आता एक पायरी अन् बस् ते गिरिनारी स्वत: भेटणारेत आपल्याला.. मी मंदिराला नमस्कार करुन वर गेले. समोरच सुंदर त्रिमुर्तींची मुर्ती चेहऱ्यावर आश्वासक हसू ठेवून स्वागत करती झाली. मंदिर जवळ आले असतानाच मी घरून नेलेली वात, हिना अत्तर, फुले व तुळस काढून हातात ठेवलेली. ते सर्व दक्षिणेसह पुजाऱ्यांच्या हातात दिले. त्यातील खडीसाखर त्यांनी पादुकांना लावून परत दिली. त्या दरम्यान मी पादुकांना नमस्कार केला व गर्दी असल्याने हळूहळू चालत बाजूला क्षणभर थांबले. अगदी दगडात कोरलेली पावले. पुढची बोटे दिसत होती, मागच्या भागावर फुले वाहिली होती. अगदी रेखीव बोटे.
काल रात्री झोपताना बी कॉम्प्लेक्स व पेन किलर घेऊनच झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कालच्या इतका थकवा जाणवला नाही. आज दिवसभर आराम होता, रात्री शिखरासाठी निघायचे होते. नाष्टाकरून परत एक झोप काढली. तेवढ्यात असे कळाले की कुणी मसाजसाठी पतीपत्नी धर्मशाळेशी संलग्न आहेत व त्याचा चांगला उपयोग होत आहे. माझा उजवापाय दुखराच झाला होता, एक पायरीही चढणे दुष्प्राप्प्य झालेले. सॅकच्या ओझ्याने खांदे सुजलेले. मी अगदी आतुरतेने तिची वाट पाहू लागले, पण ती काही येईना.. शेवटी तिचा फोन नं मिळवला तर तो तिच्या नवऱ्याचा होता तो म्हणाला की ती धर्मशाळेतच आहे; येईल.
सकाळी ४.३०ला बाहेर प्रांगणात सगळ्यांनी भेटायचे ठरलेले. ३.३०लाच उठलो, आवरून बरोब्बर ४.३०ला बाहेर हजर झालो. समोर गिरनारच्या पायऱ्यांवरील लाईटस् दिसत होते.. त्या दिव्यांच्या ओळीवरून रस्ता कसा जात असेल ते कळत होते. सारी मंडळी अगदी वेळेवर हजर झाली. ग्रुपलीडरने परिक्रमेच्या दृष्टीने काही सूचना दिल्या उदा. टॉर्च घेतल्याची खात्री करणे, काठ्या गरज लागत असेल तरच घ्या.. बऱ्याचदा घेऊन नुसतेच ओझे होते इत्यादी. धर्मशाळेच्या बाहेर पडून आम्ही सगळ्यांनी चहा/ कॉफीपान केले, ज्यांना काठ्या घ्यायच्या होत्या त्यांनी काठ्या निवडल्या आणि चालायला सुरुवात केली.
माझ्याबरोबर शेजारी रहाणाऱ्या काकू व त्यांची बहिण होती.. त्यामुळे अगदी एकटे वाटणार नव्हते. जाताना त्या दोघी माझ्या घरी आल्या व आमचा माझ्या घरून एकत्र प्रवास सुरु झाला..
कार्तिकी पौर्णिमेला मी गिरनार परिक्रमा आणि दत्तशिखरावरील पादुका दर्शन पुर्ण करून आले. बऱ्याच लोकांनी तुझा अनुभव लिही असे सांगितले.. त्याप्रेरणेने एक तोकडा प्रयत्न करत आहे.
त्या जगत्गुरुंच्या दर्शनाचे मी काय वर्णन करु.. शब्द तोकडे आहेत. तरी हा प्रयास गोड मानून घ्यावा ही विनंती करते.
मायबोलीवरही लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तेंव्हा जाणकारांनी सांभाळून घ्यावे ही विनंती. तुमच्या सूचना व अभिप्राय अनमोल आहेत जेणेकरुन लेखनात सुधारणा होऊ शकेल.