यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.
पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, येत्या सोमवार पासून (१६ जानेवारीपासून) सुरू होणार आहे. सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविक आणि डेन्मार्कची कॅरोलाईन वॉझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीत अग्रमानांकन मिळालं आहे.
ड्रॉ येत्या शुक्रवारी जाहीर होणार आहेत. मानांकन यादी इथे पहाता येईल.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.
हार्ड कोर्ट मोसमातली युएस ओपन सिरीज चालू झाली आहे. ह्या सिरीजची सांगता युएस ओपन खुल्या डेनिस स्पर्धेने सप्टेंबरमध्ये होते.
http://www.usopenseries.com/
हा धागा युएस ओपन सिरीज २०११ तसेच युएस ओपन २०११ बद्दल चर्चा करण्यासाठी.
यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.
पुरुष एकेरी :
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.
क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.
महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्यांचे चित्र असं असेल.