर माझी जन्म तारीख दिसू नये अशी सेटिंग ठेवतो. जेणे करून दिवसभर शुभेच्छांचा पूर येऊ नये. तर ज्यांना खरेच लक्षात आहे त्यांनीच शुभेच्छा द्याव्यात Happy

अरे वा… हा धागा आता पाहिला Happy

सगळ्यांचे मनापासुन आभार.

वि मु तुमचे खास आभार. तुम्ही माझा वाढदिवस लक्षात ठेवलात.

वाढदिवसाच्या शुभेच्छा साधना आणि बागुलबुवा.
ऋ तुलाही ११ ऑगस्ट साठी, होउन गेलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा >>> मम.

वाढदिवसाच्या शुभेच्छा साधना आणि बागुलबुवा.
-------
साधना यांनी एक धागा पाच सहा वर्षांपूर्वी टाकला होता - मुंबई राणीबाग गटग. मी त्यात गेलो होतो. सात आठ माबोकर जमले अगदी सकाळी. विविध झाडे आणि प्राणी पाहात ओळख करून घेतली. मीच नवीन होतो,ते सर्व एकमेकांना ओळखत होते. सहज सोपा गटग आवडला होता. असे गटग चार ऋतूंत चार व्हायला हवेत . नवीन माबोकरांना उपयोगी.

साधना, बागुल बुवा, ऋन्मेषचे बाबा सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पैठणी, शर्ट पीस, शर्ट पीस.

बागुलबुवा तुमचाही वाढदिवस 15 ऑगस्टला असतो हे माहित नव्हते, त्यामुळे शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्यांचा आता स्विकार करा!

मी मुद्दाम सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर माझी जन्म तारीख दिसू नये अशी सेटिंग ठेवतो. जेणे करून दिवसभर शुभेच्छांचा पूर येऊ नये. तर ज्यांना खरेच लक्षात आहे त्यांनीच शुभेच्छा द्याव्यात > same here!
ऋन्मेऽऽष, तुलाही होऊन गेलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!