तुझा कोपरा...
Submitted by पार्था on 19 July, 2018 - 13:22
अजून आहे तुझा कोपरा, तसाच लपलेला
अजून आहे तसाच तो आठवणी नी भरलेला।
वेळ बराच निघून गेलाय तरी तो आहे गोठलेला,
अजून एक वाक्याने धगधगतो, तुझया प्रेमाने भरलेला।
जबादारी चा ओझया मध्ये सुद्धा, आहे तो दडलेला,
अलगद एक आठवणीतून बहरतो तो, जणू मोगरा फुललेला,।
तू ही आहे तसाच, प्रत्येक क्षणांनी, आठवा नी सजलेला,
तू ही आहेस तसाच, प्रत्येक ध्यासात, रोमात, श्वासात वसलेला
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: