वेदना कवीची
वेदना कवीची
क्षमा असावी, राग नसावा
रसिक तुम्ही माझा विसावा
वियोगाचा रोग न रुचला
म्हणून भेटीचा उपचार सुचला
नाही अपेक्षा मानसन्मानाची
नाही हार तुरे ना बक्षिसांची
दखल घ्यावी शब्दसरितेची
झाकू न द्यावी किरणे सवितेची
नाही कुणी मी मोठा कवीराज
नाही मजशी ना तख्त ना ताज
झोपडीच मजला प्यारी माझी
शब्दफुले फुलो दारी ताजी
शब्दसृष्टीचा मी पुजारी
नाही कुणी दीन भिकारी
कौतुकाची भीक नको, परि
उपेक्षा करी जखम जिव्हारी