सोळा आण्याच्या गोष्टी - 'आतुरता' - किल्ली

Submitted by किल्ली on 9 September, 2019 - 09:43

घराच्या ओसरीवर कट्ट्यावर बसून ती त्याची वाट पाहत होती. वेडी!

त्याने अजूनही तिची दखल घेतली नव्हती, कदाचित घेणारही नव्हता. हे माहित असूनही ती रोज त्याची वाट पाहत असे आणि तो दिसताच आनंदून जात असे.
त्याचं तेजस्वी रूप तिच्या मनात व्यापलं होतं.

एके दिवशी त्याला पाहू शकली नाही तेव्हा तिची चर्या दुःखाने काळवंडून गेली होती.

नेहमीसारखा तो विशिष्ट वेळी येणार हे माहित असूनही मोठ्या आशेने आधीपासून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.

दोघांचा मूक संवाद नेहमीच चाले. दुरून!

निदान तिला तरी असं वाटे की तो इशाऱ्यांमध्ये तिच्याशी बोलतो.

शेवटी आतुरतापूर्तीचा क्षण आलाच!

ती नाचत, आनंदाने टाळ्या पिटत, ओरडली,

"बाबा, चांदोमामा आला!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
पण चंद्र रोज आदल्यादिवशीपेक्षा ५० मिनिट उशिरा उगवतो आणि लहान मुलाची रोजची झोपायची वेळ ठरलेली असायची शक्यता आहे. त्यामुळे हे रोज शक्य नाही.

ॲमी>>>+११११ तसेच,

<<त्याने अजूनही तिची दखल घेतली नव्हती, कदाचित घेणारही नव्हता. हे माहित असूनही ती रोज त्याची वाट पाहत असे आणि तो दिसताच आनंदून जात असे.
त्याचं तेजस्वी रूप तिच्या मनात व्यापलं होतं.>>

हे वाचल्यावर मला आधी वाटले की तरुणी असेल पण शेवट वाचून लहान मुलगी वाटतेय,

सुंदर...

धन्यवाद @Shraddha, शाली, मधुरा, रत्न, जाई, बिपिनसांगळे , प्राचीन , आसा, चन्द्रा, ॲमी, VB , दत्तात्रय साळुंके, A M I T , Cuty Happy

पण चंद्र रोज आदल्यादिवशीपेक्षा ५० मिनिट उशिरा उगवतो आणि लहान मुलाची रोजची झोपायची वेळ ठरलेली असायची शक्यता आहे. त्यामुळे हे रोज शक्य नाही.>> सहमत
काही मुलं रात्री जागतात, उशिरा झोपतात, (दुपारी झोप झाल्यामुळे) त्यांच्या बाबतीत हे शक्य आहे Happy
माझा भाचा अडीच वर्षांचा आहे, १२-१ वाजता झोपतो पठ्ठ्या Proud

मस्त Happy

छान कथा.
आमच्याकडेही अशीच आतुरता असते. Happy सुरुवातीला तर सकाळी उठल्यावर प्रश्न असायचा 'मून कुठे?', दिवसातून कितीतरी वेळा खिडकीतून बाहेर 'त्याला' शोधायचा. सद्ध्या आकाशात फक्त चंद्र, तारे आणि सूर्य आहेत आणि बाकी ग्रह टिव्ही/चित्रातच दिसतात असा समज आहे.

धन्यवाद राजसी, sonalisl Happy

सद्ध्या आकाशात फक्त चंद्र, तारे आणि सूर्य आहेत आणि बाकी ग्रह टिव्ही/चित्रातच दिसतात असा समज आहे.>> हे हे, किती गोड

Pages