क्रेप/ लो फॅट क्रेप्(दोन्ही प्रकाराने)

Submitted by मनःस्विनी on 29 August, 2010 - 15:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी मैदा,
२ अंडी,
पावूण कप दूध
मीठ
ऑर्गॅनिक अर्थ बॅलेन्स्/बटर २ चमचे.

क्रमवार पाककृती: 

खास वर्षा साठी, Happy

पद्धत १)
सगळे मिक्सीत टाकून घुसळून घ्यायचे व पातळ असे पसरवायचे फ्लॅट तव्यावर. ह्याचा खास तवा असतो. माझ्याकडे ईलेक्ट्रीक पॅन आहे व ते क्रेप स्प्रेडर आहे; मस्त होतात. मला हा प्रकार खूप आवडतो.

पद्ध्त २)
मी मैदा खात नसल्याने गव्हाचे पीठ व ओटचे पीठ , दही, जरासेच तेल, मीठ घुसळून करते.

माझा एक अनुभव पॅरीसला लोकांना भारी बाबा वेड क्रेपचे. ऑफीसमध्ये पण हाच नाश्ता रोज सकाळी. ..मज्जा.

ह्याचे फीलिंग्स्च्या अगणित रेसीपी आहेत.
१)चीज + पालक + मश्रूम्स -
२) गोड मध्ये नुट्रेला + चॉकलेट सॉस
३)स्ट्रॉबेरीज + ब्लुबेरीज +सिन्नामन फिलींग्स
४) अ‍ॅपल +सिनामन फिलींग्स
५) पर्सिमन सिनामन फिलींग्स
६) ऑमलेट +चीज
७) मिक्स वेजी + चीज
८) चिकन्/मटण खिमा मिक्स
९) पोहे +गूळ + वेलची +काजू + बेदाणे + ओले खोबरे मिक्स (देसी ईस्टाईल. ) Happy
१०) बनाना + मेपल सीरप+ सिनामन +बेदाणे
११) पीच + लेमन बटर सॉस
१२) अवाकडो सॅलड वुईथ ब्लॅक ऑलीव्स फिलींग्ज
१३) पाईनॅपल + वीप क्रीम + किवी
१४)पीनट बटर सॉस +जेली
१५)ड्राय फ्रूटस + क्रीम चीज + पाहिजे ते फळं

सर्व फिलींग्ज सोप्या आहेत बनवायला. हव्याच असतील तरच लिहिते डिटेल मध्ये.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू सो मच मनःस्विनी! वेळ काढून लगेच लिहिलिस!
नक्की करुन बघीन. मीपण मैदा नाही वापरणार. पण माझ्याकडे ओट पीठ नाहीये. सगळे गव्हाचेच पीठ घेतले तर चांगले नाही लागणार का?

>>>हव्याच असतील तरच लिहिते डिटेल मध्ये!!
नेकी ओर पुछ पुछ!!!
लवकर लिही!! बाकी कशी आहेस?? बर्याच दिवसांनी आलीस!!

काही खास अशी रेसीपी नाही, स्वःताच्या चवीप्रमाणे करायचे बदल. तेव्हा हे मी माझ्या चवीप्रमाणे करते. Happy

फिलींग्ज्स रेसीपी:
१)चीज + पालक + मश्रूम्स - बटन मश्रूम्स बारीक पातळ उभे कापून, पालक चिरून घ्यायचा. earth balance butter टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा + लसूण छान परतला की मश्रूम्स, सगळ्यात शेवटी पालक. पाणी टाकायचे नाही व झाकण नाही ठेवायचे. मीठ मग जराशी कोथींबीर. ड्राय करायचे नाहीतर पातळ क्रेप फाटेल. क्रेपच्या मधोमध टाकून त्यावर जे आवडेल ते चीज (शक्यतो ३ मिक्स चीज असते ना किसलेले) टाकून आधी एक बाजू फोल्ड मग त्यावर दुसरी असे फोल्ड करून पलटी करून सर्व करायचे. नाहीतर फ्रॅन्की सारखे रोल करून खायचे. फ्रँकी हा मुंबईत मिळायचा आयटम.

गोड फिलींग्ज्सः

१)स्टॉबेरीज बटर मध्ये जराश्या परतून घ्यायच्या साखरेबरोबर. त्या कोन सारखे रोल करून नाहीतर वरील प्रमाणे रोल करून क्रेप द्यायचे.

२) क्रीम चीज व कुठल्याही आवडीच्या बेरीज मिक्सीत वाटून मिश्रण रोल करायचे.

३) पीच मस्त लांब पातळ कापून बटर मध्ये मण्द आचेवर परतून सिनामन व साखर(आंबट असेल तर) परतून रोल नाहीतर फोल्ड. वरून वीप क्रीम व बदामाचे काप.

४) मी कधी कधी Noahस bagel मधून क्रीम चीज आणून त्यावर वेगवेगळी फळे कापून , क्रेप रोल करून मग त्यावर थोडा मध टाकून मस्त लागते. (कॅलरीज खूप आहेत once in a while , who cares). Happy

5)कुठलाही मुलाच्या आवडीचा चॉकलेट वापरून सॉस करायचा. सॉस= बटर मध्ये चॉकलेट वितळवून. मग आत मध्ये केळ आवडत असेल तर. त्याअधी केळ मस्त बटर मध्ये परतायचे. केळ्याच्या पातळ कापा करून गरम सॉस टाकून क्रेप रोल.

हे असे दिसते बनाना चॉकलेट- (कृपया नोट करा की हा फोटो मी काढलेला नाही, ईंटर्नेटवरील उचलेला आहे. थोड्या दिवसाने काढीन. ):)
chocolate-banana-crepes.jpg

वर्षा,गव्हाचे पीठ बुळबुलीत होते व जरा चिकट होवून जाईल जरासा ओला सॉस टाकलास तर. ओट जरा बाईडिंग सारखे काम करेल.

रोचीन, धन्यवाद.:)

रोचीन,
फ्रँकी व क्रेप कझिन आहेत तसे. Happy मी नेहमी आवडीने बांद्र्याला खायची लिंकींग रोडला लहानपणी माझी शाळा तिथे असल्याने. तिखट फ्रँकी मग मडक्यातली कुल्फी.. अहाहा.. बांद्रा बेकरीतल्या कूकीज पुन्हा. Happy
काय आठवण आली.

धन्यवाद, मी कधीपासुन क्रेप करायचा म्हणत होते या वीकएनड ला नक्की करेन. आम्हा सगळ्याना खूप आवडतात. इकडे न्युझीलड मधे पण खूप खातात.