अशीही एक वारी
“अशा भाकरी तुज्या कुनी केल्या व्हत्या गं ये भवाने.. हयेचं शिकीवलं व्हय तुज्या आयनं तुला?”
रुक्मिन बाई नेहमी प्रमाणे सुनेवर खेकसत होती.
पण सून तिच्या वरची..
“ये म्हातारे, माज्या आयवर जाऊ नको.. दिसाच्या इस-पंचइस भाकर्या थापायच्या म्हंजी काय गम्मत वाटली काय तुला? त्या करून अजून तिकडं आंगणवाडीत खिचडी शिजवायला जायाच असतया मला, जर्रा येळ झाला की ती बाय वरडती. त्यात आता येळच्या येळी फोनवरून सगळं वर कळवाव लागतं. तुमास्नी काय कळणार हाय त्यातलं! पातळ-पातळ थापत बसले तर घरलाच बसावं लागल मला कायमच. जे बनतय ते खावा गुमान नायतर थापा भाकर्या तुमी!”