उपक्रम क्र. २ -एकारंभा अनंतार्था - इंतजार
Submitted by स्वानंदी१ on 26 September, 2023 - 02:19
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
टोपलीत फळं, उदास चेहेरा, डोक्यावरून घेतलेली ओढणी.
"तेरेकू कितनी बार बोला रजीया, मत कर इतनी भागदौड.."
युसुफ नेहमीप्रमाणे तिला म्हणाला.
तितक्यात लाहोर स्टेशनवर अनाऊन्समेंट झाली.
समझोता एक्सप्रेस कुछ ही वक्तमे आ रही है. .. .. ..
तिने आपली उत्सुक नजर गाडीकडे वळवली.
इशाकने तिला जबान दिली होती. मी हिन्दुस्तानला नसीब आजमावयला जातोय. याच गाडीने परत येईन आणि आपण निकाह करू.
तिचा त्याच्यावर पूर्ण भरोसा होता. फळं विकणं तर फक्त एक बहाणा होता.
विषय:
शब्दखुणा: