आदिअनादि
Submitted by पुरंदरे शशांक on 29 July, 2019 - 23:21
आदिअनादि
भरकटून गेलो वार्यावरती जेव्हा
आधार संपता भिरभिरलो मी तेव्हा
गरगरता वार्यासंगे फिरलो दूर
फांदीचा नव्हता हळवासाही सूर
संपन्न हिरवे जगणे जेव्हा स्मरतो
स्वप्नेही अलगद अंतरात साठवतो
मातीत पुन्हा मी मिसळून जातानाही
कोंभांची लवलव खुणावीत ती जाई
मी आदिअनादी होतो जेव्हा व्यक्त
दिपवून जगाला पुन्हा पुन्हा अव्यक्त