किशोर कुमार
जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)
'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'!
एखादी कलाकृती निर्मित केल्यावर स्वत: कलाकारच त्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो, तिच्या परिपूर्णतेने/ सौंदर्याने भारावून जातो आणि अचंबित होऊन विचार करतो की, "हे मीच बनवलं आहे?".. किंचित अभिमानाने वारंवार स्वत:च स्वत:ची पाठही थोपटतो. असंही वाटतं की, "बनवावं तर असंच, नाही तर काही करूच नये!"
किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू
मला आवडणार्या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं.
