फुलपाखरांचे छायाचित्रण
Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 01:16
फुलपाखरांचे छायाचित्रण
फुला-फुलांवर स्वच्छंदी उडणारी रंगीबिरंगी फुलपाखरे सर्वांनाच आवडतात. त्या फुलपाखरांचे छायाचित्रण करायलासुद्धा म्हणूनच आपल्याला आवडते. फुलपाखरांची सुंदर छायाचित्रे काढून ती सोशल मेडियावर टाकून ‘वॉव’ मिळवायला तर प्रत्येकालाच आवडते. पण अनेकांना असा अनुभव आला असेलच की फुलपाखरे काही स्वस्थ बसत नाहीत. ती आपल्याला दिसतात तेव्हा फुलांवर पिंगा घालीत असतात. पंख फडफडवीत असतात. त्यामुळे त्यांना कॅमेर्यात कैद करणे सहजी सोपे नसते.