मुक्ताकाव्य
गुलमोहर
#मुक्ताकाव्य
गुलमोहर
तुला पाहताना
गुलमोहर आठवतो
समोर असतोस तरीही
पिसाट आठवणींच्या
लागते मागे उगीचच....
फार आवडायचं त्याव भडक लाल रंगात हरवून जायला....
सगळं झाड एकसारखं...
गोठलेल्या लाल हिमनगासारखं.....
माथ्यावर ऊन्ह पडावं
वितळून थेंब थेंब गळायचं!!
टपटप पडणारी फुलं,
अधाशी चातकासारखी वेचायचे, वाचायचे...
एकच वेगळी पाकळी...
तुझ्या हास्याचे रहस्य असलेली
तेव्हापासून बरोबर तू असल्यासारखं..
म्हणूनच गुलमोहर पूर्ण लाल लाल पांघरतो तेव्हा समोर असलास तरी तू आठवतोस...
तेव्हाचा माझ्या मनातला!!
छकुली
रणरणत्या उन्हात चालत असताना एक सात वर्षाची मुलगी डोंबर्याचा खेळ करीत उन्हात पोटासाठी उंच बांधलेल्या दोरीवरून वेगवेगळ्या कसरती दाखवत होती. इवलासा जीव असे कष्ट करताना पाहून कसेसेच झाले..अनेक विचारांनी मन कोंदून गेले. तिच्या झोळीत काही रक्कम देऊ केली आणि पुढे आले.
मनातले विचार शब्दबद्ध झाले..
