Submitted by Asu on 4 February, 2020 - 09:03
वेदना कवीची
क्षमा असावी, राग नसावा
रसिक तुम्ही माझा विसावा
वियोगाचा रोग न रुचला
म्हणून भेटीचा उपचार सुचला
नाही अपेक्षा मानसन्मानाची
नाही हार तुरे ना बक्षिसांची
दखल घ्यावी शब्दसरितेची
झाकू न द्यावी किरणे सवितेची
नाही कुणी मी मोठा कवीराज
नाही मजशी ना तख्त ना ताज
झोपडीच मजला प्यारी माझी
शब्दफुले फुलो दारी ताजी
शब्दसृष्टीचा मी पुजारी
नाही कुणी दीन भिकारी
कौतुकाची भीक नको, परि
उपेक्षा करी जखम जिव्हारी
कविता करणे माझ्या छंदा
कुणी निंदा वा कुणी वंदा
रसिकराजा तुला रिझविण्या
कविता करणे माझा धंदा
जाणतो मी माझी कविता
नसेल मोठी, पण नाही खोटी
उपेक्षिण्या परि नाहीच छोटी
सदैव राहील तुमच्या ओठी
प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा