गणेशोस्तव २०१९

सोळा आण्याच्या गोष्टी - 'आतुरता' - किल्ली

Submitted by किल्ली on 9 September, 2019 - 09:43

घराच्या ओसरीवर कट्ट्यावर बसून ती त्याची वाट पाहत होती. वेडी!

त्याने अजूनही तिची दखल घेतली नव्हती, कदाचित घेणारही नव्हता. हे माहित असूनही ती रोज त्याची वाट पाहत असे आणि तो दिसताच आनंदून जात असे.
त्याचं तेजस्वी रूप तिच्या मनात व्यापलं होतं.

एके दिवशी त्याला पाहू शकली नाही तेव्हा तिची चर्या दुःखाने काळवंडून गेली होती.

नेहमीसारखा तो विशिष्ट वेळी येणार हे माहित असूनही मोठ्या आशेने आधीपासून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.

दोघांचा मूक संवाद नेहमीच चाले. दुरून!

निदान तिला तरी असं वाटे की तो इशाऱ्यांमध्ये तिच्याशी बोलतो.

विषय: 
Subscribe to RSS - गणेशोस्तव २०१९