राव पाटील!

फक्त काहीच दिवस उरल्यात!

Submitted by अजिंक्यराव पाटील on 30 July, 2020 - 03:48

तर, आपल्याला काय ते गॉड गॉड लिहिता येत न्हाई,
पर, तुला सांगाव वाटतं माझा किती जीव आहे तुझ्याव..
असं बघ, आताशा वावरात नांगुर धरल्यावर जवा नजर आभाळात जाती,
मला तुझ्या चेहऱ्याचा चांदवा दिसतो, न मग तास तिरपा व्हत जातो.

दुपारनं भाकरीच्या टायमाला चटणीसंग तुकडा मोडताना वाटतंय,
तू आल्यावर हे असं कोरडं खावा लागायचं नाही.
मग नजर बांधाकडं जाती.. अन तू दिसतीस मला बांधावरून मुरकत, सावरत येताना.
वाऱ्यामुळं तुझ्या पातळाचा पदर, पायापासला सोगा मागं उडतो, तुझा बांधा डोळ्यात भरत जातो.

विषय: 
शब्दखुणा: 

न जगलेला मिरूग..

Submitted by अजिंक्यराव पाटील on 13 July, 2020 - 12:27

आई दडा दडा भाकऱ्या थापत होती. मधूनच भाकरीहून फिरवलेल्या पाण्याच्या हाताचा आवाज, आणि शेकायला ठेवलेल्या भाकरीचा पोपडा भाजून सुटलेला खमंग वास. एकावेळी ३ भाकऱ्या बनत होत्या, एक परातीत, दुसरी तव्यावर आणि तिसरी शेकायला चुलीच्या तोंडापाशी- निखाऱ्यावर.

विषय: 
शब्दखुणा: 

माझ्या शृंगारिक चारोळ्या.

Submitted by अजिंक्यराव पाटील on 10 July, 2020 - 14:49

आयुष्याला सये तुझ्या प्रेमाची बांधण,
कोऱ्या हृदयावर माझ्या तुझ्या ओठांचं गोंदण..
--------------

ती वेणी सोडवताना, मी शुद्ध होतच जातो,
देहाची होते समिधा, मी फक्त ओतत जातो..
----------------

तू यावेस सजणा माझ्या, अंगणी वळीव होऊन,
मी उधळून द्यावे स्वतःला मृद्गंध तुझा होऊन...
--------------------

तू मला, तुला मी पाहावे, एकाच आरशातून,
आत्म्यांचे मिलन व्हावे, त्या पहिल्या स्पर्शातुन...
--------------------------
( चारोळी लिहायची होती, पण कविता? झाली.)

विषय: 
शब्दखुणा: 

ठहरा हुआ हूं मैं!

Submitted by अजिंक्यराव पाटील on 8 July, 2020 - 11:00

फेसबुकवर रेखताच्या पेजवर एकाने मिसरा (कुछ देर तक सुकून से ठहरा हुआ हुआ हूं मैं) देऊन शेर उठवायला सांगितला, मी पूर्ण गझल लिहून टाकली.. जमलीये का सांगा..

कुछ देर तक सुकून से ठहरा हुआ हुआ हूं मैं,
वो जा रहे हैं और उनका सहरा हुआ हूं मैं!

अभी अभी तो आयी है जानेकी खबर उनकी,
कुछ देर आवाज ना देना बहरा हुआ हूं मैं!

अब मुझे रोक लेनेकी कोशीशे नाकाम होगी,
तुम थाम ना सकोगे मुझे, कोहरा हुआ हूं मैं!

लोग कहा करते थे कभी जिल्ले इलाही मुझे,
आँख खुली तो समझा सिर्फ मोहरा हुआ हूं मैं!

विषय: 
शब्दखुणा: 

मोठी हो म्हणावंसं वाटत नाही

Submitted by अजिंक्यराव पाटील on 22 May, 2020 - 01:08

नाजूक निळे डोळे
शोधतात कुणाला,
श्वासांमागचे निःश्वास
बोलवतात कूणाला..

निरागस भाव किती,
झाले डोळ्यात गोळा,
चाफेकळी नाक ते
कित्येकांना लावे लळा...

का कुणास ठाऊक,
तू अशीच राहावीस वाटते..
कसं सांगू तुला दुनियेत,
काळोखी कशी दाटते...

बरबटलेल्या दुनियेत तुला,
हे लोक लहान राहु देणार नाहीत
पण खरं सांगु पोरी तुला,
मोठी हो म्हणावंसं वाटत नाही..

राव पाटील!

विषय: 
शब्दखुणा: 

कृपया धागा उडवावा <<दिवाकरांची नाट्यछटा हवी आहे. >>

Submitted by अजिंक्यराव पाटील on 4 March, 2020 - 08:31

शाळेत कुमारभारतीच्या पुस्तकात दिवाकरांची एक नाट्यछटा होती. एक कि दीड पान होतं फक्त.. पण फार खुसखुशीत होती. त्यात दोन कवी (बहुतेक) एकमेकांना भेटतात आणि एकमेकांची स्तुती करतात. थोडक्यात "अहो रुपम अहो ध्वनी" प्रकार होता. कुणाकडे असेल आता तर कृपया पोस्ट करा/ लिंक द्या.

विषय: 
शब्दखुणा: 

ओंजळ

Submitted by अजिंक्यराव पाटील on 5 February, 2020 - 06:37

तुझ्या माझ्या सोबतीचे
क्षण अजून संपले नाही
ओंजळीत तुझ्या स्वप्ने
अजून माझी उरलीत काही

आठव ते क्षण कसे
सोबत असताना उडून जायचे
निरोप घेतल्यावर सुद्धा
काही बोलणे राहून जायचे
ओठांमध्ये तेच शब्द,
माझ्यासाठीचे उरलेत काही..१

हातात गुंफून हात त्या,
सांजा हलकेच निघून गेल्या
जाता जाता गहिऱ्या,
आठवणी मागे ठेवून गेल्या
भूतकाळातल्या असल्या तरी,
आठवणी अपूर्ण राहिल्यात काही...२

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राव पाटील!