क्रेप पेपरची फुलं
Submitted by मनीमोहोर on 22 May, 2016 - 13:00
मध्यंतरी एका समारंभाला जायच होत. काही ही भेट न आणण्याची यजमानांनी विनंती केली होती . मला मनातुन काही तरी द्यावे असे वाटत होते पण काय द्यावे हे सुचत नव्हते. त्याच्याच काही दिवस आधी क्रेपची फुलं करणार्या एका बाईंची मुलाखत वजा माहिती पेपरामध्ये वाचली होती तेव्हा पासून ती फुलं मनात भरली होती. त्यामुळे स्वतः केलेली क्रेपची फुल भेट देण्याचा विचार पक्का झाला. त्यामुळे मला त्यांना स्वतः काही तरी करुन भेट देण्याचा आनंद मिळाला आणि यजमानांच्या विनंतीचा मान ही राखला गेला. यजमान ही ही अनोखी भेट बघुन खुश झाले.
विषय:
शब्दखुणा: